लवंगी मिरची कोल्हापूरची
By
Unknown
आता मात्र मराठी ब्लॉगस्फियर ढवळून निघाले असेल खादाडीच्या पोस्ट्सने. ढवळून नसले तरी वाचकवर्ग तर नक्कीच जळत असेल. महेंद्र, सिद्धार्थने आपल्या परीने आगीत तेल ओतले. विक्रांतनेही त्याच्या परीने घासफूसच्या आघाडीवर मोर्चा सांभाळला. तिकडे रोहनने बरेच दिवस तह केला होता खादाडीशी. आता मात्र त्याने जाहीर युद्ध पुकारले आहे. अमेरिकेतून निघायच्या आधीच रणशिंग फुंकले आहे. इथे आम्ही फक्त जेवायचे म्हटले तरी अखिल प्राणिमात्रांना धरणीकंपाचा भास होतो. मुक्या प्राण्यांच्या संघटनांनी तर आम्हांला कधीच हिटलिस्टमध्ये टाकले आहे. म्हणून मला शेळ्या-मेंढ्यांचा कळप, कोंबड्यांची खुराडी अशा गोष्टींपासून खूप भीती वाटते. काय सांगावे काही त्यांच्याकडून घातपात झाला तर? असाच प्राणिमात्रांचा कर्दनकाळ ठरणारे एक पुण्यातले हॉटेल "लवंगी मिरची". एरंडवण्यात. याचा ओझरता उल्लेख पूर्वी "खा लेकहो... खा...!!!" या पोस्टमध्ये झाला होताच. आता रोहन पुण्यात येतोय पुढच्या वीकेंडला, तेव्हा इकडेच जाणार आहोत आम्ही.
हॉटेलचे नावच मनापासून आवडले आपल्याला "लवंगी मिरची कोल्हापूरची" अस्सल आणि झणझणीत कोल्हापूर, पुण्याच्या तैनातीत !
पण जिथे प्राण्यांचा कर्दनकाळ तो आमचा स्वर्ग. तर असा हा आमचा स्वर्ग आहे एरंडवण्यात. मला हे हॉटेल आमच्या फोटोग्राफर्स@पुणेच्या सुहासने दाखवले. म्हणजे बघा, एक जण म्हात्रे पुलाच्या चौकाकडून कमिन्सच्या समोरुन निघाला आणि दुसरा त्याच वेगाने कर्वे रोडच्या मॅक-डी कडून करिष्माच्या समोरुन डावीकडे निघाला तर दोघे एकमेकांना जेथे आपटतील तिथेच जरा आजूबाजूला पहा... म्हणजे मेहेंदळे गॅरेजकडून आलात तर कॉर्पोरेशनवाल्यांना ज्या ठिकाणी रस्ता दुभाजक बनवण्याचा कंटाळा आला, आणि करिष्माकडून आलात तर जिथून त्यांना दुभाजक बांधायचा मुहुर्त लागला अशा अजब जंक्शनवर आहे आमचा स्वर्ग. गांधी लॉन्सच्या समोर (जरा डायगोनली ऑपोझिट) एक बिल्डिंग आहे. त्यातच आहे हे हॉटेल "लवंगी मिरची, कोल्हापूरची". हो हो.. हेच आणि असेच नाव आहे. बाहेरुन पाहताच क्षणी ओळख पटावी असे हे हॉटेल. पूर्वी म्हणे इथे एक घासफूस हॉटेल होते की जे बिलकुल चालत नसे (कसे चालणार म्हणा?). मग पुढे जेव्हा "खरे जेवण" (म्हणजे नॉनव्हेज) इथे मिळायला लागले तेव्हापासून तुफान गर्दी. बाहेरुन पाहिले की एक लहान (२ शटरचे) हॉटेल, जरा पद्धतशीर लायटिंग आणि थोडे बाहेर काढलेले शेड. जरा नीट पाहिले तर समोरच एक डिस्प्ले आहे जो त्या हॉटेलचे एक शटर व्यापतो. आणि त्यात पारंपारिक भांडी (हंडे) चुलीवर मांडून ठेवलीत. आत जाऊन जागेचा अंदाज घेऊन बसावे. फॅमिलीसाठी वरच्या मजल्यावर सुविधा आहे. आणि जिन्यासमोरच्या फळ्यावर आजचा स्पेशल असा एक मेनू खरडलेला असतो. जरा टेबलबर स्थिर-स्थावर झालात की बास रे बास... एकदम मटणाच्या रश्शाचा गंध मेंदूला झिणझिण्या आणतो. जरा त्या दिशेने पाहिले तर लक्षात येईल की जो समोर डिस्प्ले आहे तो फक्त
डिस्प्ले नसून खरेखुरे किचन आहे. चारपाच चुलाणांवर तांब्याचे भलेमोठे हंडे व्यवस्थित झाकून ठेवलेले असतात. आणि सगळ्या सुगंधाचे गुपित तेच असते. मटणाचा विविध प्रकारचा रस्सा त्यात रटरटत असतो. "खरा माल" इथे डिस्प्लेवर शिजवण्याची युक्ती खरंच आवडली मला. बाकी चपाती, भाकरी (रोटी मिळत नाही) असा कचरा आतल्या किचन मध्ये बनवला जातो. आता मात्र भूक खवळणारच याची खात्री.
