कळसूबाईचा ’नादखुळा’ ट्रेक
शुक्रवारच्या रात्रीचे साडेबारा झालेत. म्हणजे शनिवार लागलाय तसा. बस शिवाजीनगरवरुन निघून नाशिक फाट्याला पोचलीये. एक-दोन लोक आणखी गाडीमध्ये चढले (आणि माझा शेवटच्या सीटवर जाऊन झोपण्याचा बेत फसला). कंडक्टर उगाचच टिक-टिक करतोय. सुट्ट्या पैशांवरून वाद चालू केला होता, पण आवरता घेतला.
कळसूबाई शिखर सर करायचा खूप दिवसांपसून मानस होता. पण योग जुळून येत नव्हता. शेवटी एकदाचे मीच ठरवून सगळ्यांना मेल केली. काही लगेच तयार झाले. काही ऐन वेळी गळाले. काहींनी शेवट्पर्यंत जमवण्याचा प्रयत्न केला. पण या रिसेशनच्या पिरीयडमध्ये आले कंपनीच्या मना, बिचाऱ्या मित्राचे काही चालेना. शेवटी चार लोक ’लॉक किया जाय’ असे म्हणाले. वैभव, संदीप, गणेश असे सगळे रांगडे कोल्हापुरी ’नादखुळा’ स्टाईल गडी आणि त्यात पुणेरी मी. पण सगळे एकजात डाय हार्ड सह्याद्रीचे फॅन. गूगल वरुन माहिती काढली. रात्री उशिराच्या बसने संगमनेर आणि तिथून पहिल्या बसने पायथ्याचे गाव, बारी गाठायचे नक्की झाले. एसटीच्या वेबसाईटचा बराच उपयोग झाला (होय, ST, ज्याला तुम्ही-आम्ही लाल डब्बा म्हणतो, हाय-टेक झालाय आता).
राजगुरुनगर ओलांडून पुढे आलोय आता. चार-पदरी रस्ता संपलाय. आता दुपदरी रस्त्यावर वेग कमी होईल. तेवढेच आम्ही संगमनेरला थोडे उशिरा पोचू. म्हणजे स्टॅंडवर रात्र जास्त काढवी लागणार नाही. डोळ्यांवर पेंग आलीये. रस्ता खराब असल्यामुळे टाईप करायला पण कसरत करावी लागतेय. त्यामुळे आता बाकी ब्लॉग परत कधीतरी लिहीन.
च्यायला, ड्रायव्हर काका जरा जास्तच जोरात आले वाटते. पहाटेचे तीन वाजलेत आणि आम्ही संगमनेर स्टॅंड वर पोचलोय. पहिले काम केले ते कसाऱ्याला जाणाऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहिले. साडेसहाला पहिली गाडी. म्हणजे तब्बल साडेतीन तास काढायचेत. एका चहा च्या टपरीवर पायधूळ झाडून झाली (चहा अगदीच फुळकवणी होता). पण अजुनही तीन तास शिल्लक आहेतच. आत थोड झोपायचा प्रयत्न करतो. पण च्यायला, पलीकडे त्या दोन पोरांना मोबाईलच्या सगळ्या रिंगटोन ऐकायची खाज आलीये या वेळी. पण डुलकी लागेलसे वाटतय.
चार वाजत नाहीत तोच स्टॅंड वर कोलाहल सुरू झालाय. परत एक चहाचा हप्ता झालाय. लेटेस्ट माहितीवरुन आता सहा वाजता बस आहे असे समजले. पेपरवले, सामूहिक दंतमंजन करनारे १५-२० बिहारी मजुरांचे टोळके आदींनी सकाळ झाल्याची खात्री करुन दिली.
एकदाची कसारा बस आली. जागा तर मिळणारच ना. एवढ्या सकाळी सकाळी कोण जातय कडमडायला. कंडक्टरला ’बारी’ हे स्टॉप चे नाव सांगताच त्याने ’हे आणखी काही वेडे आलेले दिसतात’ अशा नजरेने पाहिले. हिरव्या शेतांच्या मधून जाणाऱ्या भन्नाट रस्त्याने लाल डब्बा धावू लागलाय. आमची मंडळी निसर्गसौंदर्य न्याहाळण्यात मग्न होऊन गेलेली दिसतात. जसजसा रस्ता मागे पडत गेला तशी सह्याद्रीची ऊंची वाढत गेली. ऊसाची शिवारे जाऊन भातखाचरे दिसू लागली. हवेत गारठा वाढला. आकाशात कुंद ढगांची दाटी दिसते आहे. काही पावसाच्या सरी पण पडून गेलेल्या दिसतायत. बसमधून दिसलेले एक गाव, दर्याची वाडी, मला विशेष आवडले. तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, पायथ्याला ग्रीन कार्पेटवाली भाताची खाचरं, कड्यांवरुन कोसळणारे पाच-पंचवीस धबधबे, कुणाला आवडणार नाही?
