Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

मेघविभोर भोरगिरी

By Pankaj - भटकंती Unlimited
/ in Bhorgiri Monsoon Sahyadri Trek
9 comments
यंदा पुण्यात पावसाचे नुसतेच ढग दाटून येतायेत. उगा आपला एखादा थोडासा शिंपडून गेलाय. कैक मुहूर्त चुकवून सगळ्यांचे अंदाज फोल ठरवून तो अजूनही रुसलाच होता. एवढी पावसाची बेक्कार-खवट-कचकावून वाट कधीच नव्हती पाहिली. पण त्याला काही जोमदार पाझर फुटत नव्हता. नुसतंच दाटून यायचं, हवेच्या फुंकरीसरशी पुन्हा मेघ जुनेर कापडासारखे विरायचे. म्हणून आता त्याला भेटायला आपणच एखादा डोंगर जवळ करावा सोबत लहानसा ट्रेकही होईल, एखादी रात्र तपस्वी सह्याद्रीच्या निवार्‍याला जावं, आडोशाच्या जागेतून ढगांच्या दिंड्या पहाव्यात, चार घास स्वतः रांधून खावेत, रात्री उशिरापर्यंत पावसाच्या पानगळींच्या पार्श्वसंगीतावर निवांत गप्पा झोडाव्यात, सकाळी उठून ठेवणीतलं आलं घालून फर्मास चहा करावा आणि थोडक्या दिवसांसाठीची नवीन ऊर्जा गाठीला जोडावी म्हणून आम्ही जागा शोधायला लागलो. अजून ट्रेकचे दिवस सुरु झाले नसल्याने फारसा रांगडा ट्रेक करायची इच्छा नव्हती. त्यामुळे थोडी सोप्यातली जागा आणि वर निवारा असावा अशी माफक अपेक्षा होती. त्यात काजव्यांचे दिवस असल्याने ते दिसले तर बोनस असाही एक हालकट हेतू होताच.




सुरुवातीला मी आणि जिप्सी प्रिन्सेस श्रद्धा दोघेच होतो. त्यात मॅडम आदल्या दिवशी रात्री मुंबईहून बारा घरी वाजता येऊन बेत डळमळीत करणार होत्या. पण ती मध्यरात्री आल्यानंतरही आपण जायचंच असा मेसेज करुन कन्फर्मेशन दिलं आणि मी निवांत झालो. शनिवारी दुपारी निघायचं होतं आणि सकाळी प्राची आणि गणेश अशा अजून दोन भिडूंना मेसेज केले. हाय नाय हाय नाय करत दोघेही शेवटी तयार झाले. (©भटकंती अनलिमिटेड) पिकप पॉइंट्स ठरले, कुणी काय घ्यायचं याची जंत्री झाली आणि सॅक भरायला सुरुवात केली. आपला काळा चित्ता तयार होताच. गणेश त्याची सायलेन्सर काढलेली फटफटी घेऊन आला आणि गेटच्या आत पार्क केली. शिवाजीनगरला सिमला ऑफिस चौकात श्रद्धा पोटावर आणि पाठीवर अशा भल्यामोठ्या दोन बॅगा घेऊन गाडीत बसायला तयार होती आणि आम्ही तिच्यासमोर सिग्नलला बिनकामी व्हीआयपी ताफा जाण्याची वाट पाहत होतो. गाडी चौकात समोर दिसूनही तिचा अजब पुतळा झालेला आम्ही पाहिला. शेवटी व्हीआयपी ताफ्यांसोबतचा दहा मिनिटांचा स्टॅच्यू गेम झाल्यावर तिला गाडीत घेतले आणि पुढे नाशिक फाट्याला प्राचीला. (तिच्या) नियमाप्रमाणे ती अर्धा तास लेट करुन तिने तिचं रेकॉर्ड कायम ठेवले होते. तिथेच विकास आणि अमित भेटले, तेही भोरगिरीलाच निघाले होते, पण रात्री परत येण्याच्या प्लॅनवर.

