सांधण व्हॅली आणि अमृतेश्वर व्हाया भंडारदरा
सांधण व्हॅलीबद्दल बरेच काही ऐकून होतो. जेव्हा इंटरनेटवर त्याबद्दल वाचले तेव्हा लगेच जावे असे वाटायला लागले होते. लगेच देवेंद्रला लिंक पाठवली. चार ओळींच्या चॅटमध्येच प्लॅन फायनल.
Devya: Pankya, Sandhan valley kaay place aahe rao
me: ho na. kadhi jayache? 2 divas lagatat.
Devya: Ya weekend la?
me: Done!
शुक्रवारी ऑफिसनंतर रात्री निघून वाटेत एखाद्या धाब्यावर कोंबडीला स्वर्गात पोचवून पोटपूजा करायची, तेवढाच तिचा जन्म सार्थकी लागेल. पुढे मध्यरात्री संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी (भंडारदरा) मार्गे साम्रद गावी पोचणे आणि पहाटे सांधण दरीत उतरणे असा बेत होता. मी आणि देव्या आणि मंजिरी (देव्याची बेटर हाफ) फायनल होतो. अन्य कुणी येतंय का ते विचारायला एक मेलामेली केली. सुहास आणि सौमित्र तयार झाले. त्यातच देव्याने नवीनच कार घेतलीये. म्हणून मग तिला डोंगरातल्या रस्त्यांची सवय लावणे जरुरीचे होते. पाच लोक आणि गाडी फुल. काही लोकांना ऐन वेळी नाही म्हणून सांगावे लागले. एक बरे होते. मंजिरी असल्यामुळे स्वयंपाकाची काळजी नव्हती. त्यामुळे खाण्याची ऐश होणार होती. पण नशीबच नव्हते कदाचित त्या दिवशी. काही कामास्तव तिचे येणे कॅन्सल झाले. त्यामुळे आता बरोबरच्या सुहास आणि सौमित्रला आम्ही केलेले खाणेच भाग होते (तसे खिचडी, मॅगी आणि सूप असला स्वयंपाक आम्हांला छान जमतो) पण फर्माइशी मेन्यू मिळणार नव्हता. असो...
शुक्रवारी ऑफिसला लवकरच कलटी मारून देव्याला कॉल केला. तो पण ऑफिसमध्येच होता. तिथून बाहेर पडून नूडल्स, सूप पावडर, चहाचे सामान असे काखोटीला मारुन बॅगा गाडीत कोंबल्या. सुहासच्या ऑफिसवरुन त्याला आणि सौमीला पिक केले आणि साडेनऊला वाजता गाडी नाशिक हायवेला लावली. नवीन गाडी आणि ऐसपैस जागा, त्यामुळे फारच भारी प्रवास वाटत होता. पोटात कावळे बोंबलत होते. राजगुरुनगरला आल्यावर आम्हांला माहीत असलेले चांगले हॉटेल म्हणजे स्वामिनी. गाडी लावली बाहेर आणि आत गेलो. घरी आणि ’तिकडे’ फोन करुन आता रेंज येणार नाही, फोन करु नका असे सांगून मोकळा (शब्दशः मोकळा) झालो. आत गेल्यावर आम्हांला मेनूकार्ड पहायची काय गरज, डोळे झाकून एक फुल्ल चिकन हंडी आणि रोटीची ऑर्डर. मस्त आडवा हात मारुन ताव मारला. ग्रेव्हीची टेस्ट फारच मस्त होती. तिथे एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा होता. माझे वजन केले आणि चक्क ते चार किलो अधिक झाल्याचे पाहून माझे मलाच मूठभर मांस चढले.
