लडाख ड्रीम्स-१ (दिल्ली-मनाली-रोहतांग-केलॉन्ग)...
फोटोग्राफीला सुरुवात केली तेव्हापासून लडाखचे फोटो इंटरनेटवर पाहत
होतो. कधीतरी जावे असे मनाच्या एखाद्या कोपर्यात होतेच. भटके मित्र तसे
सह्याद्रीत कायम फिरतच असतो. पण कधीतरी कुटुंबाला घेऊन दिवेआगरला गेलो
असताना गप्पा मारता मारता लडाखचा विषय निघाला. साधारणतः पन्नास हजार
प्रत्येकी असा खर्च अपेक्षित असतो हे ऐकूनच खरं तर विषय सोडून दिला होता.
पण लडाखची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. थोडीफार माहिती काढली तेव्हा समजलं की
बजेटमध्ये ट्रिप होते. तेव्हा मार्चमध्येच ठरवून टाकलं की या सीझनला लडाख
फोटोटूर आखायचीच. जेवढ्या लवकर बुकिंग करु तेवढा अर्लीबर्ड डिस्काऊंट
मिळणार हे डोक्यात होतेच. एक साधारण इंटरनेटवरुनच काय पहावे, आणि काय चुकवू
नये याची यादी बनवली. त्यानुसार एक कच्चा आराखडा तयार केला. आता वेळ होती
तो प्लान कुणा एक्स्पर्टकडून व्हेरिफाय करण्याची आणि पुढचे बुकिंग
करण्याची. आधी सगळे स्वतःच प्लान करावा असे ठरवले होते. पण आपल्याला
डायरेक्ट मिळणारे हॉटेल्सचे आणि प्रवासाचे रेट आणि काही ओळख असेल तर
मिळणारे रेट्स यांत बराच फरक असतो. शिवाय त्या प्रदेशाची आपल्याला एवढी
माहिती नसते, प्रवासाचे गणित ठाऊक नसते, अंतर आणि वेळेची कल्पना नसते
म्हणून तो विचार बाजूला पडला. पुण्यातल्या एका टूर ऑपरेटरला विचारुन पाहिले
तर त्यांचाही आकडा पन्नास हजाराला टेकत असल्याने तोही विचार बारगळला.
फेसबुकवरील एक मैत्रिण, कल्पना, जिचा नवरा आर्मीमध्ये आहे आणि त्यावेळी
लेहमध्ये पोस्टिंगला होता तिच्याशी संपर्क साधून कुणी लोकल टूर ऑपरेटर आहे
का अशी चौकशी केली. कल्पनाने तेन्झिन दोरजी हे नाव सुचवले, सोबत नंबरही
दिला.
एका संध्याकाळी पुण्यात संभाजी पार्कात बसून तेन्झिनला फोन केला.
आमच्या ग्रुपचे सदस्य, त्यांची फोटोग्राफीची आवड, आमच्या अपेक्षा, टूर
साधारण कशी हवी, कुठली ठिकाणं हवीत किती दिवस हवी असं सगळं समजावून
सांगितलं. सगळं वर्कआऊट करुन दोन दिवसांनी तेन्झिनचा आकडा समजला.
मनाली-लडाख-मनाली अशा टूरचा आकडा खरोखर जवळपास निम्म्यावर आला होता.
थोडेफार प्लान बदलत, त्यावर तेन्झिनशी चर्चा करत, आमच्या सुट्ट्यांचं गणित
जुळवत शेवटी आम्ही पुण्याहून प्रस्थानाची एक तारीख फायनल केली २ ऑगस्ट
२०१३, आणि ती तेन्झिनला कळवून टाकली. विमानप्रवासाची तिकीटे (जी खूप आधी
काढल्यावर बरीच स्वस्त पडली) काढली, दिल्ली-मनाली बसप्रवासाची तिकीटं बुक
केली (फार आधी बुक केल्याने हवा तो सीटचा चॉईस), त्याच वेळी तेन्झिनला
आगाऊ रक्कम ट्रान्सफर करुन टाकली. सगळं झाल्यावर आमच्या हाती एकच काम होतं,
ते म्हणजे चार महिने अधीरतेने दिवस मोजत राहणे.