नाशिक रोडच्या नेहमीच्या ट्राफिकला नेहमीच्या आणि काही ठेवणीतल्या शिव्या देऊन आणि टोल भरुन मोशी टोलनाका पार केला आणि रस्त्याची अवस्था, चाकणचा ट्राफिक जाम, उलट येणारे ट्रक अनुभवून असं वाटलं की कदाचित राजगुरुनगर नाक्यावर टोल परत मिळेल. पण तशी काही प्रोव्हिजन दिसली नाही. थोडं निराश झालेलं मन पुन्हा आनंदित झालं ते कोपर्‍यावरच्या वजडी-पावचा बोर्ड बघून.
आता आमच्या वजडीपावपायी सगळा रस्ता कशाला खोळंबून ठेवायचा म्हणून तसाच अर्धाएक किलोमीटर पुढे गेलो. पण चैन पडेना ना भाऊ. मग काय दिली जागा पाहून गाडी साईडला लावून आणि आलो अर्धा किमी चालत उलटं. त्याच्या समोर बेकरी, मग काय उद्याच्या गुहेतल्या चहासोबत हवीत म्हणून बिस्किटे घेतली. तब्बल दोन दोन पेस्ट्रीज खाल्ल्या आणि वजडीपाव (थोडं सात्त्विक हवं म्हणून भुर्जीपाव असं बरंच काय काय दाबून गाडीकडं परतलो. पण श्रद्धाला अजूनही भजी हवी होती आणि मला चहा. त्यात अजून पंधरा मिनिटे गेले. आता साडेपाच झाले होते. (©पंकज झरेकर) चासचा रस्ता धरला आणि चासकमान प्रकल्पाच्या आकसलेल्या डोहाच्या कडेने पावसाने आता लवकर येणे कसे गरजेचे आहे आणि आता जलाशयात किती टक्के पाणीसाठा असावा यावर गहन खल करत वाडा-डेहणे-शिरगाव अशी एकामागून एक गावं मागे टाकत "भोरगिरी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहे" पर्यंत येऊन पोचलो.

तुमच्यासाठी
भोरगिरीहून मोबाईल वॉलपेपर
वातावरण आता मात्र एकदम खुलले होते. चहूबाजूंनी ढगांनी वेढून टाकले होते. भीमाशंकराच्या शिवलिंगाला अभिषेक घालून आलेले ढग भोरगिरीवर छत धरुन होते. छान सुपरसॉनिक वारा सुटला होता. पूर्वी झंज राजाने बांधलेल्या मध्ययुगीन मंदिराचा आता जीर्णोद्धाराच्या नावाखाली ‘उद्धार’ करुन टाकला आहे. थोडी खंत वाटणारच. अंधारुन यायला थोडाच अवधी शिल्लक असल्याने कॅंप कुठं लावायचा यावर निर्णय होणे आवश्यक होते. गावाच्या अक्षातून घालत गाडी एकदम भोरगिरीच्या पायथ्याशी असलेल्या शेवटच्या घराच्याही पल्याड लावली आणि उतरुन सगळ्यांनी पहिली धूम करवंदाच्या जाळीकडे ठोकली. सीझन संपत आला असला तरी बर्‍यापैकी करवंदं अजून शिल्लक होती. एवढ्यात पावसाची सर आली आणि सार्‍यांची धावपळ झाली. घाईत गाडीत येऊन बसलो आणि आता कुठं तंबू लावायचा यावर पुन्हा एकदा राउंडटेबल झाली. माझ्या एकट्याच्या ‘बहु’मतावर गुहेत जाऊन मुक्काम करावा असे ठरले आणि सगळे सामान पाठीवर लादून आस्तेकदम सुरु झाले. बरेच दिवस ट्रेकमध्ये खंड पडल्याने आणि कॅमेरा इक्विपमेंट, तंबू, जड ट्रायपॉड एवढं(च) सामान असल्याने माझी जरा फेफे झाली, पण पुढच्या दमात गुहा गाठलीच.