आता गाडी संगमनेरच्या रस्त्याला लागली. मागे बसलेल्या सुहास आणि सौमीच्या पोटातली कोंबडी पेंगायला लागली आणि आमची जास्त बडबड करायला लागली. पुणे नाशिक रोड म्हणजे खूप वाईट ड्रायव्हिंग अनुभव. समोरुन येणार्या गाड्या अचानक बाहेर निघून ओव्हरटेक करतात. मध्येच कुठे काम चाललेले, कुठे खड्डे. त्यात समोरच्या हेडलाईटचा त्रास. संगमनेरला पोचता पोचता दीड वाजला होता. अजून बराच टप्पा गाठायचा होता. पुढे काही मिळणार नाही म्हणून संगमनेर नाक्यावर चहा मारला. एसटी स्टॅंडला लागूनच अकोलेकडे जाणारा रस्ता आहे. तिथून गाडी डावीकडे वळवली. पूर्वी कळसूबाईच्या ट्रेकला येताना याच रस्त्याने गेल्यामुळे रस्ता माहीतच होता. पण रात्री थोडे पुढे गेल्यावर चौकात सगळेच रस्ते एकसारखे दिसू लागले. आता एवढ्या रात्री कोणाला विचारणार? एक शाळा (की सभागृह) दिसली. तिथून आवारातून एक बाईक ’टिब्बलशीट’ बाहेर येत होती. त्यांना विचारले. त्यांची गाडी ’टाईट’च होती (एवढ्या रात्री दुसरे कोण भेटणार). त्यांना रस्ता विचारला तर मागे बसलेल्या दोन जणांनी दोन दिशांना हात दाखवले. नशीब गाडी चालवणारा तिसरा होता त्याच्या हातात गाडीचे हँडल होते, नाहीतर त्याने तिसरी दिशा दाखवली असती. शेवटी तेच म्हणाले या आमच्या मागे. थोडे पुढे जाऊन बोर्ड दिसला "अकोले". रस्ता एकदमच सुपर. समोरुन गाड्या नाहीत आणि एकही खड्डा नाही. गाडी ९०-१०० ने जात होती. अर्ध्या तासात अकोले आणि पुढे राजूरचा रस्ता. थोडेफार ढग डोंगरांच्या माथ्यावर दिसत होते. अगदीच किरकोळ पुंजके. चंद्रप्रकाश एवढा होता की गाडीच्या हेडलाईट बंद करुनही गाडी चालवता येत होती. रंधा धबधब्याकडे जाणारा रस्ता मागे टाकून आम्ही जरा ब्रेक म्हणून प्रवरेच्या एका मोठ्या पुलावर गाडी थांबवली. गाडीतून बाहेर आलो आणि समोर जे दृश्य होते ते अभूतपूर्व होते. शीतल चांदण्यात खाली नदीचे पाणी चमचमत होते. जसे चांदणे खाली पाण्यावर अंथरुन ठेवले होते. मंद गार वारा वाहत होता. बराच वेळ तिथे थांबलो. आणि लवकर पोचायला पाहिजे असे बजावून निघालो.
कळसूबाईचे दर्शन झाले आणि थोडीफार रस्ता चुकल्याची जाणीव झाली. डावीकडे कळसूबाईच्या माथ्यावर आणि आजूबाजूच्या पर्वतरांगेवर अतिशय दाट ढगांनी आक्रमण केले होते. खाली स्वच्छ चांदणे आणि डोंगरमाथ्यावर दाट काळे ढग. आयुष्यात असे दृश्य पहिल्यांदाच पाहत होतो. रस्त्याच्या उजवीकडेही एका टेकडीवर तीच स्थिती. दोन्हीबाजूंनी भीतिदायक ढगांचे आक्रमण. आणि रात्री साडेतीन वाजता चुकलेला रस्ता.
