Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

पदरगड: एक भैसटलेला ट्रेक

By Unknown
/ in Bhatkanti Unlimited Padargad Sahyadri Trek
13 comments
शनिवारी ताम्हिणी घाटात जवळपास आख्खा दिवस घालवल्यावर खरेतर मी रविवारी घरी राहणे अपेक्षित होते. म्हणजे मी तरी तशीच तयारी केली होती. पण संध्याकाळी ध्रुवला भेटलो तेव्हा त्याने एक प्रस्ताव ठेवला. भीमाशंकरजवळचा पदरगड म्हणजे ’कलावंतिणीचा महाल’. वर सांगितले की तोरणा एवढा आहे चढायला. झाले... माझा निग्रह ढळलाच. जरी मी त्याला तोंडावर सांगितले की रात्री उशिरापर्यंत सांगेन तरी माझे मन मात्र केव्हाच रविवारच्या कामांची सोय लावण्याचा विचार करू लागले. जी काही कामे होती (घरातले इंटिरियर आणि तत्सम) ती त्याच रात्री मार्गी लावली आणि ध्रुवला कन्फर्मेशन मेसेज टाकून मोकळा झालो.

भल्या पहाटे ४:३० ला ध्रुवच्या घरी पोचायचे होते. म्हणजे मी घर ४:०० वाजताच सोडले. तिथून निघालो आणि गाडी सगळ्या गड्यांना पिक अप केले. नविन भटक्या मित्रांची ओळख परेड झाली. मी, ध्रुव मुळ्ये उर्फ धुरड्या, सिद्धार्थ जोशी उर्फ सिड उर्फ ज्यो, दिलीप उर्फ डीडी आणि किणी असे एकूण पाच लोक होते. सकाळच्या चहाशिवाय तर डोकी आणि गाडी चालणार नव्हती. त्यात ’सिड’ला जेवाय-जेवाय करायचे होते. वर त्याने चार पराठे खाऊन दाखवले तर पूर्ण बिल आणि येण्या-जाण्याचा खर्च देणारे पुण्यातले हमजेखान चौकातले ’शाहजी पराठा हाऊस’ ची कहाणी ऐकवली. आणि मग आमची पण भूक जागृत झाली. पहाटे हमखास खायला मिळणारे ठिकाण म्हणजे युनिव्हर्सिटी सर्कल. तिथे वाफाळणारे उप्पीट आणि वर गरम चहा... वा... याला म्हणतात दिवसाची चांगली सुरुवात!!!

एकदा पोट शांत केले की मग डोके आणि गाडी पळायला लागली. धुरड्याने गाडी नाशिक हायवेवर बुंगवायला सुरुवात केली. झकास गप्पांचे फड रंगले. एकेकाची खेचायला सुरुवात झाली. आधीचे ट्रेक्स, पुढचे बेत, मग केलेल्या ट्रेक्सचे भन्नाट अनुभव, मधेच कुणाला तरी आलेल्या कुरियर वरुन खेचणे असे करत आम्ही मंचर वरुन डावीकडे वळून भीमाशंकराच्या रस्त्याला लागलो. रोड लहान झाला तरी विशेष गर्दी नव्हती. दुतर्फा बहारदार हिरवळ आणि या ऋतूत फुलणाऱ्या फुलांची रेलचेल. सकाळची प्रसन्न हवा आणि अवती भोवती सह्यद्रीच्या डोंगररांगा (टिपिकल नाशिक स्टाईलचे पार्किंग केलेले डोंगर)... लईच भारी मूड जमला होता. त्यात मधेमधे नविन नविन पक्षी दर्शन देऊन आम्हाला कॅमेरा आणि लेन्सशी खेळ करायला भाग पाडत होते. पण तसेच रिझल्टही बरे मिळत होते.