गुहा मोठी सुरेख. एकात एक तीन भाग, चार खांबांवर तोलून धरलेली, अंतःपुरात शिवलिंग, मधल्या भागात भुईशी कोरलेले कमलदल, बाह्यभागात रिकामी सपाट जागा, लाकडी खांब उभे करण्याच्या उखळासारख्या जागा, कोपर्‍यात एक लहानशी खोली वाटावी अशी पाषाणात कोरलेली देवडीसारखी जागा. राहण्यास उत्तम जागा. जरा आराम आणि स्थिरस्थावर करुन झाल्यावर श्रद्धाने सुंदर कॉफी केली आणि कॉफीचे ग्लास हातात धरुन आम्ही गुहेच्या तोंडाशी गारव्याला येऊन बसलो. समोर अंधारुन आले होते. भीमाशंकरहून आलेले ढग समोरच्या खोर्‍यात पसरले होते. (©पंकज झरेकर)असंख्य काजवे समोरच्या दरीतून लुकलुकत वर येत होते. काय सुंदर अनुभव होता! निवांत बसलो असतानाच मांडीखाली काहीतरी वळवळ झाली म्हणून हात घातला तर एक खेकडा हाती लागला. पकडून भाजण्याचा बेत करुन त्याला पकडत असतानाच तो पोटात पिल्लांना घेऊन चाललाय हे ध्यानी आले आणि मग त्याला सोडून दिले. एवढ्यात खाली अंधारातून थोडा गलका ऐकू आला. दोनतीन हौशे-नवशे-गवशे ट्रेकर अंधारात रस्ता शोधत होते आणि तितक्यास आत्मविश्वासाने रस्ता चुकले होते. त्यांना मार्गदर्शन करुन आणि हात देऊन गुहेशी आणले आणि फक्त तीन मिनिटे टेकून ते खाली परतले. "हम कॅंपिंग का सामान लेके आये है" असं उत्तर ऐकून आम्ही ताडलेच की हे इथं ‘झिंगाट’ होणार आहेत आणि आम्ही त्यांना ते करु देणार नव्हतो. म्हणूनच त्यांनी पाय काढता घेतला असावा. गुहेच्या बाजूला पथारी अंथरुन बराच वेळ गप्पा झोडून झाल्या तेव्हा आणखी एक असाच ग्रुप (झिंगाट्गिरी वगळता) पुन्हा आत्मविश्वासाने रस्ता चुकून वर आले. त्यांनाही अर्ध्यावर जाऊन वर घेऊन आलो. तेही पाच मिनिटांच्या वर तिथे थांबले नाहीत.

रात्र आणि गप्पांना रंग चढले आणि आम्ही जेवण रांधायच्या तयारीला लागलो. कुणी तांदूळ धुतोय, कुणी कांदा चिरतोय, कुणी कोथिंबिर निवडतोय. सगळं एका पातेल्यात घालून अशी काय फर्मास खिचडी तयार झाली म्हणता, की काय सांगता. कच्चा कांदा कापून त्या वाफाळत्या खिचडीसोबत खाताना आपल्या पुण्यात आणि बाकी अनेक ठिकाणी असलं भारी जेवण काय कुठल्या हॉटेलात मिळत नाही असं घासागणिक जाणवत होतं. जेवणं उरकून भांडी आणि इतर सामानाची आवराआवर केली तेव्हा अकरा वाजत आले होते. पलीकडून भोरगिरी गावातल्या मंदिरावरचा सीएफएल आणि काही खांबांवरचे मिणमिणते दिवे फक्त गावाच्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत होते. जेवणं आवरल्याने आम्ही काहीवेळ फोटो काढण्याचे प्रयत्न केले आणि नंतर सगळं सोडून पुन्हा गप्पा मारायला म्हणून पुन्हा गुहेत निवांत पथार्‍या अंथरुन बसलो. भवताल फारच सुरेख जमून आला होता. चौदाशीचा चांदवा ढगांच्या पडद्याआडून प्रकाश पाझरीत होता. त्याच्या प्रकाशात मेघांची दिंडी घाटावर चाल करुन निघाली होती. सृष्टीच्या नवजीवनाचे संदेश घेऊन. त्यांच्या तालावर बेडकांचे सूरावर सूर उमटत होते. काजव्यांची प्रकाशयोजना त्याला शब्दशः चार(शे) चांद लावत होती. गुहेतल्या सार्‍या लाईट्स बंद करुन आम्ही त्या मैफिलीत तल्लीन झालो होतो. मध्यरात्र सरुन तीनच्या सुमारास पहाटेची चाहूल लागली तशी त्या गारव्याने आम्हांला झोप लागून आम्ही या जिवंत स्वप्नांच्या दुनियेतून त्या आभासी स्वप्नांच्या दुनियेत हरवलो होतो.