दरम्यान थोडीफार इकडे तिकडे माहिती काढून, तेन्झिनला रोज एकदा छळून
लेहमधल्या हवामानाची आणि हॉटेल वगैरे इतर गोष्टींची माहिती घेतली. दोन
ऑगस्टला धो-धो पावसात पुण्यातून बोर्डिंग पास हाती मिळवून सिक्युरिटी
चेकसाठी उभे राहिलो तेव्हा मन मात्र केव्हाच काचेतून दिसणार्या विमानात
बसून दिल्ली-मनाली-लेह असे पोचलेही होते.
फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या काही स्वप्नांत पोचलेल्या आम्ही ढगांच्या पुंजक्यांचे फोटो मिळवले आणि दिल्ली विमानतळावर पोचलो तेव्हा विमानातून बाहेर येतानाच "दिल्ली की गर्मी"चा अनुभव आला. प्रचंड दमट हवा आणि उकाडा ! दरम्यान तेन्झिनने ड्रायव्हरचा नंबर एसएमएस केला होता. टॉम त्याचं नाव. गेले तीन दिवस मनालीतच मुक्काम ठोकून होता. थोडं खाऊन घेतल्यावर मेट्रो फास्टलाईनने टर्मिनल-३शी जाऊन साधी मेट्रो पकडली. साधारण दीड तास लागला मंडी हाऊसला पोचायला. संध्याकाळी पाच वाजताची हिमाचल टुरिझमची दिल्ली-मनाली बस हा मनालीला पोचण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय. आरामदायक सीट्स आणि वेळेत मिळणारी सेवा. बसमध्ये सामान लोड केले तेव्हा दिल्लीच्या ठगाचा अनुभव. कितने बॅग है आपके? छह. चलो दो साठ रुपिये. म्हणजे एक बॅग फक्त जमिनीवरुन उचलून बसच्या खाली असलेल्या जागेत ठेवायला दहा रुपये. इलाज नव्हता. देऊन टाकले न काय. बसमध्ये एक मनाली-लडाख मोटरसायकल टूर करणार्या ऑस्ट्रेलियन लोकांचाही ग्रुप होता. पण ऑस्ट्रेलियन लोक तसे तेवढे फ्रेंडली नसतात त्याची प्रचिती आली. असो आपल्याला काय? बस लाल किल्ल्याच्या बाजूने पानिपतमार्गे चंदीगड आणि नंतर रात्रीच्या जेवणानंतर मंडी (हिमाचल)च्या दिशेने निघाली. पोटात गेलेल्या पनीर आचारी आणि सुंदर पंजाबी भोजनाने लवकरच डोळा लागला आणि पुढे ती जाग आली ती अगदी पहाटे मनालीच्या अलिकडे पनडोह धरणाच्या जवळच, गाडी चहाला थांबली तेव्हा. झोपेत असताना बस बर्याच खराब रस्त्यांवरुन गेली, एकदोन वेळा जमिनीला खालून आपटली हे सोबतच्या प्रवाशांनी सांगितले तेव्हाच समजले. चहानंतर पनडोह धरणाचा अजस्त्र पाण्याचा लोंढा पाहून पुढे कुलू मार्गे आम्ही मनालीकडे बस निघाली ती मोठमोठ्या पहाडांच्या कुशीतून आणि त्यात कोरलेल्या अवघड वळणदार घाटांतून. अगदी शार्प वळणं आणि डोक्यावर आलेल्या ठिसूळ दरडी. एका बाजूला खोल दरी आणि तळाशी बियास नदी. अगदी कसबी ड्रायव्हरचंच काम. उंच वाढलेली हिरवाई, चिंब झालेले पहाड, पहाडांच्या कुशीतली काड्यापेट्यांसारखी घरं आणि खळाळतं बियासचं पात्र... हे सारं डोळ्यांना सुख देत होतं.
