Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

रायगडवारी सातव्यांदा

By Unknown
/ in Raigad shivaji Trek शिवराज्याभिषेक
19 comments
रायगड, तिथला राजमहाल, दफ्तर-कचेर्‍यांच्या इमारती, राज्याभिषेक ज्या राजदरबाराने अनुभवला ती जागा, नगारखाना, होळीचा माळ, सिंहासनाधीश पुतळा, तिथून दिसणारा सुर्यास्त, गंगासागर-कुशावर्त तलाव, सातमजली मनोरे, जगदीश्वर मंदिर, शिवसमाधी आणि खाली पाचाडला राजमाता आऊसाहेबांची समाधी यांचे आम्हां दुर्गभटक्यांच्या मनात एक चित्र कायम कोरलेले असते. अखंड महाराष्ट्राने नव्हे मानवजातीने नतमस्तक व्हावे अशी ही जाणत्या राजाचा पदस्पर्श लाभलेली पावन भूमी.
मराठी इतिहासाच्या कलशारोहणाचा सुवर्ण साक्षीदार. नाव घेताच आता जाऊन भेटून यावे की काय अशी मनाची अवस्था. आजही तिथे गेले की मनाच्या गाभार्‍यात गर्जना घुमते...
"प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज.... की जय!!!"

पहिला मराठी राजा छत्रपती झाला, सिंहासनाधीश्वर झाला तो सुदिन म्हणजे ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६. त्या सुवर्णदिनाच्या आठवणी जागवत यंदा शिवराज्याभिषेक दिनी रायगडवारी करायची आहे , येणार का? असे मित्रांनी विचारताच "उचलली सॅक, लावली पाठीला". या पवित्र वारीला नकार देण्याइतका करंटा मी कधीच नव्हतो. एका पायावर तयार झालो. पहाटे शूचिर्भूत होऊन वैष्णवजन पंढरीला निघतात त्याच भावनेने पहाटे चारला गजर न लावता उठून तयार झालो. आणि बॅगा गाडीत टाकल्या. गणपती बाप्पा मोरया म्हणत गाडीला स्टार्टर मारला. सोबत होते संतोष (जुना आणि हक्काचा ट्रेकमेट, मध्ये दोन वर्षे बंगळूरात होता आता आलाय पुण्यात), आशिष, दोन सचिन आणि रोहन. या वेळी गाडी होती टाटा सफारी, ती पण व्हीआयपी नंबरवाली, ऑफव्हाईट कलर. रस्त्यावर गाड्या आपसूक जागा देत होत्या. सातारा रोडवरुन भोर फाट्याने आत वळालो आणि भोर नाक्यावर चहा झाला. वळसा घालून वरंधाच्या रस्त्याला लागलो. पावसाळा येणार असल्याची चाहूल लागत होती. कुंद हवा आणि डोंगरांना ढगांनी फेटे घातलेले. अशा वातावरणात गाडीतला एसी कुणाला हवाय म्हणून खिडक्या उघडल्या. देवघर धरणात पाण्याने एकदम तळ गाठला होता. पात्रातली बोडकी झाडे आकाशाकडे हात करुन पाऊस मागत होती. देवघरच्या जलाशयाला वळसा घालून वरंधच्या खिंडीत येऊन पोचलो. वातावरणात झालेला बदल जाणवू लागला. गारवा वाढला आणि काही पाऊससरीही कोसळल्या. इथून पुढले या सीझनचे सगळे ट्रेक्स सुंदर होणार याची खात्री पटली. वरंध्यातली नागमोडी वळणे वळवळत वाघजाईला थांबलो. दूरवर सह्याद्रीची रांग ढगांमध्ये बुडाली होती, कावळ्या किल्ल्याकडे जाणारी वाट स्पष्ट दिसत होती. वाघजाईची कुंद धुक्यातली दरी आणि जुन्या धबधब्यांच्या पांढरट रेषा सरींची वाट पाहत होत्या. कुठल्याही क्षणी आभाळाला पान्हा फुटेल आणि तो धरणीला तृप्त करेल अशी अवस्था होती. तिथे कांदाभजीची फर्माईश झाली. वाघजाईचे दर्शन घेऊन घाटातल्या एका टपरीवर भजी आणि चहाचे पुढले आवर्तन घडले. आणि आता न थांबता रायगड गाठायचा असे मनाशी पक्के करुन निघालो. स्टिअरिंगवर कसलेला सचिन आणि चांगले रस्ते यांची मस्त सांगड जमून आली. आणि महाडच्या बाजूने रायगड फाट्याने आत वळालो. आता शिवराज्याभिषेकाचे उत्सवी वातावरण जाणवले. अनेक शिवप्रेमी भगवा घेऊन रायगडी निघाले होते.
"अवघा एकचि ध्यास, रायरीला शिवभेटीची लागलीसे आस"