अकोले, राजूर, भंडारदरा करत शेवटी एकदाचा कंटाळवाणा (बसून बसून कंटाळा येतो ना...) प्रवास संपला आणि चार वेडे बारी या गावात उतरलोय. सर्वत्र सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर जरीचा हिरवा शालू नेसवावा तसा भास होत होता. अवखळ लहान निर्झर आणि मोठे धबधबे यांनी जणू त्यावर वेलबुट्टी कढली आहे. मन अगदी प्रसन्न झालय. मी सोडून बाकी मंडलींनी shortpants चढवल्या. शेतांच्या कडेकडेने घुमवलेल्या डांबरी सडके वरुन आम्ही रस्ता तुडवत गावाच्या दिशेने चालू लागलो. गावात जण्याआधीच एक सदगृहस्थ भेटले ज्यांनी आमची चहा आणि नाश्त्याची सोय केली. मग तिथेच दुपारच्या जेवणाची ऑर्डर देवून आम्ही शिखर चढायला सुरुवात केली.
सुरवातीला एक ओढा लागला. गुढग्याइतके ते पाणी ओलांडून आम्ही पुढे निघालो. थोडे अंतर चढून गेल्यावर उजव्या हाताला एक मंदिर पाहिलेत? हेच ते कळसूबाईचे मंदिर. सामान्य (की आळशी?) भक्तांसाठीच जणू ती खाली येऊन राहिली असावी. मी किंवा संदीप लीड घेउन पुढे वाटचाल करतोय. एक शिलेदार, गणेश थोडा थकलाय. वैभवला त्याला घेऊन यायचे काम दिलय. आम्ही वरुन कम ऑन गणा, गणपती, गजानन, गणपा असे काहीबाही बोलून त्याचा उत्साह वढवतोय. पण या गड्याचे मला विशेष कौतुक वाटतंय की हा एकदाही अजून तुम्ही जा, मी बसतो असे म्हणाला नाही. म्हणजे तो पक्का प्रयत्नवादी आहे याची खात्री पटली.
चढण संपली की एक लहान पठार आले. इथे काही वेळ थांबलो, पाणी, दीर्घ श्वास झाले. इथेच shortpant वाल्यांना कसल्या तरी मच्छरांसारख्या लहान कीड्यांनी छळले. चावलेल्या जागी चांगले लाल झाले होते. पण काळजीचे कारण नाही. किरकोळ होते. लवकरच तिथून उठलो मग. आणि मग तिथला स्पेशल शिडी सिलसिला सुरू होतो. पावसाने थोडे काम अवघड केलय खरे इथे. पाय जपून टाकावा लाग्तोय, सटकला तर कपालामोक्षच, किमान दोन दातांची तर आहुती नक्कीच. काही शिड्या दगडी पायऱ्या लोखंडी रेलिंग अशा आहेत तर काही पूर्ण लोखंदी २ इंची angle मध्ये बनवलेल्या. काही ठिकाणी पायऱ्यावरुन पाणी वाहतंय. आणखी दोन वेळा पठारं आणि चढण असे केले की असे वाटते बास आत पोचलोच. पण अजूनही मोठी चढाई बाकी आहे. थकलेला जीव आता मात्र मेटाकुटीला आलय. मग मात्र एक क्षणभर विश्रांती घेउन पाणी पिउन ताजेतवाने व्हावे. अशा वेळी कुठलेही वाहते स्वच्छ पाणी अम्रुतासमान असते. (आणि मे तेच पितो. मला कसलेही पाणी चालते आणि पचते. बिसलेरीचे नखरे नाही पटत. वेळप्रसंगी चहाच्या रंगाचे पण पाणी पिलोय, वीस रुपयांत मिळणारे लिक्विड क्लोरीन बरोबर ठेवायचे). नव्या जोमाने चढाई सुरु केली आता. बास आता थोडेच बाकी, आलेच असे म्हणत शेवटल्या कस काढणाऱ्या शिडीला आपण भिडतो. साधारण ५० पायर्यांची आणि ७० फूट लांब ही शिडी कळसूबाई म्हणजे खायचे काम नाही याचेच प्रत्यंतर देते. ती एकदा पार केली कि फत्ते, जय हो, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय काहीही म्हणा. शब्दशः स्वर्ग चार पावलांवर येतो. नेहमी फोटोमध्ये पाहिलेले, ब्लॉग वर वाचलेले कळसूबाईचे मंदिर प्रत्यक्षात दिसते. साक्षात स्वर्ग.