मनालीत पोचता पोचता सकाळचे आठ वाजले होते. मनाली मार्केटमध्ये पोचल्याबरोबर गाईड्सचा जथ्था अंगावर आला. अगदी हातातल्या बॅगा हिसकावत चला साइट सीइंग, लडाख टूर, असं ओरडत अगदी ओढतच होते. कसेबसे त्या गर्दीतून बाहेर पडलो आणि पोटपूजेसाठी हॉटेल गाठले. ऑर्डर दिली तशी टॉमरावांना फोन केला, तर ते पाचच मिनिटांत स्कॉर्पिओसह हजर झाले. त्यांनी एक गोड अडचण सांगितली. टॉमची टॉमीणही दिल्लीवरुन आली होती आणि तिला गाडीत लेहपर्यंत ऍडजस्ट करता येईल का याची त्याने आमच्याकडे विचारणा केली. त्याला संमती देऊन आम्ही गाडीत बसलो, पण कॅमेरा बॅगा आणि माणसं यांचं काही कोष्टक गाडीच्या जागेत जमेना. टॉमरावांना अडचण समजली. म्हणाले केलॉंगपर्यंत ऍडजस्ट करु आणि मग तिला बसने लेहला पाठवू. मनाली शहराच्या आसपासचे दृश्य मनाला भुरळ घालत होते. एकदम ढगांत हरवलेल्या हिमालयाचे दर्शन, त्यांवरुन ओघळणारे मेघ आणि शहरावर चमचमणारा सूर्य. बरेच दिवस पाहिलेले लडाखी ड्रीम आज रात्री आम्हांला लेह शहरात पोचल्यावर दिसणार होते. पण तेथवरचा प्रवास एक नवीन अध्याय असणार होता. द ग्रेट हिमालयन आऊटबॅक.
या विभागातले सगळे रस्ते लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनाउअझेशन
म्हणजे सीमा सडक संगठनने तयार केले आहेत आणि त्यांच्या देखभालीची
जबाबदारीही त्यांनीच शिरावर घेतली आहे. मनालीच्या बाहेर पडल्याबरोबर
पहिल्याच पुलाशी जिथे "बॉर्डर रोड ऑर्गनाउअझेशन वेलकम्स यू" म्हणजे अगदी
अर्ध्याच किलोमीटरवर आम्ही "रुको रुको रुको..." ओरडत गाडीला कचकावून ब्रेक
मारायला लावला.फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या काही स्वप्नांत पोचलेल्या आम्ही ढगांच्या पुंजक्यांचे फोटो मिळवले आणि दिल्ली विमानतळावर पोचलो तेव्हा विमानातून बाहेर येतानाच "दिल्ली की गर्मी"चा अनुभव आला. प्रचंड दमट हवा आणि उकाडा ! दरम्यान तेन्झिनने ड्रायव्हरचा नंबर एसएमएस केला होता. टॉम त्याचं नाव. गेले तीन दिवस मनालीतच मुक्काम ठोकून होता. थोडं खाऊन घेतल्यावर मेट्रो फास्टलाईनने टर्मिनल-३शी जाऊन साधी मेट्रो पकडली. साधारण दीड तास लागला मंडी हाऊसला पोचायला. संध्याकाळी पाच वाजताची हिमाचल टुरिझमची दिल्ली-मनाली बस हा मनालीला पोचण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय. आरामदायक सीट्स आणि वेळेत मिळणारी सेवा. बसमध्ये सामान लोड केले तेव्हा दिल्लीच्या ठगाचा अनुभव. कितने बॅग है आपके? छह. चलो दो साठ रुपिये. म्हणजे एक बॅग फक्त जमिनीवरुन उचलून बसच्या खाली असलेल्या जागेत ठेवायला दहा रुपये. इलाज नव्हता. देऊन टाकले न काय. बसमध्ये एक मनाली-लडाख मोटरसायकल टूर करणार्या ऑस्ट्रेलियन लोकांचाही ग्रुप होता. पण ऑस्ट्रेलियन लोक तसे तेवढे फ्रेंडली नसतात त्याची प्रचिती आली. असो आपल्याला काय? बस लाल किल्ल्याच्या बाजूने पानिपतमार्गे चंदीगड आणि नंतर रात्रीच्या जेवणानंतर मंडी (हिमाचल)च्या दिशेने निघाली. पोटात गेलेल्या पनीर आचारी आणि सुंदर पंजाबी भोजनाने लवकरच डोळा लागला आणि पुढे ती जाग आली ती अगदी पहाटे मनालीच्या अलिकडे पनडोह धरणाच्या जवळच, गाडी चहाला थांबली तेव्हा. झोपेत असताना बस बर्याच खराब रस्त्यांवरुन गेली, एकदोन वेळा जमिनीला खालून आपटली हे सोबतच्या प्रवाशांनी सांगितले तेव्हाच समजले. चहानंतर पनडोह धरणाचा अजस्त्र पाण्याचा लोंढा पाहून पुढे कुलू मार्गे आम्ही मनालीकडे बस निघाली ती मोठमोठ्या पहाडांच्या कुशीतून आणि त्यात कोरलेल्या अवघड वळणदार घाटांतून. अगदी शार्प वळणं आणि डोक्यावर आलेल्या ठिसूळ दरडी. एका बाजूला खोल दरी आणि तळाशी बियास नदी. अगदी कसबी ड्रायव्हरचंच काम. उंच वाढलेली हिरवाई, चिंब झालेले पहाड, पहाडांच्या कुशीतली काड्यापेट्यांसारखी घरं आणि खळाळतं बियासचं पात्र... हे सारं डोळ्यांना सुख देत होतं.
मनालीत पोचता पोचता सकाळचे आठ वाजले होते. मनाली मार्केटमध्ये पोचल्याबरोबर गाईड्सचा जथ्था अंगावर आला. अगदी हातातल्या बॅगा हिसकावत चला साइट सीइंग, लडाख टूर, असं ओरडत अगदी ओढतच होते. कसेबसे त्या गर्दीतून बाहेर पडलो आणि पोटपूजेसाठी हॉटेल गाठले. ऑर्डर दिली तशी टॉमरावांना फोन केला, तर ते पाचच मिनिटांत स्कॉर्पिओसह हजर झाले. त्यांनी एक गोड अडचण सांगितली. टॉमची टॉमीणही दिल्लीवरुन आली होती आणि तिला गाडीत लेहपर्यंत ऍडजस्ट करता येईल का याची त्याने आमच्याकडे विचारणा केली. त्याला संमती देऊन आम्ही गाडीत बसलो, पण कॅमेरा बॅगा आणि माणसं यांचं काही कोष्टक गाडीच्या जागेत जमेना. टॉमरावांना अडचण समजली. म्हणाले केलॉंगपर्यंत ऍडजस्ट करु आणि मग तिला बसने लेहला पाठवू. मनाली शहराच्या आसपासचे दृश्य मनाला भुरळ घालत होते. एकदम ढगांत हरवलेल्या हिमालयाचे दर्शन, त्यांवरुन ओघळणारे मेघ आणि शहरावर चमचमणारा सूर्य. बरेच दिवस पाहिलेले लडाखी ड्रीम आज रात्री आम्हांला लेह शहरात पोचल्यावर दिसणार होते. पण तेथवरचा प्रवास एक नवीन अध्याय असणार होता. द ग्रेट हिमालयन आऊटबॅक.
