बागलाण भटकंती: कसलेला मल्ल धोडप
काल दिवसभराचा थकवा,
रात्रीची सुंदर खिचडी आणि सोबत स्लीपिंग बॅगमध्ये पडल्या पडल्या मारलेल्या
गप्पा यामुळे जी काही झोप लागली त्याला शुद्ध मराठीत धुर्या वर करुन पडणे
असे म्हणतात. रात्री सगळ्यांचे तसेच काहीसे झाले होते.
पहाटेचा मुसळधार पाऊस आणि दाटून आलेले ढग यांमुळे सकाळ काही वेगळीच भासत होती.गुहेच्या आजूबाजूंच्या पागोळ्यांतून ओघळणारे पाणी, त्याचा एकताल आवाज,भरारणारे वारे आणि खिडकीतून आत घुसणारे ढग यांमुळे उबदार गुहेत जाग येऊनही उठणे जीवावरच येत होते. तरीही उठून बाहेर आलो आणि बाहेर वाहत्या पाण्यात तोंड खंगाळून घेतले आणि अंघोळीची गोळी घेतली ;-) स्टोव्हवर चहाचं आधण ठेवलं, त्या वातावरणात वाफाळता चहा झाला आणि आळस झटकून गुहेच्या बाहेर आलो तो तरंगणारे कापशी ढग आमची वाटच पाहत होते. अलगद वार्यावर स्वार होऊन गालांशी गुदगुल्या करुन निघून जात होते. नाक गारठ्याने थंडगार पडले होते.चष्म्यावरही ढग/धुके जमा होत होते.
आजचे लक्ष होते साल्हेरच्या शेंडीवरचे परशुराम मंदिर म्हणजे महाराष्ट्रातले दुसर्या क्रमांकाचे शिखर आणि पहिल्या क्रमांकाचा उंच किल्ला. खूप दिवसांपासून उराशी जपलेले स्वप्न आज सार्थक होणार होते. गुहेच्या डोक्यावरुन निघणार्या पायवाटेचा माग काढत गेलो की आपण परशुराम मंदिराशी पोचतो. एकदा धुक्यात वाट चुकलो पण खालून तुकाराम भाऊंनी ओरडून दिशादर्शन केल्यावर काहीशा निसरड्या वाटेवरुन पंधरा-वीस मिनिटांतच परशुराम शिखराशी पोचलो. समस्त भूमी पादाक्रांत करुन दान केल्यानंतर स्वतःसाठी भूमी हवी म्हणून परशूरामाने ज्या ठिकाणाहून बाण मारुन सागरास मागे हटवून कोकणची देवभूमी निर्माण केली तेच हे ठिकाण. शिखरावर लहानसे खोपटाएवढे मंदिर, भोवती फरसबंदी, आत परशुरामाच्या पादुका आणि मूर्ती आहेत. मंदिराच्या पुढे महाराष्ट्र आणि पाठीमागे गुजरात असे हे अगदी दोन राज्यांच्या सीमेवरचे शिखर. अर्थात दाट ढगांमुळे शिखरावरुन दिसणारा सालोटा पाहता आला नाही. पण बादलों पे सवार होणे म्हणजे काय याचा अनुभव साल्हेरचं हे शिखर देऊन गेलं. ‘मस्ट हॅव’वाला ग्रुप फोटो झाला. आणि आम्ही सरसर उतरतच पुन्हा गुहेशी आलो. खाणं करुन घेतलं आणि आता उतरण्याच्या मार्गाला लागलो.आता साधारण उघडले होते. पुन्हा कोवळ्या उन्हाचा आणि ढगांचा खेळ दर्याखोर्यांत रंगू लागला. त्याची मजा लुटतच निसरड्या वाटेनं गुहा-टाक्यांची माळ, दरवाजांची शृंखला, पायर्या असं करत पुन्हा खिंडीत आलो. दरम्यान रनटाईम एक कट शिजला होता. निसरड्या वाटेमुळे समोर दिसणारा अजस्त्र सालोटा आम्ही रद्द करुन आम्ही त्याहीपेक्षा हिंस्त्र दिसणारा धोडप करणार होतो. काल ज्या वेळी (संध्याकाळी) साल्हेरवर पोचलो साधारण त्याच वेळी धोडपची निरुंद माची गाठून आम्हांला नाट्याचा पुढचा अंक पहायचा होता. वाटेत मुल्हेर गावात पुन्हा जाऊन काल घेतलेला स्टोव्ह देऊन योगेशच्या घरी जायचे होते. तिथे आमच्या या वळूंच्या टीमला बैलपोळ्यानिमित्त मांडे बांधून देणार होते. खिंड-पठार-डोंगरउतार असं करत पुन्हा वाघांब्यात आलो आणि पटकन सामानाची बांधाबांध करुन गाडीत टाकलं.