पहाटे उजाडता कधीतरी जाग आली ती थंडगार हवेने आणि शीळकरी कस्तुराच्या (whistling thrush) आवाजाने. एवढा सुरेल आवाज की रोजच्या घड्याळाच्या गजराने रोज चडफडत उठणारे आम्ही त्या सकाळी अतिशय प्रसन्नचित्तानं उठलो. सकाळी गुहेत एक भक्त तिथल्या पुजार्‍याला म्हणून चहा घेऊन आला होता. पण पुजारी लवकर खाली उतरुन गेल्याने आपसूकच तो आमच्या पदरात पडून पवित्र झाला. आवराआवरी करुन वर आलेल्या भक्तांशी गप्पा मारुन आम्ही किल्ला उतरुन ओढ्याच्या रस्त्याने पुन्हा पायथ्याला आलो. शिरगाव फाट्याला येऊन कढईतून प्लेटमध्ये असा शिर्के वडापाव दाबून खाऊन परतीचा मार्ग धरला.

हा ट्रेक लक्षात राहिला तो खास गुहेतून अनुभवलेल्या ढगांच्या दिंडीमुळे, काजव्यांच्या चमकीमुळे, आणि रात्रभर मारलेल्या गप्पांमुळे! ही शिदोरी आठपंधरा दिवस पुरेल आता... तोवर होईलच पुढल्या भटकंतीचं नियोजन!

Related Posts

9 comments:

  1. THEPROPHET22 June 2016 at 22:05

    Nicely worded!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. Manik22 June 2016 at 23:17

    खेड शिवसेना आॅफीस च्या मागे आसलेल्या जमालभाईच्या टपरी वरचा फोटो आहे ना हा

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. अमोल नाईक23 June 2016 at 01:56

    Zakkas ! As usual ...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Mahesh Nelge23 June 2016 at 02:52

    खूप छान लिहलय 👌👌

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. ahireyogesh23 June 2016 at 04:30

    बर्याच कालावधी नंतर तुझा ब्लॉग वाचायला मिळाला.
    नेहमीप्रमाणे मस्तच जमलाय.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. ahireyogesh23 June 2016 at 04:31

    बर्याच कालावधी नंतर तुझा ब्लॉग वाचायला मिळाला.
    नेहमीप्रमाणे मस्तच जमलाय.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Anonymous23 June 2016 at 04:55

    सुरेख वर्णन .

    जोरदार भट्टी जमलेली दिसतेय.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. DiscoverSahyadri27 June 2016 at 17:28

    सुरेख माहोल..
    सुरेख फोटू आणि ब्लॉग...
    सुरुवातीच्या काही ओळी लयंच खास!
    ब्लॉगत रहा रे....

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. sagar mehta15 September 2016 at 07:37

    भन्नाट वर्णन आणि फोटो

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1