टॉमरावांनी दचकून मागे पाहीपर्यंत मंडळी पटापटा गाडीतून उड्या टाकून क्लिकक्लिकाटाच्या कामाला जुंपलेही होते. मीच मग "ये अभी ऐसाच चलनेवाला है दस-ग्यारह दिन" असं म्हणत टॉमला आमच्या टूरचं उद्दिष्ट समजावलं. त्याच्यासाठी हे नवीन होतं, म्हणून त्याने फक्त मान डोलावली. तिथून मनासारखे फोटो मिळाल्यावर आम्ही रोहतांगच्या दिशेने घाट चढू लागलो. टॉम अतिशय आत्मविश्वासाने सावकाश सर्वतोपरी काळजी घेऊन घाट चढत होता. पण समोरुन आलेल्या एका जीपच्या मनात काही तरी वेगळंच होतं. एका ब्लाइंड टर्नवर ती जीप प्रचंड वेगाने येऊन आमच्या स्कॉर्पिओवर आदळली. थोडीशी गाडी दरीच्या बाजूला सरकली पण टॉमने शिताफीने तिच्यावर नियंत्रण मिळवले आणि दरीपासून अर्ध्या फुटावर ती थांबली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. टॉमीण तर भीतीने थरथर कापत होती. आमचीही अवस्था काहीशी तशीच होती. पण देवानेच आलेले विघ्न टाळले हा त्याचा आशीर्वाद असे समजून पुढे चाल दिली.
रोहतांगचा घाट चढताना तर वळणा-वळणाला आम्ही गाडी थांबवत होतो.
नजर जाईल तिथे नभी टेकलेले डोंगर सुळके, पाईनच्या वृक्षांची वनराजी आणि
हिमाच्छादित शिखरांच्या रांगा, त्यांच्याशी लगट करणारे मेघ. कुठलीही गोष्ट
फोटोग्राफरच्या नजरेतून सुटणार नाही. रोहतांग टॉपला पोचलो तेव्हा दुपार
झाली होती. सगळीकडे ढग जमले होते. रस्ता अतिशय खराब आणि अरुंद. एकावेळी एकच
गाडी जाऊ शकेल अशा रस्त्याने रोहतांग ओलांडून आलो की आसपासचा परिसर अचानक
बदलतो. निळेशार आकाश, पांढरे शुभ्र ढग, खुरटे गवत वाढलेल्या डोंगररांगा
सोबतीला थंडगार हवा. रस्ता मात्र आता सुरेख होता. अगदी नवा कोरा. एका
कोपर्यावर एक मावशी मॅगी आणि चहा करुन देत होती. तिथे थांबून पोटपूजा
उरकली आणि गरमागरम चहा घेऊन पुन्हा गाडीत बसलो.
परंतु चांगल्या रस्त्याचे सुख फार वेळ टिकले नाही. अचानक फुटाफुटाचे खड्डे आणि वर आलेले दगड. पूर्ण रोहतांगचा घाट दुसर्या बाजूने उतरेपर्यंत अतिशय खराब रस्ता. गाडीत आम्ही अक्षरशः एकमेकांवर आदळत होतो. बहुतेक चायनीज लोकांना स्टर-फ्रायची कल्पना गाडीतल्या अवस्थेवरुनच सुचली असावी. रोहतांगचा घाट उतरला की कोकसर नावाचे गाव लागते. तिथे आपले टुरिस्ट परमिट दाखवावे लागतात. फोटोग्राफीकडे पूर्ण वेळ देण्याच्या दृष्टीने ती कटकट नको असेल तर आपला गाईड आपल्यासाठी आधीच सगळे परमिट्स काढून ठेवू शकतो. टॉम ते सोपस्कार करेपर्यंत आम्ही कोकसर गावात इकडे तिकडे लहान मुलांचे पोर्ट्रेट्स, हिमाचली लोकजीवन, तिथले रंगीबेरंगी घरं, गावामागची नदी, नदीवरला पूल, त्यावरुन येणार्या-जाणार्या गाड्या, पलीकडे असलेली हिमशिखरे असं काय काय कॅमेरात साठवत होतो. कोकसरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची उदरभरणाची सोय होते. मीट-चावल (म्हणजे भात आणि मटण) किंवा मोमो, नूडल्स अशा गोष्टी उपलब्ध आहेत.
