आजूबाजूच्या रित्या खुर्च्या...
आज एक मैत्रीण कंपनी सोडून गेली. अचानक रिकामे रिकामे वाटू लागले सगळ्या ग्रूपला. तशी ती सोडून जाणार हे सगळ्यांना माहीत होते. 7-8 महिन्यांपूर्वीच तिचे लग्न झाले तेव्हा ती एक दिवस जाणार हे गृहीत धरले होते. तरीही नवरा मुंबई ला आणि ती पुण्यात अशी सर्कस करत 8 महिने ओढले. पण एक दिवस अचानक हातात दुसरा जॉब नसताना तिने फायनल रिज़ाइन करायचे नक्की केले. तिचा निर्णय कठीण आणि योग्य होता हे माहीत असूनही आम्हाला कुठेतरी काहीतरी पटत नव्हते. शेवटी आजचा दिवस आलाच.
आणि मग मागचे काही दिवस आठवले. निखळ मैत्रीचे. 5-6 जण असूनही काही आम्ही फारच उत्साही आणि गप्पिष्ट. तीन वर्षांपूर्वी तिने आणि अजुन एका मैत्रिणीने बरोबरच जॉइन केली कंपनी. मी फक्त एखादा महिनाभर सीनियर असेन. आली त्यानंतर दुसर्या दिवशी घड्याळाचा मेटल बेल्ट अडजस्ट करुन द्यायच्या निमित्ताने (पहिली मनातल्या मनात टिपिकल MH-12 प्रतिक्रिया होती, येत नाही तर घ्यावे कशाला असले घड्याळ) ओळख झाली. आणि नंतर ती ओळख मैत्री झाली.तीन वर्षे खूप सही गेली.
प्रत्येकाला प्रत्येकाची सिक्रेट्स महिती असायची. मशिनची कॉफी बकवास लागते म्हणून सॅशे एकदाच ढीगभर आणून शेअर करायचो. सॅशे नसले तर कुठून तरी पैदा करायचेच. कुणी बिझी असले तरी जेवयला, कॉफीला वाट पहायचीच. लंचला स्वीटसाठी एकेकाच्या चमच्यातून ओढून पळवून खायचो. ऑफिसमधली एकही व्यक्ती आमच्या नजरेतून कमेंटशिवाय सुटली नाही. लोकांची चालण्याची स्टाईल, कपडे, गॉसिप्स सगळ्यांवर कमेंट केलीच पाहिजे हा नियम. कॉफी टेबल ही तर सगळ्यांचे आयुष्याचे इश्यु डिस्कस करायची जागा. लंचनंतर बाहेर फेरफटका पण ठरलेला असायचा. मी काढलेले सगळे फोटो तिला कधीच आवडले नाहीत. काही तरी नवीन काढ की म्हणे. पण encourage पण तेवढीच करणार. नवरा फायनान्समध्ये आहे म्हणून सगळ्या गोष्टी समजावून घ्यायला ही बया नेमाने ET, FinExp वाचणार आणि मी ToI. पण कॉमिक स्ट्रिप्ससाठी माझा पेपर हिसकावून घेणार. नवीन शॉपिंग एकमेकांना हौसेने दाखवणार. वीकेंडला कुठे भटकला ते विचारणार. ’तिला’ का फिरायला नेत नाही म्हणून ओरडणार पण.
पण आज गेली. जाताना तिला बजावले की मागे वळून पाहू नकोस. पण ऐकेल तर ना. ती गेल्यावर उरलेले आम्ही उगाचच एकमेकांना नॉर्मल चेहरा दाखवायचा प्रयत्न करत होतो. नंतरची कॉफी पण कशीबशी पोटात ढकलली. एकमेकांशी एक शब्दही न बोलता. साला फ्री टेबलपण असा मिळाला ना, खूप साऱ्या खुर्च्या रिकाम्या होत्या बाजूला. अजून रितेपण जाणवले. असे वाटत होते की सगळे आमच्याकडेच पाहत आहेत, आमचा छोटा झालेला ग्रुप.
असो, सहवास नसला तरी मैत्री थोडीच कमी होणार? तिला खूप साऱ्या शुभेच्छा...!!!

हुम्म..! पटतंय... एवढे दिवस सोबत काम करणारं कोणी सोडुन गेलं की मन भरुन येणारच... मात्र त्या रिकाम्या खुर्च्या .... गेलेल्यांच्या आठवणींना पाणी घालतात!
ReplyDeleteसुरेख लेख!!!
ReplyDeleteFirst Class ! भट्टी छान जमली आहे.
ReplyDeletemasta lihila ahes re...
ReplyDeleteमाझ्या ब्लॉगवर लिंक दिलीस म्हणून बरं झालं...खरंय...एखाद्या ठिकाणी ग्रुप जमतो आणि मग एखादा मेंबर गळाला की खरंच कसंतरी होतं...छान लिहिलंस...
ReplyDeleteआपल्याला मिळालेलं आयुष्य हे खुप लहान आहे, कित्येक नविन गोष्टी मिळतात, सोडून जातात, सुख-दु:ख दोन्ही गोष्टी पचवणंच तर जीवन आहे. प्रत्येक गोष्ट आनंदानं पॉजिटिव्हलि जगणं हे महत्वाचं... BTW, पंक्या, तुझ्या त्या मैत्रिणीच्या नवऱ्याने हा लेख वाचला का?? ;-)
ReplyDeletekhoop ch chhan lihilaay lekh
ReplyDeletemi hi gelya ch mahinyaat company change keli
aani tya aadhi 2 warsh amacha 6 jannancha khoop chhan group tayar zala hota
lekh wachatana itak sagaL relate hoat hot
aata junya company madhalya sagalyanchi khoop athawaN yete aahe
:(
ReplyDeleteKhupch Chan Lihlay bhari....
ReplyDelete