तशातही समोरुन एक व्हॅन आलेली दिसली. आणि आतमध्ये एक भाऊ होते त्यांना रस्ता विचारला. "हं काय हितं, म्होरल्या साळेपास्नं लेप्ट मारा". तिथे सुहासने ढगांचे काही अद्वितिय फोटो काढले आणि पुढल्या गावातून ’म्होरल्या साळेपास्नं लेप्ट’ मारला. आता सुहासने ढगांसाठी एक नामी उपमा शोधली होती. "काय किलर ढग आहेत राव, एकदम छि***..." (छि*** = बायकांची ठेवणीतली शिवी). पुढे संपूर्ण ट्रिपमध्ये हीच उपमा ढगांना वापरली गेली. पंधरा मिनिटांत शेंडीला पोचलो. तिथून साम्रदला जायचे होते, पण रात्र बरीच झाली होती. एकवेळ तिथेच थांबावे का असा विचार केला पण सकाळी लवकर ट्रेक सुरु करायचा या हेतूने साम्रदला जायचा निर्णय घेतला. धरणाच्या उजवीकडून घाटघरच्या दिशेला वळालो आणि एक बोर्ड दिसला ’कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य’. अकोले-राजूर आणि भंडारदरा म्हणजे बिबट्यांचा पट्टा. तो एकवेळ तरी दिसावा अशी खूप दिवसांपासून इच्छा आहे पण काही पूर्ण झाली नाही. अर्ध्या तासात गाडी अतिशय खराब रस्त्यावरुन चालवत देव्याने उडदावणे गावाजवळ आणली आणि उजवीकडे ढगांमधली आजोबा-अलंग-मदन-कुलंग रांग सुरेख दिसत होती. अजून साम्रद साधारण सात-आठ किलोमीटर असेल, तेही नक्की रस्ता माहीत नव्हता. म्हणून तिथेच शाळेच्या खोखो ग्राउंडवर गाडी लावली आणि ट्रेकच्या आधी थोडातरी आराम हवा म्हणून तिथेच झोपायची तयारी केली. गावात एका घरात बाळ रात्री जागे होऊन रडून आईला जागे करत होते. त्याचा आवाज थांबला, बहुतेक माऊलीने अंगाई गाऊन पुन्हा झोपवले असणार. आम्हांलाही वार्याची अंगाई ऐकून झोप लागली आणि एका कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळेपर्यंतच तांबडे फुटले. गावातली कुत्री अंथरुणाच्या जवळ येऊन हुंगू लागली तसे आम्ही पटकन उठलो आणि पथारी सावरुन, एकदोन ठिकाणी रस्ता विचारत साम्रदच्या रस्त्याला लागलो. जाताना एका बंधार्याच्या कडेला थांबलो. रांगड्या अलंग-मदन-कुलंगशी ढग उगाचच सलगी करत होते. मधूनच उगवतीचे रंग त्यात भरले जात होते.
तिथे थोडी फोटोगिरी झाली आणि आम्ही अप्पर घाटघर कॉंक्रीट धरणमार्गे साम्रदला पोचलो. गावात एक लग्न होते. मांडव पडला होता. तिथे लगीनघाई चालली होती. बाया-बापड्या चुलीशी कसरत करत होत्या. एका काकांना विचारले "सांद्णात जायचंय, कुठून आहे रस्ता?" "रस्ता सापडणार नाही, सोबत घेऊन जा कुणी, दीप्या जा रे ह्यांच्यासंगती. सांदणाच्या तोंडाशी सोडून ये" इति काका. तसा दीप्या तयार झाला. त्याला गाडीत टाकून पुढल्या वाडीवर गाडी लावली आणि एक बिगरदुधाचा चहा मारला आणि तिथल्या एका भाऊंशी गप्पा मारत मारत सांदणाकडे निघालो.
वीसेक मिनिटे चाललो असेल आणि आम्ही दाट झाडांच्या दाटीतून एका अरुंद खिंडीशी आलो. उजव्या हाताला पाणवठा होता. नैसर्गिकपणे डोंदरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केली होती. ते अमृतासमान पाणी पिऊन आतापर्यंतचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. एक तप्पा उतरुन खाली आलो आणि समोर जे काही पाहिले त्याचे वर्णन शब्दांत शक्यच नाही. अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा. मनावर दडपण येणे साहजिकच. यालाच थ्रिल म्हणत असावेत बहुतेक.
आतपर्यंत ऊन पोचणे शक्यच नव्हते, अतिशय थंडगार वातावरण. एकदोन ठिकाणी या उन्हाळ्यातही गुढगाभर पाणी. तेही एकदम थंडगार गोठवणारे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी मुखाशी गेलो आणि समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसला त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे. एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप. आणि समोर करुळ घाटाचा कडा. तिथे साधारण तासभर थांबलो. निघावेसेच वाटत नव्हते. शीतल सावली आणि सह्याद्रीच्या दोन कड्यांच्या मध्ये, एका दरीच्या काठावर एका प्रचंड पाषाणावर आम्ही बसलो होतो. कुणाला निघावेसे वाटेल? तरी परत येणे भाग होते.
