गिर्यारोहण आणि सुरक्षितता
Courtesy Suhas Joshi (Loksatta)
गिर्यारोहण आणि सुरक्षितता गेल्या आठवडय़ात कर्जतहून कोंडाणा लेण्यावरून राजमाचीवर जाणाऱ्या वाटेवर काहीट्रेकर्सना लुटल्याची बातमी आली आणि झटकन डोळ्यासमोर पाच वर्षापूर्वीच्याभीमाशंकर येथील गणेश घाटातील लुटमारीच्या घटना आठवल्या. साधारण चारएकवर्षापूर्वी भीमाशंकरच्या जंगलात गणेश घाटाच्या रस्त्यावर दरवर्षी एकतरलुटमारीची घटना ऐकू यायचीच. सध्या तिकडचे वातावरण बऱ्यापैकी शांत होते. तेवढय़ात राजमाचीची हीघटना घडली. डोंगरभटकंतीतील हे अलीकडच्या काळातले नवे संकट असेच म्हणावे लागेल.वैद्यकीय प्रथमोपचार, सुरक्षेचे इतर उपाय याबरोबरच लुटमारीपासून सुरक्षा हाडोंगरभटकंतीसाठी एक अपरिहार्य भाग बनेल की काय अशी शंका निर्माण करणारे हेप्रसंग गेल्या सात-आठ वर्षात घडलेले आढळतात.या कालावधीत सुरुवातीला राजमाचीच्याच लोणावळ्यावरून जाणाऱ्या वाटेवर काही घटनाघडल्या. पण त्या तशा सौम्य होत्या. नंतर भीमाशंकरला सांडसवरून गणेशघाटमार्गेजाणाऱ्या डोंगरवाटेवर अशा घटना ऐकू आल्या. या घटनांचा कालावधी साधारणपावसाळ्यातलाच असायचा. पण पावसाळ्यातच डोंबिवलीतला एक ग्रुप आपल्याकुटुंबियांसमवेत भीमाशंकरला जात असताना त्यांच्यावर लुटारूंनी हल्ला केला. पणया मंडळींनी डगमगून न जाता भीमाशंकर (घोडेगाव) येथे तक्रारी नोंदवून पुढे याप्रकरणाचा पिच्छा पुरविला. लुटारू भीमाशंकरच्याच जंगलातील पदरवाडीत राहायचे.तक्रारदार तिकडे स्वत: जाऊन आले आणि त्यांनी पोलिसांना लुटारूंपर्यंत नेले.न्यायालयात या लुटारूंना शिक्षा झाली. पण पुन्हा २००४ व २००६ मध्ये लागोपाठट्रेकर्सवर हल्ले झाले. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांकडे तक्रारी नोंदविल्यागेल्या, पण पुढे फारसे काहीच हाती लागले नाही. मध्यंतरी पुन्हा राजमाची येथेअशाच घटना घडल्या. तर दोन वर्षापूर्वी अंजनेरी किल्ल्यावर काही ट्रेकर्सच्यासॅक पळविण्यात आल्या होत्या. चारएक वर्षापूर्वी मला स्वत:लाच केंजळगडावर छोटासाअनुभव आला, पण त्या वेळेस चोराने माझा सामानातील फक्त बॅटरी चोरली, इतरसामानाला हातही लावले नाही.एकंदरीत या सर्व घटना गेल्या १० वर्षाच्या कालावधीत घडल्या आहेत. पूर्वीच्याम्हणजे साधारण यामागील ४० वर्षात अशा घटना घडल्याचे फारसे ऐकिवात नाही. मग आतादहा वर्षात नेमके काय झाले? भीमाशंकरच्या घटनांबाबत एक सत्य पुढे आले की,पूर्वी एक्स्प्रेस हायवे, मुंबई-पुणे जुना महामार्ग येथे लुटमारी करणाऱ्या काहीटोळ्या पकडल्या होत्या. यातीलच काही लुटारू मंडळी आश्रयासाठी पदरवाडीत यायची,त्याचा परिणाम म्हणून गणेशघाटातील लुटमारीच्या घटना घडल्या. पण मग बाकी काहीघटना काय दर्शवितात. एक तर आजकाल ट्रेकिंगचे वाढते प्रमाण, त्याचबरोबर नवीनपिढीच्या हातात असणारा डिजीटल कॅमेरा, मोबाइल व इतर चीजवस्तू व पैसा यावर यालुटारूंची नजर जाते. तसेच डोंगरात काय न्यावे व काय नेऊ नये याबद्दलचे अज्ञानअथवा फाजील आत्मविश्वास या गोष्टीही त्यास कारणीभूत आहेत. त्याचबरोबर काहीपर्यटक मंडळींचे सोप्या ट्रेकिंग रूटवरचे भटकणे. डोंगरवस्त्यांवर राहणाऱ्याकाही लुटारू मनोवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झालेला लोभ ही याची परिणती.