मेनू कार्ड पाहिले तर डोळे फिरतील एवढे मटण आणि चिकनचे प्रकार. सगळ्यात आवडता प्रकार आहे "मटण लोणचे". पण ते घेतले तर सेपरेट डिश घ्यावी लागते आणि त्याबरोबर अनलिमिटेड पांढरा-तांबडा रस्सा मिळत नाही. म्हणून मग आमची ठरलेली ऑर्डर: एक घरगुती मटण थाळी आणि एक काळे मटण थाळी. म्हणजे दोघांत मिळून दोन व्हरायटीज. शिवाय वरुन एक मटण लोणचे. एका थाळीत मिळेल हव्या तेवढ्या चपात्या, अनलिमिटेड पांढरा-तांबडा रस्सा, कांदा सॅलड, आणि एक मोठा बाऊल भरुन मटण, आणि नंतर एक प्लेट स्पेशल खिमा गोळा बिर्याणी. एका टेबलवर एक मोठे भांडे भरुन पांढरा रस्सा आणि तेवढाच तांबडा रस्सा येतो. तांबडा रस्सा काही विशेष नाही, पण पांढरा रस्सा म्हणजे एकदम "च्या मारी धरुन फटाक्क" असाच आहे. मटण स्टॉकमध्ये उकळून ठेवलेले नारळाचा चव, आले, लसूण, काळी मिरी, दालचिनी मिळून जे काही रसायन बनते आणि जे पोटात गेले की डायरेक्ट किक बसते असा हा पांढरा रस्सा. आमच्या सुहासचा तर एकच नियम आहे "पंक्या, आठ वाट्या पांढरा रस्सा पिल्याशिवाय उठायचे नाही". आम्ही पण त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून बैठक मारतो. पहिली वाटी "बॉटम्स अप"... की असे काय स्वर्गसुख की विचारता सोय नाही. आमची धाव पांढरा रस्सा बॉटम्स अप करण्यापर्यंतच. बाकी कौशल्ये आम्ही नाही अजून तरी हस्तगत केलेली. अर्थात आपल्या या हॉटेलात ते मिळतही नाही. ते अमृत पोटात पोचले की मग आतून जे प्रेमाचे गरम उमाळे फुटतात त्याला आजवर तरी या विश्वात तोड नाही. थोडासा तिखट तरी हवा-हवासा स्वाद, तो कोल्हापुरी झटका, पिताना बसणारा हलकासा चटका... बास रे बास... "जगी सर्वसुखी असा तो कोण आहे?" आणि मग जेवणाला हात. त्याआधी कमरेचा बेल्ट सैल करुन आणि खुर्चीवर मांडी घालून बसतो. जेवताना पण एक विचित्र टॅक्ट सुहासने शिकवली आहे मला.