कोकसरपासून पुढे रस्ता तसा बरा आहे. डावीकडे खोल दरी, त्यापलीकडे उंच
पर्वतरांग आणि उजवीकडे लहान लहान गावे. गावांमधली पांढरा रंग दिलेली घरं,
एका विशिष्ट प्रकारच्या खिडक्या, छतांना असलेल्या लाकडी महिरपी, बाहेर
बागडणारी लहान मुलं, आसपास चरणार्या मेंढ्या... आम्ही पाहिलेले लडाखी
ड्रीम हेच का? हे तर अजूनच काहीतरी भारी आहे. इथेच एका ठिकाणी रोहतांगच्या
नव्या बोगद्याचे काम सुरु आहे. एकदा हा बोगदा झाला की किमान साठ किलोमीटरचा
वळसा आणि अवघड घाटरस्ता वाचेल आणि प्रवास सुकर होईल.परंतु चांगल्या रस्त्याचे सुख फार वेळ टिकले नाही. अचानक फुटाफुटाचे खड्डे आणि वर आलेले दगड. पूर्ण रोहतांगचा घाट दुसर्या बाजूने उतरेपर्यंत अतिशय खराब रस्ता. गाडीत आम्ही अक्षरशः एकमेकांवर आदळत होतो. बहुतेक चायनीज लोकांना स्टर-फ्रायची कल्पना गाडीतल्या अवस्थेवरुनच सुचली असावी. रोहतांगचा घाट उतरला की कोकसर नावाचे गाव लागते. तिथे आपले टुरिस्ट परमिट दाखवावे लागतात. फोटोग्राफीकडे पूर्ण वेळ देण्याच्या दृष्टीने ती कटकट नको असेल तर आपला गाईड आपल्यासाठी आधीच सगळे परमिट्स काढून ठेवू शकतो. टॉम ते सोपस्कार करेपर्यंत आम्ही कोकसर गावात इकडे तिकडे लहान मुलांचे पोर्ट्रेट्स, हिमाचली लोकजीवन, तिथले रंगीबेरंगी घरं, गावामागची नदी, नदीवरला पूल, त्यावरुन येणार्या-जाणार्या गाड्या, पलीकडे असलेली हिमशिखरे असं काय काय कॅमेरात साठवत होतो. कोकसरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची उदरभरणाची सोय होते. मीट-चावल (म्हणजे भात आणि मटण) किंवा मोमो, नूडल्स अशा गोष्टी उपलब्ध आहेत.
आम्ही केलॉंगला पोचलो तेव्हा सूर्याने आपला पसारा आवरायला घेतला होता. किरणं सोनसळी झाली होती. हिमाच्छादित शिखरांच्या पलीकडे जाणारा सूर्य आणि त्याचं केलॉंग आणि आसपासच्या गावांवर सांडणारं सोनं आम्ही कॅमेरात बंदिस्त करत होतो. समोरचा गोम्पा अधिकच सुंदर दिसत होता. खोर्यात "ॐ मणि पद्मे हूं" चे नाद घुमत होते.
शिखरांवर ढगांची सलगी चालू होती. मावळत्या सुर्याने त्या ढगांवर अनेकविध रंगांची आरास केली होती. आम्ही मिळेल त्या ठिकाणाहून आसपासच्या फ्रेम्स कॅमेरात बंदिस्त करु पाहत होतो. जसा जसा अंधार पडला तसा भागा नदीच्या खोर्यात थंडीने आपले पाय पसरायला सुरुवात केली, शेकोतीच्या धुराची वलयं दरीत उमटू लागली, पलीकडल्या गोम्पामधले दिवे मिणमिणू लागले. हॉटेलमध्ये सुंदरसे जेवण करुन आम्ही झाल्या प्रवासाचा उजाळा करत उबदार पांघरुणार गप्पा मारता मारता स्वप्नांत हरवलो... उद्यापासून नवीन स्वप्नांच्या दुनियेत जाण्यासाठी.
0 comments