पुन्हा एकदा पाबे घाट...
या वीकेंडला शनिवारी काही दूरचा प्लान करणे शक्य नव्हते. शनिवारी सकाळी फोटोग्राफर्स@पुणेची मीट सकाळी होती. संभाजी बागेत बरेच रथी-महारथी-अतिरथी फोटोग्राफेर्सशी भेट झाली. नोव्हेंबरच्या प्रदर्शनाची माहिती आणि इतर अपडेट्स सगळ्या मेंबर्सना दिले. शिवसागरमध्ये साउथ इंडियन चापले.
नंतर काही स्पॉन्सर्सच्या गाठीभेटी घेता घेता अकरा वाजले.चैतन्यची नविन कार आम्ही अशी थोडीच सोडणार होतो. एक लॉंग ड्राइव्ह तर पाहिजेच ना...
सौमित्रच्या नविन महाली कॉफी घेऊन मी, सौमित्र, सुहास आणि चैतन्य निघालो. साधारण दुपारी एक वाजता निघालो. थोडाच वेळ आहे म्हणून पाबे घाट ठरला. माझ्या आधीच्या ट्रिपमध्ये मस्त फोटो मिळाले होते. आजपण तशीच आशा होती. सिंहगडाच्या पायथा आजकाल मस्त सोनकीच्या फुलांनी सजलाय. एका ठिकाणी अशीच खूप फुलं दिसली. मधमाश्या पण मकरंद टिपायला आल्या होत्या. गडावर ढगांचे आच्छादन जमून आले होते.
खानापूरनंतर लगेच एक रस्ता डावीकडे वळतो. तोरण्याकडे जाणारा हच रस्ता आहे. पुढे दाट झाडीमधून काही ब्लाइंड टर्न्स घेत एका लहान वाडीजवळ पोचतो. तिथे एक काका गुरे चारत होते. छानपैकी छत्री घेउन बसले होते. आम्ही थोडेच अशी फ्रेम सोडणार होतो. मग तिथे थांबून काही फोटो घेतले. पुन्हा एकदा मधमाशी अणि काही रानटी फुलांचे फोटो मिळाले.
चैतन्यची गाडी पण फोटो काढायची सोडली नाही आम्ही...!!!
तिथून पुढे निघालो आणि अवघड वळणे असलेला पाबे घाट ओलांडून खिंडीमध्ये आलो. पलिकडच्या दरीमध्ये छान उन पडले होते. पुन्हा एकदा फोटो सेशन झाले. आता सुहासला भूक लागली हे जाणवत होते. कारण त्याचे पीजे चालू झाले होते. कुठलीही गोष्ट तो गाणे म्हणुन सांगत होता. तो एकदमच पेटला होता. जास्त वेळ घालवण्यात आता रिस्क वाटत होती.
तोरणा पायथ्याला जाऊन काही फोटो काढले. परत फिरलो. येताना एके ठिकाणी भात खाचरावर असे काही सुंदर ऊन पडले होते की आपोआपच गाडीला पुन्हा ब्रेक लागले. सुहासच्या तोंडून असे काही शब्द बाहेर पडले की ते ऐकायला शेवटी "हिमेश" असे वाटले. आता नविन लेन्सला नेहमी शिव्या देणारा सुहास तिची तारीफ करत होता.
आज आम्हाला प्रशंसा करण्यासाठी दोन की वर्ड्स मिळाले होते... "मनी माय... " आणि "नाजूक तुरा..." म्हणजे फारच छान...!!!
येताना खडकवासला धरणाजवळ पोटात काही तरी टाकले आणि पुण्याकडे परत आलो.
छोटीशी ट्रिप एकदम "नाजूक तुरा" झाली...!!! :-D

पंकज ... फोटो चाबूक आले आहेत नेहमी प्रमाणे ... :) आता आपण एकत्र ट्रेक कधी करतोय त्याची ओढ लागली आहे मित्रा ... :) भेटूच लवकर ... !
ReplyDeletePankya ... Bhaari plan hota. I was tempted too! But somehow resisted the urge :P
ReplyDelete... btw toh fields and clouds cha foto kamaal ahe!!
अरे भाऊ, एखादा तरी विकेंड घरी थांबत जा...;) आता तो बाइक प्लान ही असेल ना? ह्म्म - फोटो सॉलिड आहेतच - नेहमीप्रमाणे ;)
ReplyDeleteहो ना रे... पण काय करू? घरात बसवतच नाही वीकएंडला. तरीही फार कष्ट करून रविवार घरात काढला. जरा बाईक ट्रिपसाठी वातावरण निर्मिती करतोय. त्यात त्या प्रदर्शनाची तयारी पण जोरात चालली आहे. वीकएंड आजकाल पुरत नाहीत. एका आठवड्या मध्ये २ वीकएंड का येत नाहीत? :-D
ReplyDeleteसुंदर आले आहेत फोटो..
ReplyDeleteRight balance of photos & prose.
ReplyDelete