साधारण ८:३० वाजता आम्ही भीमाशंकरला पोचलो. दर्शन आणि मिसळपाव खाऊन सव्वानऊला भीमाशंकरची रेंज उतरायला चालू केली. पदरगडाला जाण्यासाठी भीमाशंकरची रांग उतरुन खाली पदराच्या वाडीत जावे लागते. गणेश घाट, शिडी घाट मार्गे भीमाशंकरला खालून खांडसहून चढून येणारे ट्रेकर्स याच गावातून वर येतात. वरून ती वाडी आणि तिथली घरे मुंगीएवढे दिसत होते. डीडी तर म्हणाला की हे खूपच जास्त हेक्टिक होणार आहे. अर्धा पर्वत उतरून गेल्यावर एक वळसा घालून आपण एका मोकळ्या दरीच्या समोर येतो. तिथूनच पुढे आडवा ट्रॅव्हर्स मारून एका पाणवठ्याशी पोचतो. आणि मग पदरगड काय चीज आहे ते समोर येते. अगदी मळलेली पायवाट आहे. त्यामुळे इथे चुकण्याची शक्यता शून्य. तीच वाट पुढे खाली गावाशी उतरते. एकदोन झोपड्या उभारलेल्या आहेत, जिथे चहा, ताक अशी बेश्ट सोय होते. पुढे त्या वाडीला उजवीकडे ठेवून, नागफणी पॉइंटच्या बरोबर खालून जंगलातून वाट काढत दोनेक किलोमीटर चालले की पदरगड सामोरा येतो. त्याला प्रदक्षिणा घालून त्याच्या मागच्या बाजूने जंगलातून वाट काढतच त्याला बिलगावे लागते. अर्थातच माहितगार वाटाड्या अत्यावश्यक आहे.

आमचा ज्यो म्हणजे गिर्यारोहणातले आमचे सर. हिमालयात जाऊन माउंटेनियरिंगचा बेसिक कोर्स करून आलेले. त्यामुळे तोच वादातीत लीडर होता. त्याच्या मागोमाग आम्ही ११:१५ वाजता वाडीत उतरलो. ताक-चहा होऊन फ्रेश झालो. एक वाटाड्या घेतला. फक्त शर्ट, गुंडाळलेला टॉवेल, पायात स्लीपर आणि एक काठी असे 'ट्रेकिंग गियर' (?) असलेले काका होते ते... गणपत काका. त्यांच्या गतीने चालताना आमची चांगलीच दमछाक होत होती. पण डीडीला जोश चढला होता. काहीही करून एक वाजता पदरगड गाठायचा त्याचा निश्चय होता. तसाच भराभरा तो चालतही होता. एके ठिकाणी झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन आम्ही एका पठारावर आलो. तिथून समोर अर्धा डझन धबधबे आणि शिडी घाट दिसत होता. काही खांडसहून येणारे वीर घाट चढत होते. डावीकडे पदरगड सामोरा आला होता. दूरवरूनही त्याची गुहा स्पष्ट दिसत होती. आम्हांला तिथे पोचायचे होते. दृश्य एकदम स्फूर्तिदायी आव्हान देणारे. मग आम्ही भरभर पुढे निघालो.

आता खांडसहून येणारी वाट सोडून आम्ही पुन्हा डावीकडे वळलो. प्रदक्षिणा अर्धी झाली होती. अजून थोडे अंतर चालून निबीड जंगलात शिरायचे होते. साडेबाराच्या सुमारास आम्ही दाट अरण्यात घुसलो. गच्च झाडीतून वाट कढत काका पुढे आणि आम्ही मागे चाललो होतो. अंगाला झाडे घासून ओरखडे उमटत होते. आता सपाट जमीन संपून खडी चढण लागली. निसरडी चढण आणि दाट गवत यांनी काम आणखी अवघड केले होते. मला आणि सिड’ला कमी वजनाचा फ़ायदा होत होता. लहान लहान झुडपांचा आधार पण पुरेसा होता. पण बाकी मंडळी शर्थ करून वर येत होती. प्रत्येक पाच फुटांवर एक फूट खाली घसरण्याचा कार्यक्रम चालला होता. अर्ध्या तासात एका लहान कातळाला वळसा घालून आम्ही एक अरुंद खिंदीत येऊन पोचलो. एका वेळी एका व्यक्तीला कसेबसे रहता येइल एवढीच जागा होती तिकडे. लहानसे भुयार दुसऱ्या बाजूने वर आले होते. आम्हांला गणपत काकांनी सांगितले की ती दुसऱ्या बाजूने येणरी अवघड वाट होती. इथून पुढे आता फ़ार काळजीपूर्वक चढाई करावी लागणार होती. समोर ७०-८० अंशाची २० फूत उंच खडी कातळभिंत होती. एकही चूक करायला जागा नव्हती.

डीडी’ने सांगितले मला चढायला जमेल पण उतरणे अवघड होइल. मग उगाच बाकीच्यांना अजून त्रास होण्यापेक्षा मे इथेच थांबतो. आपल्या मर्यादा ओळखून वागणारे असे खरे ट्रेकर्सच ट्रेक यशस्वी करत असतात. (आणि मर्यादा न ओळखणारे ट्रेकचा बट्ट्याबोळ). या निर्णयाबद्दल डीडीचे अभिनंदन करून आणि त्याच्यासाठी पाण्याची बाटली ठेवून आम्ही कड्याला भिडलो. ठिसूळ झालेल्या खडकामुळे काही होल्ड्स धोकादायक बनले होते. त्याचा अंदाज घेत तो रॉक पॅच पार केला आणि एका रिजला लहानसा ट्रॅव्हर्स मारून वर निघालो. वर कही अंतर चलून गेल्यावर पुन्हा कडा उजव्या हाताला घालून, चालत राहिलो.

