पाऊस जगा...!!!
पाऊस येतोय बरं का... तो जगायला पण पाहिजे... माझ्या काही विचित्र तऱ्हा अशा आहेत...
तुमच्याकडे बराच वेळ आहे? म्हणजे साधारण तीनेक तास? तर मग एखादा पिक्चर टाकायला (हो, पहायचा नाही, टाकायचाच) हरकत नाही. म्हणजे कसं की, कंपनी देणारे कुणी असेल तर ती व्यक्ती पण खुश आणि वर आपल्याला पण माणसाळलेले काही केल्याचे समाधान. वर परत बाहेर पाउस पडत असताना interval मध्ये गरमागरम सामोसे, पॉपकॉर्नची मजा. (पडद्यावरची काही दॄश्ये पण तशीच... आजकाल हे फारच common झालंय बुवा... अगदी मराठी पिक्चर मध्ये पण सगळे असते).
काय म्हणता, अर्धा तासच आहे? हरकत नाही, भजीची गाडी शोधा. दोन प्लेट कांदाभजी चापून वर चहाची सर्र्र्र्र्र्रकन फोडणी द्या, पहा जीभ, घसा, पोट किती आशीर्वाद देतात तुम्हाला. पण हा चहा कटिंग वगैरे चालत नाही बर, फुल्ल ग्लासच हवा. तरच खरी मजा. आता काहींना वेगळी फोडणी लागते, त्याचा उल्लेख येथे नको.
ऑफीस मध्ये असताना खिडकीतून पाऊस दिसला आणि काही मिनिटांचा ब्रेक मिळालाय? मग मोठा mug भरून कॉफी घ्या, एक छत्री पैदा करा, आणि ऑफीस बिल्डिंगच्या बाहेरचा एखादा पावसातला बेंच शोधून त्यावर छत्रीखाली बसून कॉफीचे घुटके मारत बसा. लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष करता येणे अत्यावश्यक.
रविवारचे मस्त जेवण चापून, थोडी झोप काढून झाली असेल तर एक वाफळता चहाचा कप घेऊन टेरेसच्या आरामखुर्चीवर निवांत पडून रेडिओवर मुकेश-रफी ऐका. किंवा मग मराठी कवितांचे पुस्तक असले तर अतिउत्तम. अर्धा दिवस दिवस मोकळा आहे?
सकाळपासून सरीवर सरी चालल्यात? अरे मग यासारखे सुख नाही. गाडी बाहेर काढा. चारचाकीची ऐट घरीच ठेवा. दुचाकीला किक मारायची आहे आपल्याला. मोबाइल, पाकीट एका प्लास्टिक बॅगमध्ये टाका आणि निघा शहराबाहेर. Highway सोडून द्या आणि एखादा छानसा रस्ता पकडून मन मानेल तेथपर्यंत एका गतीने (40kmph ideal) पावसात भिजत जात राहा.
पूर्ण दिवस मोकळा मिळालाय? जास्त पावसात भिजणे पण आवडत नाही? मग एक काम करायचे. एसटी स्टॅंड गाठायचे. एक अर्धा दिवस प्रवास करणारा मार्ग निवडा. आणि तिकडे जाणारी यष्टी (शुद्ध मराठीमधे "लाल डब्बा") पकडायची. खिडकीतून पावसाचे तुषार अंगावर झेलत, डोंगराच्या धबधब्याची चंदेरी पांढरी जानवी पाहत प्रवास पूर्ण करायचा. सह्याद्री आपलाच आहे. आणि परत त्याच आल्या गाडीने परत फिरायचे. रस्त्यात चहा, कॉफी, भजी मारायला हरकत नाही.
२/३ सुट्टी मिळलीये? मग सर्वप्रथम आपल्या नशीबाची पूजा करा. आरशात पहा, चिमटे काढून खात्री करून घ्या. मग एक मस्त चारचाकीची ट्रिप प्लान करा. सगळ्या कुटुंबाला जलधारा लूटू द्या. परत आल्यावर पहा कसा आपला भाव उगाचच किती वाढतो.
काहीच करायची इच्छा नाही? मग तुम्ही जवळपास माझ्या विरुद्ध कॅटेगरीचे आहात. तरीही हरकत नाही. त्याचा पण इलाज आहे आपल्याकडे. खिडकीजवळ असणार्या बेडला मित्र बनवा. मस्त एक रजई पांघरून पडी मारा. झोपताना टपोऱ्या थेंबांचा ताशा आणि विजेचा ढोल ऐकता ऐकता स्वप्नात हरवून जा. उठल्यावर आहेच पहिले पाढे पंचावन्न. चहा-भजी and so on.
कुणाला बोअर करावेसे वाटले तर मग ही link पास करा. नाहीतर तुम्ही पण असेच काही लिहायला घ्या.

Sagala kahi chan ahe....pan paus kuthe ahe ??
ReplyDeleteनमस्ते पंकज,
ReplyDeleteआत्ताच तुमचे काही फोटो आणि लिखान पहिले. मस्त!! लिहित रहा!
Chan...Keep it up Mitra
ReplyDeleteMala 7 divas aahe sutti...kay karu
:D Chaan. Its nice to read what you write. Thought provoking.
ReplyDelete- Nayana
मस्त लिहिले आहेस अगदी तुज्या फोटोग्राफी सारखे अणि मनातल्या जगन्यासरखे
ReplyDeleteमें इन्टरनेट चे पण आभार मानतो ज्यच्यामुले मला तुज्यासरखे मित्र मिळाले
-शुक्लेंदु
mastach lihala ahes.
ReplyDeletepan ashwini mhanate tasa sagala kahi ahe pan paus nahi.
trek karayacha ahe re.....
Kiti cute ahe he... i mean saglech jaan aap aaplya parine paavsachi majja luttat... tu ekdam nemka tipla ahes...shabbas re gadya!
ReplyDeleteAnd for Ashwini and Dhruv:
Paus nasel tar pavsachi soy kara... phavlya velat ekhada jhad lava...
lovely writeup! just like your pics!
ReplyDeletemastch thodkyat utha aani mansokt bhatkanti kara :-)
ReplyDeletebtw to pahila photo Naneghat madhala aahe na? Wanarlingi mhantat na tyala
sahi lihlays blog pankaj !! thanks for sharing it with me.. will follow now onwards.. :)
ReplyDelete