Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

जगावेगळी एक रात्र, अथांग नभांगणाखाली...

By Unknown
/ in अनुभव भटकंती मुळशी सह्याद्री
13 comments
च्यायला, काय हा उन्हाळा. अंगाचा चिकचिकाट नुसता. तळपता सूर्य. भाजणारे ऊन. सावली सुद्धा झळा मागेल अशी. जरा बाहेर पडायची सोय नाही. ट्रेकचे तर नावच काढू नका. असे सगळे वीर म्हणत होते. पण मग आम्ही सह्याद्रीच्या वाहिलेल्या बेफाम घोड्यांनी घरात बसायचे का?

एका बुधवारीच देव्याला पिंग केले की कुठे जायचे का? सुहास आणि सौमित्रपण तयार झाले होते. कुठे चढावे लागणार नाही या अटीवर चैतन्यपण राजी झाला. रात्री जायचे आणि चैतन्यला आधी कल्पना न देता मी आणि देव्याने पहाटे नवरा-नवरी-भटजी क्लाईंबला अटेंप्ट करायचे असे ठरले. म्हणजे सुहास आणि चैतन्य फोटो काढणार आणि आम्ही चढाई करणार असा बेत होता. त्यानुसार घरी कल्पना दिली (हे एक बरे असते, दोन दिवस आधी कल्पना दिली की जरा कमी बोलणी बसतात). शुक्रवारी रात्रीच निघायचे ठरले.

पण शुक्रवारी सकाळीच एवढे उकडत होते की आमच्या अनुभवी मनाने बरोबर ताडले की संध्याकाळी आज पाऊस होणार. आणि तसेच झाले. संध्याकाळी पुण्यात तुफान पाऊस पडला. आमचे बेत ढासळू लागले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सौमित्रला अचानक काही तरी काम निघाले. सुहासच्या डोळ्यांत काही तरी जाऊन रुतुन बसले. जवळ जवळ कॅन्सलच होणार. पण देवाजीच्या मनात वेगळेच होते. थोड्याच वेळात पाऊस थांबला. सुहास डॉक्टरकडे जाऊन ते गबाळ काढून आला. पण पावसामुळे क्लाईंब करायचा नाही अशी सक्त ताकीद मिळाली देव्याच्या घरुन. मग काय सगळे इक्विपमेंट घरीच टाकावे लागले. म्हटले चला फक्त रानवारा पिऊन येऊ. रात्री आठ वाजता गाडीत सामान टाकले. मॅगी आणि चहाचे सामान दुकानातून घेतले. आता पोटोबा बाकी होता. मग कोथरुडच्या ’गावकरी’मध्ये घुसलो. पण ऑर्डर यायला एवढा वेळ लागला की सुहास दातओठ खाऊन आता टेबलाचे लाकूड खायच्या तयारीत होता. बरीच वाट पाहिल्यावर एकदाचे जेवण आले. सुकं मटण थाळी चापली... अगदी आडवा हात मारुन!! आता तर जाऊ द्या कॅंपिंग वगैरे... मस्तपैकी ताणून देऊ अशी अवस्था झाली होती. पण वेळीच आवरली आणि गाडीत बसलो.