काही ताज्या घटनांमध्ये कॅमेरा, मोबाइल अशा ऐवजांचीच किंमत सुमारे ५० हजाररुपयांपर्यंत गेली आहे. तर याच घटनांबरोबर याच डोंगरवस्त्यांवरील मंडळींनी यासर्वाना रोखण्यासाठी केलेले प्रयत्नही दिसतात. मग डोंगरात फिरणाऱ्यांनी अशालुटमारीचे भय बाळगत फिरायचे का नाही? कारण असे फिरण्यात आणि शहरातील बंदिस्तजगण्यात मग अंतर काय? पण जसे इतर महत्त्वाच्या गोष्टींची आपण काळजी घेतो तसेचयाकडेपण पाहावे लागेल.एक तर डोंगरात आपण जातो ते रोजच्या जीवनापासून मुक्त होण्यासाठी. मग चीजवस्तून्यायच्याच कशाला? प्रत्येकाकडे मोबाइल असण्यापेक्षा ग्रुपमध्ये ठरवून ठराविकजणांकडेच का असू नये? गावातून गाइड घेताना त्याच्याबद्दल पुरेशी माहितीट्रेकपूर्वीच घेणे शक्य नाही का? जर चीजवस्तू नेल्याच असतील तर त्या मंदिरात,वाडय़ात राहण्याच्या ठिकाणी न ठेवता स्वत:बरोबर बाळगणे. ट्रेकला जाण्यापूर्वीसदर रूटवर असे काही घडले आहे याची माहिती करून घेणे. काही त्रासदायक घटक असतीलतर पायथ्याच्या गावातून तशी खात्री करणे व गावातील सरपंच, पोलीस पाटील वगैरेंनाआपल्या ट्रेकची माहिती देणे. महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक सोबत ठेवणे. सर्वातमहत्त्वाचे म्हणजे १-२-५ च्या संख्येने ट्रेकला जाणे टाळणे. डोंगरवाटेवर शक्यतोग्रुप न सोडणे आदी काही खबरदारीच्या गोष्टी करणे सहजशक्य आहे. त्यातूनही काहीघटना घडल्यास संबंधित पोलिसांकडे तक्रार नोंदवणे. नुसती तक्रार न नोंदवितात्याचा फॉलोअप ठेवणे. भीमाशंकरच्या काही घटना पुढील फॉलोअप नसल्यामुळेचपूर्णत्वास गेल्या नाहीत व आरोपींना शिक्षाही झालेली नाही. खरे तर आजकालपायथ्याच्या तसेच घाटावरील गावातील सुज्ञ गावकरी पुढाकार घेऊन अशा लुटारूंनाआळा घालीत आहेत. वाढत्या ट्रेकिंग तसेच साहसी पर्यटनामुळे त्यांना चांगलेउत्पन्न मिळत आहे. अशा ग्रामस्थांना गिर्यारोहण संस्थांनी पाठिंबा देणे गरजेचेआहे.या सर्व पाश्र्वभूमीवर एका ज्येष्ठ महिला गिर्यारोहकाची आठवण सांगावीशी वाटते.१९८५-९० दरम्यान सदर गिर्यारोहक हरिश्चंद्रगडावर फक्त एका मैत्रिणीबरोबर गेलीहोती. तेव्हा तिला काहीच धोकादायक वाटले नाही, पण तीनेक वर्षापूर्वीवांगणीजवळच्या चंदेरीवर जाताना मात्र तिला काही गिरिजनांपासून धोका जाणवला.अर्थात कोणतीही वाईट घटना घडली नाही हे सुदैवच. पण परिस्थितीत झालेला बदलदर्शविण्यास सदर घटना पुरेशी बोलकी आहे.
0 comments