मुल्हेरला
योगेशने मामाकडे जाऊन स्टोव्ह परत केला. पुढे सटाण्यात मिसळ, जिलेबी आणि
बागलाण स्पेशल कट वडा असा पोटभर जेवण कम नाश्ता करुन आम्ही योगेशच्या
गावाकडे म्हणजे कळवणकडे निघालो.मध्यान्ह टळून गेलेली, धोडपच्या पायथ्याला
पोचून तीनेक तास चढाई करुन आम्हांस सुर्यास्तास वर पोचणे गरजेचे होते.
रस्ता काटत एकदाचे कळवणात येऊन पोचलो. म्हणून “उद्या घरात यावे लागेल हा” अशी
प्रेमळ धमकी देऊन फक्त योगेश घरात गेला आणि आम्ही रस्त्यावर त्याची वाट
पाहत थांबलो. बाहेर आला तेव्हा त्याच्या हातातले गाठोडे आणि मोठी किटली
माझ्या ‘चाणाक्ष” नजरेने अचूक हेरले. ;-) पुढे जाता जाता दुकानातून
दुधाच्या पिशव्या बॅगमध्ये टाकल्या आणि आम्ही धोडपच्या रोखाने निघालो.
दहा-पंधरा मिनिटांतच ओतूर गावाशी शाळेच्या समोरुन डावीकडे वळून कच्च्या
रस्त्याने आत जाऊन एका वाडीशी गाडी उभी केली. डोंगराच्या कुशीत वसलेली
वाडी, सभोवार हिरवीगार शेतं, मका,भुईमूग आणि मूगाच्या पिकाचं दान काळ्या
आईने भरभरुन दिलेलं. शेतात चाललेला पाट आणि अधेमधे शेतकरी शेतांत खुरपणी
करत होते. मध्येच शेतकरी दादा शेतांमधून मोरांना हाकारण्यासाठी मोठ्ठ्याने
हाळी देत. तिन्ही बाजूंनी वेढणार्या डोंगराच्या कुशीतल्या झाडीच्या जाळीत
कमीत कमी शंभर-दीडशे मोरांचं वास्तव्य. त्यांच्या केकारवानं सारं शिवार
दणाणून सोडलं होतं.थोडक्यात ‘स्वप्नातल्या गावा’ आल्याचाच अनुभव.
पुन्हा
एकवार पाण्याच्या बाटल्या भरल्या,सॅक्स आणि बुटाच्या लेस आवळल्या आणि
समोरच्या टेकाडावर दिसणार्या विजेच्या मनोर्यांच्या दिशेने चालू लागलो.
दरम्यान अचानक सामोरे आलेले वाघ मी आणि ध्रुवने मारुन टाकले.आता
खरं तर गेल्या दोन-तीन दिवसांचा थकवा जाणवू लागला होता. पहिल्याच चढाईत कस
लागला. स्वास फुलले. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होऊ लागल्या.वाटेत एक
ओहळ लागला. त्याच्या शेजारी जराशी विश्रांती घेतली, बाटल्या पुन्हा भरल्या
आणि पुढच्या दमात माथ्यावरचा आदिवासी पाडा अलंगवाडी गाठले.समोर संपन्न कळवण
शहर दिसत होते. सोनेरी उन्हाने पठार चमकत होते.पाड्याच्या आतूनच पायवाट
जाते. पाड्यात बैलपोळ्याची तयारी चालू होती.बैलांच्या शिंगांना कुठे तासून
चमकदार करण्याचे काम सुरु होते तर कुठे हातांनी त्यांना ऑईलपेंट लावला जात
होता. वर्षभर केलेल्या कष्टाची उतराई म्हणून शेतकरी त्यांना न्हाऊ-धुवू
घालून, गोंड्या-झुलींनी सजवून पूजा करत होते. त्यांचे फोटो काढून आम्ही
पाड्याच्या पाठीमागच्या धोडपच्या दिशेने निघालो. धोडपच्या पार्श्वभूमीवर
सपाट कुरणावर गुरं आणि शेळ्या चरत होत्या.मधेच एक घोडाही होता. कित्येक
दिवसांपासून मी या फ्रेमची वाट पाहत होतो.त्याचा फोटो काढला.