साधारण नऊच्या सुमाराला पाचाडला पोचलो. पुढे पोलिसांनी गर्दीमुळे रस्ता बंद केला होता. रोपवे साठी चार-पाच तासांचा वेटिंग असल्यामुळे वयस्कर शिवप्रेमींचे हाल होणार होते. त्यामुळे दोन किलोमीटरची पायपीट वाढणार होती. पण आम्हांला काय त्याचे. जायचे म्हणजे जायचे. तिकडेच गाडी पार्क करुन टोप्या आणि बाटल्या काखोटीला मारुन ’जय शिवराय’ करत वाटचाल सुरु केली. हवामान खूप दमट होते. डांबरी सडकेवरची चढण, थोडे ऊन आणि दमट हवामान त्यामुळे धाप लवकर लागत होती. पुढल्या चौकातून चित्त दरवाजाच्या रस्त्याला वळालो. संपूर्ण रस्ता पार्क केलेल्या गाड्या आणि उत्साही आबालवृद्ध शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. त्यात महिलांचा आणि लहान मुलांचा सहभागही लक्षणीय होता. एकाच उद्देशाने सर्वजण आले होते. ’तो’ सुवर्णक्षण आज अनुभवायचा. पंधरा-वीस मिनिटांत चित्तदरवाजाशी आलो. तिथे एके ठिकाणी माझ्या पुस्तकांच्या विशलिस्टपैकी एक "महाराष्ट्र देशा"ची विक्री चालू होती तेही आहे त्याच किंमतीत. क्षणाचाही विचार न करता आम्ही विकत घेतली. पण आता जड पुस्तके वर घेऊन कसे जायचे? म्हणून एका सरबताच्या टपरीवर सरबत घेतले आणि त्यांच्याकडे पुस्तके ठेवली. एकदा गडाचा आवाका डोळे भरुन पाहून घेतला आणि सभासद बखरीतली नोंद आठवली

‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा’

कातीव कडे आणि उंची, आसपासच्या डोंगररांगेतून वेगळा निघालेला आणि उंची म्हणजे चढाई सुरु करायच्या आधीच दहादा विचार करावा अशी. खुबलढा बुरुजाच्या बाजूने उध्वस्त दरवाजामधून चढण सुरु होते. अनेक लहान मुले आणि साठ वर्षांच्या वरची मंडळी गड चढत बाकीच्यांचा उत्साह वाढवीत होते. गडावर पोलिस बंदोबस्त होता. काही खड्या पायर्‍या आणि मग थोडी सपाट जागा अशी ही एकंदर सगळी चढण आहे. पायर्‍या नेहमीच दमवणार्‍या असतात. एकतर त्यांचा आकार एकसारखा नसतो आणि चढताना पाय अधिक वर उचलावा लागतो. त्यामुळे पुरातत्त्व खात्याला आम्हां ट्रेकर्सचे सांगणे आहे, "रस्ता नको पण पायर्‍या आवर".
पहिली चढण ओलांडून मोकळ्या हवेला आलो आणि आकाशात हेलिकॉप्टर घोंगावू लागले. दूर पाचाडला उतरलेले दिसले. तिथून वाहनांचा जथ्था रोपवेकडे जाताना दिसला. असतील कुणी राजकीय मंडळी, आम्हांला काय त्याचे म्हणून आम्ही चढाई सुरुच ठेवली. खूप थकवणारे वातावरण आणि गडाची ठेवणच अशी आहे की पश्चिमेचा वारा चढताना लागत नाही. त्यामुळे घामाघूम झालो. एकदोन ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबत दम टाकत महादरवाज्यावर पोचलो. महादरवाज्याची ठेवणच अशी की अचानक शत्रूला हल्ला करता येऊ नये. हत्ती किंवा लाकडी ओंडका लावून दरवाजाला धक्का देऊन फोडता येऊ नये. वरुन बुरुजाच्या जंग्या (बुरुजाला ठेवलेली छिद्रे) मधून दरवाजाशी लगट करणार्‍या शत्रूवर हल्ला करण्याची सोय. तत्कालीन वास्तुकार हिरोजी इंदुलकर यांच्या प्रतिभेचे प्रतीक. दरवाज्यातून पुढे आले की पुन्हा बरीचशी चढण आहे. इथून एका बाजूला एक वाट सरळ टकमक टोकाच्या कड्याशी असणार्‍या गुहेवजा मंदिरात जाते आणि मुख्य वाट गंगासागर तलाव, हत्ती तलावाच्या बाजूने होळीच्या माळावर. याच होळीच्या माळावर महाराजांनी पेटत्या होळीतून नारळ काढणार्‍या मावळ्यांना सोन्याचे कडे बक्षीस दिले असेल. आपल्या पुत्राला- संभाजीराजांना हाच पराक्रम करताना त्यांचा ऊर अभिमानाने भरुन आला असेल.