बरं सर, म्हणून मी मटण आणि चारपाच वाट्या पांढरा रस्सा संपवतो. मध्येमध्ये सुहास सुरुच.. पंक्या ती पांढऱ्या रश्शाची वाटी संपव आणि वेटर दिसला की त्याला आपला बाऊल रिफील करायला सांग. पण आता वेटरला पण माहीत झालेले असते. तोही गुमान त्याचे रिफिलिंगचे काम चालू ठेवतो. तांबडा रस्सा मात्र गार पडलेला असतो. एक चपाती संपली की खरंच मला पटलेले असते "पंक्या, दुसऱ्या चपातीच्या भानगडीत पडायचेच नाही. ह्या चपात्या खूप मोठ्या आहेत". म्हणून आम्ही मग गोळा बिर्याणी आणायला फर्मावतो. एकाला एक अशा प्लेट्समध्ये ती बिर्याणी येते. मस्त बिर्याणीचा राईस आणि वरुन तळलेला कांदा. आणि त्यात खिम्याचे चारपाच गोटीएवढे गोळे. ते कुस्करुन (छे छे... चमचा नाहीच.. चमचाने खाणे म्हणजे अगदीच गरिबी की हो...) राईसमध्ये एकजीव करायचे आणि अगदीच कोरडे वाटले तर मघाशी गार पडलेला तांबडा रस्सा त्यात टाकायचा.. अगदी नावाला. आणि पुन्हा पाण्याऐवजी पांढऱ्या रश्शाचा पेग (वाडगे) भरायचा. प्रत्येक घासाला एक घोट या नियमाने दोन वाट्या कशाही संपतात. हे एवढे जेवण केलेत की बास... स्वर्ग दोन बोटेच उरणार. तेवढा तरी कशाला उरवा... भरा आठवी वाटी... पांढऱ्या रश्शाची... आणि पोचा डायरेक्ट स्वर्गात. च्या मारी धरुन फटाक्क... चाबूक!!! जगात भारी...

पंक्या, दुसऱ्या चपातीच्या भानगडीत पडायचेच नाही. ह्या चपात्या खूप मोठ्या आहेत. नाही तर बिर्याणीची चव जाते. उगाच खायचे म्हणून खाल्ली जाते.
बरं सर, म्हणून मी मटण आणि चारपाच वाट्या पांढरा रस्सा संपवतो. मध्येमध्ये सुहास सुरुच.. पंक्या ती पांढऱ्या रश्शाची वाटी संपव आणि वेटर दिसला की त्याला आपला बाऊल रिफील करायला सांग. पण आता वेटरला पण माहीत झालेले असते. तोही गुमान त्याचे रिफिलिंगचे काम चालू ठेवतो. तांबडा रस्सा मात्र गार पडलेला असतो. एक चपाती संपली की खरंच मला पटलेले असते "पंक्या, दुसऱ्या चपातीच्या भानगडीत पडायचेच नाही. ह्या चपात्या खूप मोठ्या आहेत". म्हणून आम्ही मग गोळा बिर्याणी आणायला फर्मावतो. एकाला एक अशा प्लेट्समध्ये ती बिर्याणी येते. मस्त बिर्याणीचा राईस आणि वरुन तळलेला कांदा. आणि त्यात खिम्याचे चारपाच गोटीएवढे गोळे. ते कुस्करुन (छे छे... चमचा नाहीच.. चमचाने खाणे म्हणजे अगदीच गरिबी की हो...) राईसमध्ये एकजीव करायचे आणि अगदीच कोरडे वाटले तर मघाशी गार पडलेला तांबडा रस्सा त्यात टाकायचा.. अगदी नावाला. आणि पुन्हा पाण्याऐवजी पांढऱ्या रश्शाचा पेग (वाडगे) भरायचा. प्रत्येक घासाला एक घोट या नियमाने दोन वाट्या कशाही संपतात. हे एवढे जेवण केलेत की बास... स्वर्ग दोन बोटेच उरणार. तेवढा तरी कशाला उरवा... भरा आठवी वाटी... पांढऱ्या रश्शाची... आणि पोचा डायरेक्ट स्वर्गात. च्या मारी धरुन फटाक्क... चाबूक!!! जगात भारी...
Bhuk lagali rao vachun ,
ReplyDeleteभूक लागली यार शिवाय माझ्या ब्लॉगवर ठेवलेले खेकडेही संपलेत..
ReplyDeleteयेत्या मायदेश ट्रिपमध्ये फ़क्त इथे नवर्याला तिखट तिखट जेवण चापायला आणावं म्हणते इतकी ही पोस्ट चमचमीत आहे....आणि मग ती चपातीची टिप त्यालाही देईन म्हणते....