थोडा
वेळ पठारावर आराम केला. समोर धोडप आडवाच्या तिडवा उभा होता. प्रत्येक
गडाचं सौंदर्य निराळं. साल्हेर-सालोटा एखाद्या पावसात चिंब भिजलेल्या आणि
पोलके अंगाशी बिलगलेल्या नवथर तरुणीसारखे दिसत होते तर आज हा धोडप नुकताच
तालमीतून मेहनत करुन बाहेर आलेल्या, घामाने डबडबलेल्या पिळदार मल्लासारखा
शड्डू ठोकत सामोरा आला होता.सह्याद्रीचे प्रत्येक रुप हवेहवेसे. एखाद्या
अनाम शिल्पकाराने आपले सारे कसब पणाला लावून कोरुन काढलेले.
समोरच्या गुराख्यांना धोडपचा रस्ता विचारुन घेतला. समोर दिसत असला तरी धोडपची वाट सरळ नव्हती. ती त्या शेजारच्याही एका डोंगराला वळसा घालून जाणारी होती. वेळेचे गणित फिसकटण्याच्याच बेतात होते. दिसणार्या धोडपला पायी प्रदक्षिणा घालून त्याच्या मागच्या बाजूने वर जायला वाट आहे. आता पाय उचलायला हवे.अंधाराच्या आत धोडपवर पोचायचे तर सुटायलाच हवे होते. किमान दोन-तीन तासांचा रस्ता समोर दिसतच होता. काहीही करुन आम्हांला सुर्यास्त चुकवायचा नव्हता आणि मुक्कामाची जागा अंधार पडण्याच्या आतच नक्की करायची होती. त्याच घाईत निघालो असताना नको ते झालं. एका सांबर्या निवडुंगाच्या (सह्याद्रीच्या डोंगरात आढळणारा निवडुंगाचा एक प्रकार… याचा आकार सांबराच्या शिंगासारखा असतो) एका खोडाला माझा गुडघा ठोकरला. आई ग्ग… कळवळलो. नको ते झाले. एक भिडू जखमी. काटे घुसले होते ते काढले. कसाबसा उभा राहिलो आणि चालू लागलो. काही पावलं चालून गेल्यावर घेरा-धोडपचा सगळ्यात पहिला दरवाजा दिसला. पण बागलाणात दरवाजा दिसला म्हणजे किल्ला आला असे होत नाही. त्याच्या वर दोन तासांवर किल्ला असतो. अर्धा तास चालल्यावर एक विहीर दिसली. विटांनी बांधून काढलेली दगडी विहीर. सांगाती सह्याद्रीचा मध्ये वाचलेली खूण आठवली. पण याच्या आधी इथे आलेल्या श्रीकांतला काहीच आठवेना. आसपास शोधाशोध करुनही वाट सापडेना.मग आम्ही पुन्हा उरलेल्या प्रदक्षिणेवर निघालो. आता पाठीमागच्या फेसवर उजवीकडे तटबंदीचे अवशेष दिसू लागले. अजून थोडे पुढे जाताच दरवाजाही दिसला.त्या दरवाजातून आत गेल्यावर सोनारवाडी दिसली. एका घरातल्या पिंट्याला वाट विचारली तेव्हा त्यानं दाखवून दिली. शिवाय साठ पायर्या आहेत आणि एका ठिकाणी जपून जा असंही सांगितलं. आता धोडप समोर दिसत होता. वाटेत एका ठिकाणी वीस फुटी क्लाइंबिंग पॅच आहे. इक्विपमेंट लागत नाही पण तो जरा जपून पार केला की आपण अर्ध्या पाऊण तासात एका दरवाजाशी येतो.
तिथून पुढे पुन्हा एकवार कातळात कोरलेल्या पायर्या आणि दरवाजांची शृंखला. दरवाजाशी दोन शिलाखंडांत जोडून एक फारसी शिलालेख आहे. अर्थातच तो समजण्याचा दृष्टीने आमचा इल्ला!! पुढे झाल्यावर एका टेकाडावर आपण पोचतो आणि… आणि ही ती महाप्रसिद्ध धोडपची निरुंद माची.समोर धोडपचा बालेकिल्ला, अगदी तसाच… शड्डू ठोकत समोर आलेल्या मल्लासारखा,पाठीमागे मावळतीच्या सोनेरी उन्हात न्हालेला त्याचाच भाऊ इखारा (विखारा)सुळका, डावीकडे दूरवर रवळ्या-जवळ्याचे जुळे किल्ले. क्षितिजापर्यंत हिरवे झालेले खोरे. एक पॅनोरमा तो बनता ही है… (टीप: प्रत्यक्ष फोटोवर क्लिक करुन पाहिल्यास अधिक स्पष्टपणे पाहता येईल. डाऊनलोड करुन वॉलपेपरही लावू शकता).