साधारण अकरा वाजले असतील, साम्रदला परत आलो. खूप थकवा आला होता. त्या भाऊंच्या घरीच पिठले भाकरी करायला सांगितली होती. गरमागरम पिठले-भकरी, हाताने फोडलेला कांदा, हातसडीच्या तांदळाचा भात असा मस्त बेत झाल्यावर छानपैकी शाळेच्या हवेशीर वर्गात तासभर ताणून दिली. ऊन मी म्हनत होते. आणि प्रचंड आर्द्रतेमुळे थकवा जात नव्हता. त्यामुळे रतनगडचा बेत रद्द केला. त्यातच माझ्या डोळ्यां काहीतरी कचरा गेला, जो जवळपास तीनतास सलत होता. डोळा सुजला होता. काहीच सुचत नव्हते. तसाच गाडीत बसलो आणि अमृतेश्वर मार्गे भंडारदरा धरणाजवळ आजचा मुकाम करायचे ठरले. अमृतेश्वरला दर्शन घेऊन मंदिर पाहून निघालो आणि आठ-दहा किलोमीटर पुढे आल्यावर कॅमेरा बॅग आतमध्ये ठेवलेल्या पाकीटासह अमृतेश्वरपाशी सरबत प्यायलो तिथे राहिल्यचे लक्षात आले. हृदयाचे कित्येक ठोके चुकले. पुन्हा तिथे गेलो तर बॅग मावशींनी जपून ठेवली होती. धन्यवाद मावशी. भंडारदर्याला पोचलो तेव्हा पाच वाजले होते. धरणातून पाणी सोडणे चालू होते. तिथे थोडावेळ थांबलो आणि भिंतीकडे जायला निघालो तर अचानक आसपासच्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला. कुणीतरी डिवचले होते. पांढरे कपडे घातलेल्यांना जास्त त्रास झाला. माझ्याशेजारून चाललेल्या एका शुभ्र ’खादी’ला चावून बेजार केले मधमाशांनी. आणि मला नोटीसही नाही केले. तिथे थोडेफार फोटो काढले आणि स्पिल-वे जवळ आलो तर पुन्हा अलंग-मदन-कुलंग रांग समोर दिसली आणि त्यापलीकडे सूर्यास्त. अहाहा... काय क्षण होता.
फोटो काढून तिथेच रात्रीचा मुक्काम करण्याचे निश्चित केले. देव्याने आणि सौमीने जाऊन सरपण आणले आणि आम्ही चूल पेटवली. अंधार पडता सूप तयार झाले आणि सर्वांनी ते फूर-फूर करुन गट्टम केले. स्पिल-वेच्या लोखंडी झडपांची काही दुरुस्ती चालू होती. रखवालदाराशी थोड्या गप्पा झाल्या. नंतर नूडल्स बनवले आणि पोटभर खाऊन गप्पा मारत पडलो. थंडी खूपच वाढली होती आता. माझे नाक जवळजवळ बंद झाले होते. म्हणून मी गाडीत जाऊन झोपलो. आणि तिघे वीर बाहेर गाडीच्या आडोशाला. एखादा घटका झोप झाली असेल तेच सुहासने तीन वाजता उठवले आणि म्हणाला थोडे उंचावर आहोत आपण, जरा खाली जाऊन ढगांचे फोटो काढू. काय नसती अवदसा आठवली त्याला फोटोंची. चरफडतच उठलो आणि गाडीत बसलो. सकाळ होईपर्यंत कुठेही फोटोसाठी चांगली जागा सापडली नाही आणि दिवस उगवता आम्ही कसारा घाट ओलांडून खाली आलो होतो. तिथे चहा पिऊन आम्ही मुरबाड-कर्जत-खंडाळा-लोणावळा मार्गे पुण्यात दुपारी बाराच्या सुमारास पोचलो...अजून एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधून!!