Chyaayla bharich....Jamal tar jaien ya Ravivari....
ReplyDeleteआता काय निषेध पण करायची ताकद संपली..किती त्या खादाडीच्या पोस्ट...दिल जलता है यार :)..मस्त पोस्ट as usual :)
ReplyDeleteBharrii.........
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteरक्त पिपासू माणसा, मुक्या प्राण्यांचे आणि साहित्यिकांचे खून करून तुला शांती लाभलेली दिसत नाही. हे असले जळजळीत आणि रसरशीत लेख लिहून आमचा जीव का घेतो आहेस?
ReplyDeleteखूप झाला निषेध, आत्ता जिहाद हा एकच उपाय आहे माझ्याजवळ.
नॉनव्हेज सोडून आणि "महाराष्ट्र कोंबडीबचाव सेने"त जाऊन मला एक महिना झाला....अशी पोस्ट टाकून तू फारच वाईट करत आहेस... समस्त "कोंबडा-बकरा" संप्रदायाकडून तुझा निषेध.. !!
ReplyDeleteसगळ्या कोंबड्या आणि बकऱ्या रिचवून झाल्या तुमच्या म्हणजे भेटू या रे आपणही ...
ReplyDeletewaoo, i think i must vist this place.
ReplyDeletePlace fixed for this weekend ..... :)
kharach wachun tondala pani sutle nahi tarach naval.ekda jaylach pahije ya thikani.
ReplyDeleteअरे, का त्रास देत आहेस. इथे भुकेनी आणि त्या तुझ्या मटणाच्या आणि रस्स्याच्या आठवणीने कसंतरीच होतय.....
ReplyDeleteजमल्यास या आठवड्यात तिकडे जातो. येणार का?
~~
ध्रुव
मस्तच रे.. अगदी लाळ टपकेपर्यंत वाचुन काढलं... आपली पुढची मिटींग तिकडंच भरवु या का?
ReplyDeleteसुहास, कधी जायचे सांग.
ReplyDeleteअपर्णा, ये पुण्यात जाऊ सगळे मराठी ब्लॉगर्स.
सागर, नक्की जा. रविवारी जरा गर्दी असेल पण.
दुसरा सुहास, निषेध नाही, साथ द्या आता.
मैथिली, धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत.
उमेश, नक्की जा. असाही तू पुण्यात फिरत नाहीस कधी.
तुषार, तुला तर जवळच आहे. म्हात्रे पूल ओलांडला की झाले.
कपिल, अशा निषेधाचे स्वागतच होईल.
गौरी, आपण नक्की भेटू. पण सगळ्या कशा संपतील. आणि संपल्या तर आमच्यासारख्या पामराने कुणाकडे पाहावे बरे?
ध्रुव, एक फोन टाक फक्त.
भुंगा, आपल्याला रोहन आला की जायचे आहेच.
पंक्या BBQ नाही आता म्हणजे मी नाव पण काढले न्हवते त्याचे..आल्यावर भेटू इथेच काय आहे त्या BBQ च्या सुक्या तुकड्यांमध्ये काय म्हणतोस
ReplyDeleteच्या आयला ह्या खादाडी पोस्ट वाचून घुसमट होते माझी आजकाल
ReplyDeleteबाकी हॉटेल च नाव बाकी एकदम झणझणीत आहे बर का
एकदा नक्कीच भेट द्यावी लागेल त्याशिवाय जे लिहिलंय त्याची खात्री पटणार नाही ;)
जीवनमूल्य
पोस्ट वाचून एकच कळलं तू जाम एंजॉय केलस तिथे...........बाकि पदार्थांची नावं आणि चव...ईल्ला!!! काय बी कळलं नाय राव...अवो आमी घासफुसवाले...एक असलचं पोस्ट व्हेजवर टाक आता म्हणजे मी निषेध करते जरा!!!!!
ReplyDelete(आणि कमेंटला उत्तर ’सहजच’ नावाने देणार असशील तर गौरीच्या लटेस्ट पोस्टवरचे कमेंट्स वाच आधी!!!)
वैभव, BBQ आणि पांढरा रस्सा आपापल्या जागी. तुझी पार्टी BBQ Nation लाच करु. उगाच तुला inferiority complex नको.
ReplyDeleteविक्रम, पुण्यात आलास की नक्की भेट दे.