जाताना सुहास डॉक्टरचा मुलगा असण्याचे फायदे तोटे सांगत होता. जसे की कुठेच दवाखान्यात वाट पहावी लागत नाही. डोळे फुकट तपासून मिळतात. ऑपरेशन थिएटर मध्ये डोकावता येते. वर्षातून एकदा तरी मलेरिया फुकट मिळतो. जसे भूगावच्या पुढे गेलो तसा गाडीतला एसी बंद केला आणि गाडीत मोकळा वारा खेळू लागला. आणि व्हायचा तो परिणाम झाला. मि. सुहास देसले घोरु लागले. देव्याच्या आणि माझ्या ट्रेकच्या गप्पा रंगल्या. चैतन्य बिचारा गुमान ऐकत होता. काही समजतही होते की नाही कुणास ठाऊक. पण तो गाडी चालवत होता आणि आमच्यासाठी तेच पुरेसे होते. उल्हसित करणार्‍या वातावरणात आता गारवा आला होता. मुळशी धरणाचे पाणी अंधारातही चमकत होते. मंद वारा आणि त्याचा सुगंध रानात करवंदं पिकलीत याची जाणीव करुन देत होता. ताम्हिणी, वडवली अशी गावं मागे टाकत आम्ही लोणावळ्याच्या रस्त्याला वळून पिंप्रीच्या दरीजवळ आलो. गाडीच्या उजेडात एकदा जागा सुरक्षित आहे आणि कुठे काही कीडामुंगी नाही हे पाहून घेतले. आणि मग सामान उतरवले. मी घेतलेला नवीन मोबाईल (Samsung Marine) आज कामाला येत होती. जबरदस्त टॉर्चलाईट कामाला येत होता. चांदोबा अजून आले नव्हते. ऊबेसाठी नाही पण प्रकाशासाठी आणि कीडामुंगीसाठी शेकोटी करणे गरजेचे होते. मग सामानातून देव्याने कुर्‍हाड काढली आणि आम्ही दोघे जंगलात घुसलो. का कुणास ठाऊक आज कसलीच भीती वाटली नाही. एरवी त्या रस्त्याने दिवसाही बाईकवर जायला मी एकदा घाबरलो होतो. ते आठवून माझे मलाच हसू येत होते. एक पडलेले झाड वाळके दिसले. टॉर्च लाईटमध्ये हवी ती फांदी शोधून काही घाव टाकले तोच कुर्‍हाडीचा दांडा तुटला. काहीच उपाय नव्हता. जमा झाले तेवढे सरपण घेऊन परत आलो. आता जवळच दुसरे झाड दिसले. मग त्यावर चढूनच अथक प्रयत्न करुन वाळकी लाकडे काढली. कँप साईटवर आणून शेकोटी पेटवली. सतरंजी अंथरली आणि मग काय म्हणता... असा काही गप्पांचा फड जमला की बास रे बास.

आम्ही एकदम दरीच्या कडेवर बसलो होतो. दरीतून वर येणारा कोकणातला खारा उबदार वारा झिम्मड घालत होता. अफाट नभांगणावर तार्‍यांनी अनेकविध नक्षत्रांची देखणी रांगोळी काढली होती. मध्येच एखादी चुकार चांदणी नखरेल पोरीसारखी सगळ्या तार्‍यांना नादी लावत सर्रकन निखळून जात होती. आणि आमची इच्छा  पटकन आठवण्यासाठी तारांबळ उडत होती. (खर्‍या होतात की नाही कुणास ठाऊक!!) अशा भारलेल्या वातावरणात आम्ही चार यार आयुष्याची शिदोरी सोडून बसलो होतो. आणि मला गाणे आठवत होते "दिल चाहता है... कभी ना बीते चमकीले दिन..."


किती वाजले असतील कुणास ठाऊक. एकेक गडी गप्पांच्या ओघात कधी निद्रेच्या पाशात गुंफला गेला ते कळलेच नाही. फक्त समजली ती अंगाखाली गादी नसतानाही लागलेली शांत झोप आणि पहाटवार्‍याच्या मंद झुळकेसरशी पक्ष्यांच्या किलबिलाटात आलेली जाग. साधारण पाच-सव्वापाच वाजले होते. सगळे उठून बसले. घरी असतो तर बापजन्मात या वेळी उठलो नसतो. पथारी आवरली आणि गाडीत बसून सिक्रेट लेककडे जायला निघालो. चहाची नितांत गरज होती. सामान (बहुतेक) सगळे बरोबर होते. तीन दगडांची चूल मांडली. पातेले ठेवली आणि तलावातलेच पाण उकळायला ठेवले. सगळे सामान टाकत असताना लक्षात आले की अरेच्च्या, साखर नाही आणली. मग काय. पुन्हा चैतन्य आणि मी गाडीतून चारपाच किलोमीटर फिरून साखर घेऊन आलो. तो दुकानदार पण आमच्याकडे तुच्छतेने पाहत होता. एवढे चारचाकीतून आलेत आणि पावशेर साखर घेऊन चाललेत. एकेक टंपास फक्कड चहा मारला आणि थोडेफार फोटो काढले. तलावात एक लहान मुलगा मासे पकडत होता आणि त्याने एक चांगला दोन्ही तळहात एकत्र करुन आकार होईल एवढा मोठा खेकडाही धरला होता. आता नाष्ट्याच्या मॅगीसाठी आधण ठेवले आणि ’जी भरके’ मॅगी बनवून खाल्ले.