अधिक फोटो इथे आहेत. सौमित्रच्या अल्बमवर: http://picasaweb.google.com/soumitra.inamdar/SandhanValley

वरील फोटो रात्री ३:३०वाजता काढला आहे. फोटोग्राफर: सुहास .

पोल्ट्री फार्ममध्ये हाताखाली २ अनुभवी/अननुभवी मुली/मुली (निश्चितच मुलींना प्राधान्य!), कारण आतापर्यंत शेकडो कोंबड्यांचा घास घेतलेल्या पंक्या शांत बसणार्यांमधला मुळीच नाही, म्हणून म्हणलं ह्यो धंदा मला जास्त परवडन, हाय ना! :P
ReplyDeleteबाकी, ह्या पोश्टबद्दल सांगायचेच झाले तर "मोस्ट स्थ्रिलिंग, डिट्टो थ्रिलिंग पिच्चर च्या स्टोरी टाईप"....
पंक्या दाद्या, मी जव्हा तुला फोन केला होता, तव्हा तू मग तुपल्या ह्या पोस्टच्या उत्तरार्धात (म्हंजे भंडारदराकडे व्हता, हाय ना?), तव्हा ते मव्हळ, आय मीन त्या मधमाश्यायचा पर्कार घड्डा होता की बाकी होता?
एवढेच फुटोज, फ्लिकरवर आणखी आहेत ना वाट्टं?
1 no..
ReplyDeleteVery ncely composed article with medium shutter speed. Nice (White) balance as well
ReplyDeleteटू गुड !
ReplyDeleteमित्रा कडक ट्रेक झालेला दिसतोय..बऱ्याच गोष्टी ओळखीच्या वाटल्या..आपणच गेलो होतो ना कळसुबाईला आणि हो रतनगड मारला होता एकदा संधानकडून..सुहास्चो ढगांना दिलेली "छी" उपमा आवडली..आणि हो नेहमीप्रमाणे कॅमेरा विसरला अरे किती वेळा लकी ठरणार..५ डी घ्यावा लागेल हरवला तर :-)... मजा करा रे
ReplyDeleteMastach post...aani photos tar Apratim aahet...!!!
ReplyDeleteमागे बसलेल्या दोन जणांनी दोन दिशांना हात दाखवले. नशीब गाडी चालवणारा तिसरा होता त्याच्या हातात गाडीचे हँडल होते, नाहीतर त्याने तिसरी दिशा दाखवली असती - हे आवडले आपल्याला... हाहा...
ReplyDeleteबाकी बाणसूळका - अग्निबाण - कुमशेत - साम्रद - खुट्टा - रतनगड़ हा सर्वच भाग ट्रेकसाठी लाख मोलाचा... :) एकदा मोठा प्लान बनवायला पाहिजे... ३-४ दिवसाचा... :)
Mastach !
ReplyDeleteझक्कास रे पंकज.......
ReplyDeleteआमच्या आठवणी परत जाग्या केल्यास. तिथून रतनगड आणि आजोबाचे एकदम जबरदस्त दर्शन होते.अप्रतिम असाच हा ट्रेक आहे.
'समोरुन येणार्या गाड्या अचानक बाहेर निघून ओव्हरटेक करतात.'
ReplyDelete100% kharay. Nashik road var driving mhanje tras ahe :(
Baki, post uttamach! Absolutely!
अप्रतिम
ReplyDeleteकधीतरी आम्हाला पण संधी द्या की आपल्या बरोबर भटकायची...
ReplyDeletewell written pankaj..
ReplyDeletenice article..
Ekdum mast.
ReplyDeletenice.. edkam zhakaas ahe.. .bhatkanti unlimited.. .
ReplyDeleteLaieech bhari distayet gadee rao!!!! aamchi bee layee ichha haay bagha asach kahitari karayachi.... 1k number post...very nicely organised writing...asa watata mi pan sobatach aahe tumachya sagalyanchya!!!! -- Shantanu Kulkarni
ReplyDeletelai bhari re
ReplyDelete