पुन्हा एक अति अरुंद बेचके आले. पण हे जरा जास्त अवघड होते. शेवाळलेले खडक, पाय ठेवायला होल्ड नाही आणि हात धरुन ग्रिप घ्यायला निसटणारे दगड. त्यातल्या त्यात आधार म्हणून एक पक्के झाड उगवले होते. मे झाडाखालून त्या बेचक्यात घुसून वर चढण्याचा प्रयत्न केला. पण तसे करताना हात धरलेला एक साधारण १५ किलोचा दगड निसटून हातावर आला. तो सोडून द्यावा तर खाली आमचेच सवंगडी होते, त्यांन धोका होता. कसाबसा तो बराच वेळ धरून ठेवला आणि सगळ्यांन सावध करुन तो सावकाश सोडला. पण त्यात थोडे मनगट दुखावले. आता घाई करणे गरजेचे होते. मी दोन्ही हात कोपरावर टेकून जोर देऊन पाठीच्या आधारे वर सरकण्याचा प्रयत्न केला. पण काही जमले नाही. मग ध्रुव झाडावरुन जाऊन मग कोरड्या खडकावरुन बेचक्याच्या वर पोचला. एकएक करत मग सगळे वर आले. आता तर सरळ-सरळ खोदीव पायऱ्या होत्या. पण त्यानंतर खूप गवत माजले होते. ते काठीने झोडपत रस्ता कढत आम्ही चाललो होतो. एक पाण्याचे टाके दिसले. आमची चाहूल लागून चार फुटी घोरपड (Monitor Lizard) पाण्यातून निघून डोळ्याचे पाते लवते न लवते तोच गवतात दिसेनाशी झाली. माथ्यावर एक उघड्यावर मंदिर आहे भैरवनाथाचे. दर्शन घेऊन पुढे झालो. एरवी उजाड असलेला माळ छातीएवढ्या गवताने लादला गेला होता. आम्हाला त्या गुहेपर्यंत जायचे होते.


वाटेत दोन पाण्याची टाकी लगली. त्याच्या काठावरुन पुढे जायचे होते. पण एका बाजूला टाके आणि एका बाजूल चार-पाचशे फूट दरी. फार सावधानतेने जावे लागते. शेवटी एकदाची ति गुहा आली. आणि थोडे हायसे वाटले. तिथे पोचताच क्षणी जमिनीवर अक्षरश: लोळण घेतली. चौघेही फार दमलो होतो. पण दुर्दम्य आत्मविश्वास, टीमवर्क आणि सह्याद्रीची ओढ इथपर्यंत घेऊन आली होती. ज्यो आमचा राजेश खन्ना बनला होता. त्याने हार्मोनिकावर काही धून वाजवल्या आणि नंतर आम्ही सर्वांनी त्या दरीत शिवगर्जना घुमवली....

"प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज.... की जय!!!

जय शिवाजी, जय भवानी!!!
जय भवानी, जय शिवाजी!!!
जय शिवाजी, जय भवानी!!!
जय भवानी, जय शिवाजी!!!
"
आता डीडी एकटा बसला असेल आणि आम्ही लवकर गेलो नाही तर घाबरुन जाइल म्हणून आम्ही झपझप परत फिरलो. १५ मिनिटांत पोचलो. तो थोडा वानरांच्या आवाजाने दचकला होताच. दचकणारच न त्या तशा जंगलात? आभाळ भरुन आले होते. पावसाची शक्यता होती. त्याच्या आधी आम्हाला पदरवाडीत तरी पोचणे गरजेचे होते. मग आम्ही उतरायची वाट धरली. उतरणे पण अवघडच होते. पाय घसरण्याची आता सवय झाली होती. ध्रुव, किणी आणि डीडी 'ग्रास स्किइंग' करत उतरत होते. कसेबसे खाली पोचलो आणि पदरवाडीची वाट कापु लागलो. पोचायला ४ वाजले. अजुन कमीत कमी २ तासांची चढण होती भीमाशंकरपर्यंत. तिथे बरोबरचे खाऊन घेतले. आता पाय आणि गुडघे बोलायला लागले होते. अर्धा तास विश्रांती घेऊन आम्ही चढाई सुरु केली. पण आता उभी चढण जीवावर आली होती. प्रत्येक ५०-१०० पावलांवर बसावे लागत होते. सगळ्यांचीच ’लागली’ होती- वाट. मध्येच ध्रुवला आम्ही काही तरी पदरगडावर परत जाऊन दाखव, किंवा एकाला उचलून भीमाशंकरला पोचव अशा अशक्य पैजा लावून 600mm, 800mm लेन्स देण्याचे कबूल करत होतो. पण त्याने चांगला चान्स सोडला. काहीच केले नाही. सूर्यनारायण आपला दिवसाचा प्रवास संपवीत नभांगण रंगीत करून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंगाखांद्यावर ढगाचे पुंजके नाचवत होता. पाठीमागे पदरगड त्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाला होता.