जिल्हा परिषदेच्या इमारतीभोवती खूप गर्दी उसळली होती. छत्रपतींचे तेरावे वंशज संभाजीमहाराज यांनी रायगडाच्या वारकर्‍यांसाठी जेवणाची यथायोग्य व्यवस्था केली होती. होळीच्या माळावर आलो तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. बाजारपेठेच्या मागेच सावलीला थोडावेळ आराम करुन दरबारात आलो. संभाजीमहाराजांनी मेघडंबरीतील मूर्तीचे पूजन केले आणि सुवर्णमोहरांचा अभिषेक करवला, तेव्हा एकच आरोळी उठली "जय भवानी, जय शिवराय". वरुणराजालाही राहवले नाही. तोही सहस्त्रधारांनी रायगडावर जलाभिषेक करु लागला. जोरदार सरी कोसळल्या. याच ठिकाणी दरबारी मानकर्‍यांसमोर, अनेक पाहुण्यांसमोर, आपल्या जीवाभावाच्या सवंगड्यांसमोर महाराजांवर सप्तसिंधूसरिताजलाने अभिषेक झाला असेल, हाती राजदंड घेतला असेल, ते छत्रपती झाले असतील, आऊसाहेबांच्या डोळ्यां अश्रू तरळले असतील आणि गागाभट्टांच्या मार्गदर्हनाखाली मंत्रोच्चार झाला असेल
"प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... 
राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज...!!!"

नकळत छाती फुगून आली आणि डोळे पाणवले. तदनंतर पालखीत चांदीची शिवप्रतिमा बसवून ती जगदीश्वराच्या दर्शनाला गेली आणि आम्ही होळीच्या माळावर आलो.
तिथे उपस्थित जनांच्या उत्साहाला उधाण आले होते. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे खेळ, भगवा नाचवणे, तलवारबाजी, भाला, लाठीकाठी, फरीगदगा असे अनिकविध खेळ सुरु होते. कित्येक मुली नऊवारीमध्ये आल्या होत्या. संगणक युगातही मराठी संस्कृतीचा झेंडा डौलाने फडकत असल्याचा अभिमान वाटला. जगदीश्वराकडे जाऊन दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीशी नतमस्तक झालो आणि बाहेर येऊन लिंगाणा पाहिला. किती वेगळा दिसत होता आज तो... मागल्या वेळी महिन्याभरापूर्वीच मोहरीच्या पठारावरुन बोराट्याच्या नाळेमधून आपली भेट झाली होती आणि रात्रभर हितगूज केले होते असेच जणू तो सांगत होता. बाहेर कठड्यावर बसलो असतानाच या ब्लॉगचा एक वाचक येऊन "तूच पंकज का?" असे विचारुन गेला... उगाचच आपला इगो सुखावून घेतला. तिथून परत निघालो आणि गड उतरायला सुरुवात केली.

एके ठिकाणी टीशर्टची विक्री होत होती, एक टीशर्ट खूपच आवडला... त्यावर घोषवाक्य छापले होते "तोचि माझा सह्यकडा, मनात पूजीन रायगडा". लगेच एक घेऊन टाकला.

येताना भगव्याचा एक सुंदर फोटो मिळाला, कायम जपून ठेवावा असाच.


खाली येऊन पाचाड गावात आऊसाहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो आणि पुण्याकडे प्रयाण केले ते पुन्हा रायगड वारीला यायचे हे निश्चित करुनच...!!!