काही क्षणांत गणेशराव आणि वैभव पण येउन पोचले. आम्ही काय काय करतोय. सैरावैरा पळतोय, मोठ्याने आरोळ्या ठोकतोय, तिथल्या घंटा बडव बडव बडवतोय, वारा पिऊन घेतोय, हवेत उडता येते क ते चेक करतोय, दंडाच्य बेंडकुळ्या फुगवून पोज देतोय आणि असे बरेच काही. ढग फार असल्यामुळे फोटोचे काही खरे नव्हते पण थोड्या वेळातच ती ढगांची चादर हटली आणि काही सुंदर नजारे कॅमेरामध्ये कैद करता आले.
चला बरोबरचा शिधा खाऊन घ्या आणि परतीच्या प्रवासाला लागा. पुढल्या भटकंतीचे बेत आखत.
(सम्यकचा फोन आलाय खरं, उद्या रविवारी केंजळगड आणि रायरेश्वरला येणार का म्हणून. पाहूया काय होतय ते... गेलो तर इथे लिहीनच)

Fact file:Place: Kalsubai PeakHeight: 5400ft from MSLBase village: Bari, Tehsil: Akole, Dist. Ahmednagar, MH, IndiaRoutes:a) Pune-Narayangaon-Alephata-Sangamner-Akole-Rajur-Bari.b) Mumbai-Kasara-Igatpuri-Ghoti-Bari.Difficulty level: Medium-HighEndurance level: HighTips: Carry enough water in non-monsoon season, be careful on ladders in monsoon. Plan enough if you are traveling by public transport. Refer ST website.Good motorable road till the end.Don't miss the famous Randha falls if you are going by own private vehicle.
jamala ahe ha blog :)
ReplyDeletemasta varnan. Zopetun uthalya uthalya Tilakcha fakkad chaha milato na tashya office madhe alya alya bolog wachun junya athavani tajya jhalya.
lihit raha
पंकज भावा!
ReplyDeleteअरं काय लिहिलयंस! झक्कास !
एक सांगू.... तुझ्या काही इंग्लिश पोस्टही वाचल्यात पण त्याला मराठीची सर नाही... राग मानु नकोस.. कदाचित आमची झेपच तेवढी नसल! असो.
ही पोस्ट मस्त वाटली... अगदी नाद खुळा!
Pankaj,
ReplyDeleteEak # lihale ahe re...
jar mala knoi jari fakt vichrle kalsubai ch trek kasa hota...tar me evdhe sagle detail maddhe sangu pan shaknar nahi :)
Bhannat ahe mitra !
ReplyDeleteEkdam Shollid !
भुंगा, इथून पुढे मराठी मध्येच लिहिण्याचा विचार आहे.
ReplyDeletesimply amazing photography ..!!!
ReplyDeletejust awesome ..!! especially that flying pic..
Apratim varnan....best of luck for ur very bright future!!!
ReplyDeleteपुन्हा फक्कड़...
ReplyDeleteब्लॉग वाचला की पुन्हा inspiration येते अणि वीकएंड पहाटे पहाटे गाडीला किक मारावी लागते...
hi PAnkaj...
ReplyDeletear kaay bhannat foto kadhale aahet...
lay bhaari !!
pankaj tu aani tuzya mitrani aata kalsubai shikhar sar kele, mast vatale, tumcha ya bhatakantila mujara.......!
ReplyDeletetumhas aaj ek upadhi deoo ichito "Sahyadri Giri Raj"......
from--
Sandesh P. Bankar
sandeshbankar@yahoo.co.in
call-- 9922166881
.