शेवटी अंधार पडता पडता पूर्णपणे थकलेले जवान संध्याकाळी ७:०० वाजता भीमाशंकरला पोचलो. भूक मेली होती, लगेच खाणे योग्यही नव्हते, म्हणून चहा आणि सगळ्यात मिळून एक Chilled भजी घेऊन आम्ही स्वतःला ड्रायक्लीन करुन गाडीत बसलो. डीडी’च्या डिओचा खुप उपयोग झाला :-)

सगळ्या ट्रेक्स मधल्या रथी-महरथी आणि अतिरथींनी मान्य केले की आजचा साडेनऊ तासांचा ट्रेक आतापर्यंतच्या ट्रेक्सपेक्षा ’जरासा’ अवघड होता. पण नशीब पाऊस आला नव्हता. नाहीतर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते.

तोरणा एवढा आहे चढायला? नाही... तोरणाच्या फक्त तिप्पट आहे...!!!

येताना किणीने कुठली कार घ्यावी यावर वाद-विवाद सत्र झडले. त्याचे रुपांतर मग Financial Planning session मधे झाले. पण सिड आणि माझे एकमत होते, जी गाडी पदरगडावर जाईल तीच गाडी भारी. ज्यो मधेच आम्हाला ट्रेक मधे नॉट आऊट राहणे म्हणजे काय याचे मौलिक विचार देत होता. मंचरला पोटाची आग रात्री ९:०० वाजता विझवली. आणि परत गाडी पुण्याकडे बुंगवली.

पुण्यात पोचल्यावर गाडीतून उतरताना पण मी सूचना देत होतो, हा आता पाय खालच्या होल्ड वर ठेव... पक्का बसला..? मग हात सोड... हा आता उतरलाच... बास झालंच...!!!

ज्यो’च्या भाषेत मी भैसटलोय... खरंय पण, रांगड्या सह्यद्रीच्या प्रेमाने आम्ही सगळेच भैसटलोय...!!!


Fact file:

Name: Padargad Fort aka Kalavantinicha Mahal

In Bhimashankar Ranges of Sahyadri.

Difficulty Level: Medium to Ddifficult.

Base village: Padarachi Waadi.

Route: Pune-Nashik Road-Manchar-Bhimashankar-Trek down in the valley to Padarachi Waadi and climb to Padargad.

OR Mumbai-Karjat-Khandas-Ganesh Ghat-Padarachi Waadi-Padargad

Distance: around 120km from Pune.

Tips: tips: Avoid during rainy season. Carry own food after Padarachi Waadi. Have proper guide from the village. Do not attempt without guide because of dense forest.

Stay: Can be done in Bhimashankar or Padarachi Waadi

Surrounding: Peth Fort aka Kothaligad, Bhimashankar sanctuary.

Related Posts

13 comments:

  1. ध्रुव21 September 2009 at 23:23

    महान!!!!

    ट्रेक परत अनुभवला. बर्‍याच वेळा मी एकटाच हसत होतो ट्रेकच्या आठवणींनी आणि ऑफिसातले एक दोन जण माझ्या खुराड्यात डोकावुन 'हुकला की काय' असे भाव दाखवत गायब झाले.
    ट्रेक, फोटो, ब्लॉग सर्वच झकास. पुढच्या लाँग विकेंड पुरती रग नक्की जिरली :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. Vaibhav22 September 2009 at 01:18

    मित्रा हा ट्रेक चुकला माझा.. पण मी न येणे prefer केले असते कारण दोनदा भीमाशंकर केला मुंगी घाटातून वरती जाताना कुत्रा हाल खात नाही खूप वाट लागते त्यात तुम्ही महान लोकांनी मुंगी घटून उतरून पदरगड चढला आणि परत मुंगी घाटातून भीमाशंकर.. मी आलो असतो तर तिकडेच समाधी घेतली असती :-)
    फोटोस एकदम वरचा क्लास रे..तोड नाही तुला