Related Posts

19 comments:

  1. अमित कुलकर्णी8 June 2010 at 13:02

    अप्रतिम... खूप सुंदर वर्णन... शिवराज्याभिषेक प्रत्यक्ष अनुभवता आला नसला तरी तू अनुभवून दिलास... धन्यवाद..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. रोहन चौधरी ...8 June 2010 at 16:12

    वा पंकज... ह्यावर्षी जायला जमल नाही पण तू फिरवून आणलेस की रे... :) आता शिवरायांच्या आज्ञेने यंदाची भटकंती बहरू दे... वंदे शिवराय...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Smit Gade8 June 2010 at 17:21

    भारलेल्या वातावरणात भारलेला ट्रेक..
    (ता.क. मीच तो कठड्यावर भेटलेला वाचक )

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. Vaibhav8 June 2010 at 17:47

    ॥ जय भवानी, जय भवानी ॥
    ॥ जय शिवाजी, जय शिवाजी ॥


    अत्यंत सुरेख शब्दात लिहिले आहेस सारे वर्णन..मित्रा खरच ग्रेट आहेस तू...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Mahendra8 June 2010 at 19:36

    येणे झाले नाही, पण वृत्त्तांत इतका व्य्वस्थित लिहिलाय की तिथे जाउन आल्यासारखे समाधान मिळाले. फोटो अजून असतिल ना? ते कधी पोस्ट करणार?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. सागर पुन्हा नवीन.....8 June 2010 at 22:07

    पंकज भाऊ एकदम झक्कास लेख झालाय...शिवराज्याभिषेकाचे प्रत्यक्ष दर्शन झाले तुझा लेख वाचून...खरच मनापासून धन्यवाद रे तुला....असाच लिहित रहा..पुढच्या ट्रेक साठी खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Vrinda9 June 2010 at 02:34

    Mastttttt... khup sundar lihila ahes.. mi ajun raigad baghitala nahipan tithe jaun aalyasarkha vatala.. :))

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Vikrant Deshmukh...9 June 2010 at 02:45

    सणसणीत जमलाय रे नेहमीप्रमाणेच...... वाह वा...... अतिशय भारी लेखन !!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Makarand9 June 2010 at 06:00

    खुप छान लेख झाला आहे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. Sunit9 June 2010 at 21:35

    Khup mast... ekdam Sukhavalo... !!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Anonymous9 June 2010 at 22:27

    Awesome! Next time, I'm sure gonna join you.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Anonymous10 June 2010 at 02:41

    Winner all the way!!

    ~Prashant

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. Savangadi (सवंगडी)10 June 2010 at 03:39

    सचित्र वर्णनाबद्दल आभारी आहे, धन्यवाद!
    पुढच्या वेळेस मी पण येणार...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. भुंगा10 June 2010 at 22:31

    "प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज...!!!"

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. hemant dabholkar10 June 2010 at 23:30

    पंकज,
    आम्हीही रायगडचे वारकरी आतापर्यंत ३२ वारया झाल्यात,प्रदक्षिणा सुद्धा,
    गेल वर्षभर पाय मोड्ल्यामुळे घरात आहे.पाय बरा झाल्यावर लगेच तुझ्याबरोबर १ ट्रेक करण्याची इच्छा आहे. बघु कस जमतय ते.तुझ्या छायाचित्रणाचा मी मोठ्ठा पंखा आहे

    ReplyDelete
    Replies
      Reply
  16. विशाल तेलंग्रे10 June 2010 at 23:46

    नेहमीच्या पेक्षा ही ट्रेक खरेच मस्त झालेली दिसते... रायगड कधीतरी पाहायचेच् आणि तेही शिवराज्याभिषेक दिनीच, असा माझाही संकल्प आहे... तुझ्या ह्या पोस्टमधील सचित्र वर्णनामुळे माझी उत्सुकता आणखीनच वाढ॒लिय॒!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  17. art mann15 June 2010 at 21:16

    "प्रौढप्रताप पुरंधर... क्षत्रिय कुलवतंस... गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर... राजाधिराज... छत्रपती शिवाजी महाराज...!!!"

    ReplyDelete
    Replies
      Reply
  18. Nikhil20 June 2010 at 02:18

    खरंच खूपच छान...
    मी पण एक धारकरी आहे...
    बरेच वेळा रायगडला भिडे गुरुजींबरोबर मोहिमेच्या नादाने जाण्याचा योग आला.,,
    एकदा आपल्याबरोबर ही
    जाण्याचा योग यावा हीच प्रार्थना...

    - निखिल भोसले
    सातारा,हिंदुस्तान.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  19. Gr8G@uri25 June 2010 at 03:26

    अप्रतिम... खूप सुंदर वर्णन...

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1