पुन्हा दरीजवळ आलो. आणि आमच्यातला ट्रेकर जागा झालाच. मग जमेल तिथेपर्यंत दरी उतरायचे ठरवले. सुहास पण तयार झाला. त्याला घेऊन आम्ही हळूहळू दरी उतरली. थोडे अवघड होते, पण एकमेकांच्या आधाराने निम्मी दरी पार करुन आलो.
खूप छान फोटो मिळाले. आणि थोडीशी छाती फुगुन वरही आली की या जागेवरुन आजवर फक्त आम्हीच फोटो काढलेत. पुन्हा चढून वरती आलो.

उन्हं चढली होती आणि शहरातली कामं वाट पाहत होती. मग गुमान परतीचा रस्ता धरला... बरेच काही मागे ठेवून चाललोय असे वाटत होतं, पण बरंच काही आयुष्यभरासाठी घेऊन चाललोय याचीही खात्री होती.

खेकडा फोटो सुहासने काढला आहे.

Related Posts

13 comments:

  1. विशाल तेलंग्रे14 May 2010 at 21:07

    मायला खतरनाक खेकड्या हाये... आता पोस्ट वाचतो... :P

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. अनिकेत14 May 2010 at 22:42

    लय झक्कास, मजा आली!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Maithili15 May 2010 at 21:18

    Bhaarrriii....!!!
    khekdyacha photo mast aalay.....

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. सिद्धार्थ16 May 2010 at 22:48

    मस्तच. बाकीचे फोटो कुठे आहेत?

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Sunit16 May 2010 at 23:12

    Mitra Uttam lihitos ....... keep it up :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. manjiri16 May 2010 at 23:46

    मस्त!
    अथांग नभांगणाखालील रात्र डोळ्यांसमोर सुरेख उभी राहिली.
    सावली सुद्धा झळा मागेल...; कोकणातला उबदार वारा झिम्माड घालत होता..; चुकार चांदणी सर्रकन निखळून जात होती...;
    बरेच काही मागे ठेवून चाललोय असे वाटत होतं, पण बरंच काही आयुष्यभरासाठी घेऊन चाललोय याचीही खात्री होती.... सुंदर!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. Soumitra17 May 2010 at 01:32

    "मध्येच एखादी चुकार चांदणी नखरेल पोरीसारखी सगळ्या तार्‍यांना नादी लावत सर्रकन निखळून जात होती. "

    Wah kya baat hai !!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. Binary Bandya17 May 2010 at 01:50

    mastch ..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Vikrant Deshmukh...17 May 2010 at 22:25

    "मध्येच एखादी चुकार चांदणी नखरेल पोरीसारखी सगळ्या तार्‍यांना नादी लावत सर्रकन निखळून जात होती. आणि आमची इच्छा पटकन आठवण्यासाठी तारांबळ उडत होती."

    काय लिहितोस रे तू? प्रवासवर्णन लिहावं तर तूच........ मान गये गुरू !!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. davbindu18 May 2010 at 20:50

    एकदम सॉलीड राव...आम्हालाही अनुभवायला मिळाली ती रात्र तुझ्या मस्त लेखणीतुन...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. हर्षल वैद्य19 May 2010 at 03:24

    एकदम सही आहे Boss . . . बाकीचे फोटो पण बघायला आवडतील

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Santosh24 May 2010 at 03:31

    Hello Pankaj;

    Post sahi ahech... Pan hi latest ahe mhanun ek query pan wicharato.

    Tuzhe Flickr warche photos faar pahile ahet... Shanka nahi sahich astat... I am a fan of ur photography ani ata Blog cha sudhha :)

    Mala NIkon D5000 ani Canon 550D madhe thoda confusion ahe... Pls suggest konta DSLR gheu?

    Pls reply if u can... or else mail kelas tari chalel.
    Maza ID:- kudtarkar.santosh@gmail.com

    Thanks :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. Abhishek21 January 2011 at 03:49

    Hi,
    Pankaj,

    Can i get your email id. or mobile no.
    Email me @ - abhishekzantye@gmail.com
    Regards,
    Abhishek Zantye,
    9421156155

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1