तन्वी, ती कमेंट अगदी सहजच लिहिली मी :-)
आणि "बाकि पदार्थांची नावं आणि चव...ईल्ला!!!" म्हणजे "खरा माल" अजून खाल्लाच नाही तू... जगातल्या एका असीम आनंदाला मुकलात तुम्ही. पण बरंय त्यांच्या किमती मर्यादेत राहतात त्यामुळे. तुम्ही आहात तसेच राहा रे "घासफूस".

की नाही आमच्या कोल्हापूरचा झणका!! पुण्यात राहूनही माझा लेक कोल्हापूरच्या जेवणाचा हा आनंद पुण्यात असला की घेतोच. माझे घर तिथून दहा मिनिटात येते त्यामुळे ओपनिंग झाल्या झाल्या इथून खाणे झालेच. पुण्यात मुंबईचे नॅचरल आईसक्रीम पण आता मिळते, तिथेही जाऊन ये मस्तच असते अजून एक झकास पोस्ट होईल व जेवण पूर्ण झाल्यासारखे होईल.
ReplyDeleteप्रतिक्रियेतील पहिला 'आहे' हा शब्द कोल्हापूरच्या आठवणीने गायब झाला वाटत. खरे कोल्हापुरी तांबडा रस्सा पण बरोबरीने घेतात. पांढरा रस्सा तर छानच असतो पण तांबडा रस्सा पचवण्याची रग
ReplyDeleteकोल्हापूरच्या आखाड्यात आहे अजूनही बर का. आणि हो कोल्हापूरला जमले तर 'ओपल' ला जा खासच असते. मी मात्र शाकाहारी गटातील असून कोल्हापूरच्या खवय्ये कुटुंबात मटण, चिकन बरोबर स्वयंपाक करते. कोल्हापूरच्या माझ्या सासर ला शाकाहारी बना हे सांगणे गैर आहे. कोल्हापूरला जाण्याआधी मला मेल करून जा खास खाण्याची ठिकाणे सांगेन.
अनुजा ताई,
ReplyDelete"कोल्हापूरच्या माझ्या सासर ला शाकाहारी बना हे सांगणे गैर आहे." नव्हे पाप आहे :-)
काल आठवड्याच्या मध्येच बुधवारी, पुन्हा एकदा पांढरा रश्शाची आचमनं घडली. आणि नंतर नॅचरल्सचे टेंडर कोकोनट. मजा आली.
जो तो खादाडीच्याच पोस्ट टाकतोय. बरं लिहिलं तरी इतकं सविस्तऽर लिहायची काही गरज आहे. पदार्थांची नावं ऐकून हृदयात कालवाकालव होते रे. पांढरा रस्सा कधी चाखला नाही (तिखट असणार असा माझा अंदाज आहे) पण पंक्या, एवढं डिटेल लिहिल्यावर तो खाल्यासारखा वाटला रे. नाकाने आपोआप सूं सूं आवाज करायला सुरूवात केली. निषेध आहे तुम्हा सगळ्या लोकांचा.
ReplyDeleteछान लिहिल आहेस. As usual :)
ReplyDeleteतिखट खाउन जाळ-धुर सगळ एकत्रच निघाला होता का?
कांचन, मला माहितीये की ही पोस्ट खूप दिवस फक्त निषेध म्हणून वाचायची टाळली आहे तू. पण आज राहवले नाही ना? पांढरा रस्सा तिखट नसतो. छान गरम लवंग, दालचिनी, खोबरे, विलायची आणि काळीमिरी एवढाच मसाला. नो मिरची. लहान मुले पण पिऊ शकतात. एकदम भुर्रर्रर्र....... हा...!!! मस्त आहे. परत तोंडाला पाणी सुटले ना?
ReplyDeleteलई भारी मित्रा,
ReplyDeleteपरत कधी जायचं "लवंगी मिरची" चाखायला?
चामारी फट्टाक.. मस्तच... मी पुण्याला आलो की नक्की गेलोच म्हणुन समझं.. तुला तस पाचारण करीनच..
ReplyDeleteकी-बोर्ड ओला झालाय, पुढच्या वेळी नक्की की-बोर्ड प्लास्टिक कवर मधे टाकून मग type करीन!
ReplyDelete