आला एकदाचा...
By
Unknown
आज पुण्यात पाऊस दाखल झाला असे वाटतेय.
तसा तो कालच आला होता, पण 'बॅकबेंचर'सारखा वर्गात असूनही खिडकीतून बाहेर पाहणार्या मुलागत दूर हरवून गेल्यासारखा वाटला. पण आजा शहाणा झालाय असे वाटतेय. शहाण्या मुलासारखा वेळेवर (म्हणजे अगदी ऑफीसला जायच्या वेळेवर) आला.
मी जरा वेळ काढून त्याला समजावले, "बाबा,ये, बस जरा, आल्यासरशी चांगला महिनाभर रहा... आताशा तुझं वेळेवर येणे होत नाही...!!! तू नव्हतास तर किती घोर लागला होता जीवाला. पाणीकपात झाली. नशिबाने आमच्या घरी मोठी टाकी आहे जी आठ दिवस पुरते. काही सोसायट्यांमध्ये तासभरच पाणी येत होते. टॅंकरवाल्यांची चलती होती. त्यांनी अजुन एखादा नवीन टॅंकर घेतला पण असेल एव्हाना. डिओडरंटचा खप शिगेला पोचला असेल."
एकंदर राग-रंग तरी जास्त दिवस मुक्काम ठोकण्याचेच दिसलेत. पाहु आता काय करतात साहेब. मुहुर्त बाकी भारी निवडला त्याने आषाढी एकादशीचा. तिकडे सकाळी महापूजेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी विठूमाउलीला साकडे घातले असणार जोरदार. पाऊस पडू द्या. तुमचा पंढरपूरचा आधीचा खासदार काहीही करून राज्यसभेवर नेतो (तिकडे शिर्डीला त्यांचे पानिपत झाले/केले).
चला, आता मी पण पाऊस जगायचे प्लॅन्स सुरू करतो. आता चहा-भजी, कॉफी, बाइक्स, ट्रेक्सची खरी मजा येणार आहे.

wa wa !! Ata paus padu de re Vitthala !!
ReplyDeleteHo aata paus hava(ch)!
ReplyDeleteAvadle. Maja aali vaachun :)
ReplyDeleteAgadi marmik.
Reagrds
Nayana
Changle lihitoys mitra. Asach lihit raha :-)
ReplyDeletemasta...
ReplyDelete