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. रोहन चौधरी ...22 September 2009 at 02:18

    मस्त पंकज ... ह्याला म्हणतात चाबुक असे मात्तबर लिखाण ... लिखाणाची ओघवती शैली आणि त्यात 'जेवाय-जेवाय' , 'गाडी नाशिक हायवेवर बुंगवायला सुरुवात केली, 'टिपिकल नाशिक स्टाईलचे पार्किंग केलेले डोंगर' ह्या आणि अश्या अनेक वाक्यांनी मज्जा आणली वाचताना एकदम ... :)

    संपूर्ण ट्रेकची अचूक - मुद्देसुद माहिती आणि सोबत नेहमी प्रमाणे अप्रतिम अश्या फोटोंची जोड़. मी हे असे ट्रेक्स मिस करतोय ह्या सीझन मध्ये :( कधी करणार आपण ट्रेक एकत्र ???

    खरंय यार, रांगड्या आणि तितक्याच उत्तुंग सह्याद्रीच्या प्रेमाने आपण सगळेच भैसटलोय...!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Pankaj - भटकंती Unlimited22 September 2009 at 02:55

    @धुरड्या, मस्त ट्रेक झाला. खरंच रग जिरली. पण तू ६०० मिमिचा चान्स घालवलास लेका.

    @वैभव मित्रा, हा ट्रेक हा एवढा लावेल माहित नव्हते कुणालाच. तोरणाएवढा आहे असे ऐकीव माहितीवर गेलो होतो. रस्ता थोडाफार माहीत होता. पण प्रत्यक्षात तिप्पट निघाला. ’सिड’सारखे भले भले वस्ताद कबूल झाले की हा ट्रेक "जरा" स्पेशलच होता.

    @रोहन, आपला प्लॅन आहेच की ऑक्टोबर मध्ये... तू ये तर खरा...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. भुंगा23 September 2009 at 22:42

    अरे वा!
    सॉलिड लिहिलय, राव! अगदी तुमच्या बरोबर ट्रेक करतोय असं वाटलं. ते 'जेवाय - जेवाय' अगदी 'गाई-गाई' करतात तसं वाटलं ;)
    फोटोबद्द्ल तर - नाद करायचा नाय!

    हां एक मात्र - जो पर्यत तुझी हिट - विकेट जात नाही तो पर्यंत अशीच गाडी बुंगवत ट्रेक कर!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Binary Bandya16 December 2009 at 01:07

    'टिपिकल नाशिक स्टाईलचे पार्किंग केलेले डोंगर'
    गड्या सह्यद्रीच्या प्रेमाने आम्ही सगळेच भैसटलोय...!!!

    खरेच छान लिहले आहे...
    फोटो पन छान...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. मुर्खानंद16 December 2009 at 01:35

    lay bhari... mala padargad cha trek karaychay... sobat nahi milat... bhimashankar kelaay baryachda...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Pankaj - भटकंती Unlimited24 January 2010 at 10:13

    "सूर्यनारायण आपला दिवसाचा प्रवास संपवीत नभांगण रंगीत करून निघाले होते. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंगाखांद्यावर ढगाचे पुंजके नाचवत होता. पाठीमागे पदरगड त्या संधीप्रकाशात न्हाऊन निघाला होता."

    वा पंक्या... अरे काय लिहून गेलायेस. परत कधी जमेल रे अशी पोस्ट तुला?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Vrinda11 May 2010 at 08:16

    Chan lihila ahe.. trekla jaun aalyasarkha vatla ani malach thakava ala.. :))

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. विक्रम एक शांत वादळ13 May 2010 at 03:02

    Chilled भजी haha

    mast lihale aahes re nehmipramanech

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Latesh Bhure3 July 2014 at 19:06

    Khup Chan...
    Mi Dar Varshi 2 vela bhimashankarla jato...
    1. Mahashivratra
    2. Shrawan
    Khup maja yete pan aaj paryant kadhi Padargad la gelo nahi karan amchya group tasa konich nahi.
    Mast Khup Chan Lihile aahe.. I LIKE......

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Rahul Shah4 July 2014 at 00:15

    Khupc Chan lihilayes Mitra>>>>>> mala ajun ha trek karaychyay>>>>>>> konachi icha asel tr sanga.......

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. हर्षदा27 December 2016 at 06:26

    Blog मस्त 👌

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1