समोर
एका मंदिराचे अवशेष आहेत. उजवीकडे एका महाकाय वाड्याचे. समोर धोडपचा
बालेकिल्ला उभा ठाकलेला. ढगांमध्ये पडलेल्या खिडकीतून त्याच्या पोटात
कोरलेल्या रेखीव चौकोनी गुहा लक्ष वेधून घेतात. अर्थात त्या खूप वर आहेत
आणि वर जायची वाट निसरडी आहे.बालेकिल्ल्याशी पोचण्यासाठी प्रस्तरारोहणाची
साधने आणि तंत्र आवश्यक आहे.अर्थातच आम्ही बालेकिल्ल्याच्या पोटाशी
खोदलेल्या आणि पाण्याचे टाके असलेल्या दुसर्या एका गुहेकडे मोर्चा वळवला.
बालेकिल्ल्याच्या डावीकडून वळसा घालून पुढे गेलो की कड्याला समांतर अशी एक
वाट आहे. त्याच वाटेने गेल्यावर ही आपली गुहा लागते. गुहा अतिशय ऐसपैस आहे.
किमान पन्नासेक लोक झोपू शकतील एवढी. एकात एक अशा दोन गुहा. आतली थोडी
खराब झाली आहे.बाहेरच्या गुहेत दुर्गेचे मंदिर बांधले आहे. आणि पाण्याचे
टाके याच मंदिराखाली. म्हणजे खाली पाणीसाठी आणि त्यावर बांधलेले हे जलमंदिर
अशी सुंदर रचना.
सुर्यास्ताची वेळ जवळ आल्याने अर्थातच बॅगा गुहेतच सोडून आम्ही आधी पश्चिम कड्याकडे धूम ठोकली. तिथे आमची वाट पाहत काय वाढून ठेवले होते? काल साल्हेरवर पाहिलेल्याच महानाट्याचा दुसरा अंक. जगत्नारायण सूर्य आपली दिवसाचे आवर्तन संपवून दिगंतराच्या प्रवासाला निघाला होता. जाता जाताही आपले असतील तेवढे सगळे रंग या सृष्टीवर उधळून. कुठला रंग विसरला होता? लाल, पिवळा, निळा, जांभळा, सोनेरी… सगळेच तर होते. समोरच्या खोर्यात घुसणारा धोडप माचीच्या सोंडेचा कडा, मध्येच त्याला पडलेले भगदाड, त्याहीपलीकडे रवळ्या-जवळ्या आणि पुढे विस्तीर्ण आकाश…सप्तरंगात न्हालेले. वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत. फोटो काढून झाल्यावर सगळ्यांनाच समाधी अवस्था प्राप्त झाल्यासारखे झाले होते. तिथेच मांडी ठोकून आम्ही त्या आलिशान ऍम्फीथिएटरमध्ये ध्यान लावून ते प्रकाशाच्या सप्तसूरांचे गान ऐकत होतो. एखाद्या मैफिलीचा शेवट जसा अचाट सुंदर भैरवीने व्हावा तशी ही आमची ही ट्रेकमधली शेवटची संध्याकाळ. अगदी परमोच्च सुंदर.मनात घर करुन राहिली. त्यासारखा सुर्यास्त ना आजवर पाहिला ना कदाचित पुन्हा अनुभवायला मिळेल. एकमेवाद्वितिय !!
अर्थात त्यानंतर अमावस्येच्या रात्री अचानक झालेल्या निरभ्र आकाशाखाली चांदण्या मोजत गुहेच्या दाराशी बसून खाल्लेले बैलपोळ्याचे मांडे, रात्री गुहेत कोंबडीच्या आकाराच्या पंचवीसेक उंदरांनी मांडलेला उच्छाद आणि सकाळी मारलेली धोडप माचीची रपेटही अशीच एकमेवाद्वितिय. खरं तर हा संपूर्ण ट्रेकच एकमेवाद्वितिय, साथसंगत एकमेवाद्वितिय, निसर्ग एकमेवाद्वितिय, सह्याद्री एकमेवाद्वितिय !!!
फोटो तो तो बनता ही है…( शेवटचा फोटो हा ३़ बाय ३ अशा एकूण नऊ फोटोंचा मॅट्रिक्स पॅनोरमा आहे).
धोडपच्या गुहेतील सकाळ |
धोडपमाची |
Ekmevadvitiy blog.....,
ReplyDeleteखूप आवडला
एकमेवाद्वितीय ब्लॉग...
ReplyDeleteखूप खूप आवडला.....