Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा...

By Unknown
/ in Blog childhood kids बालपण
13 comments
आपले वय काय हो? असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते? मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे... काही तरीच काय? पण माझे ऐका, आता मान्य कराच हे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे अगदी ख्खरं आहे. तेच लहान मूल ज्याला कधी कधी फार खोड्या कराव्याशा वाटतात.

कित्येकदा मला असे वाटलंय की एकदा तरी खूप जोरात ओरडून आरोळ्या ठोकाव्यात. उगाचच... काही कारण नसताना. का कुणास ठाऊक, पण वाटते. ट्रेकला गेलो की ही हौस मी भागवून घेतो. मला आठवतंय की ’कळसूबाईच्या नादखुळा ट्रेक’मध्ये शिखरावर पोचल्यावर मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे जोरजोरात बोंब ठोकली अगदी इंग्लिशमध्ये scream म्हणतात तसे. शिवाय उगाचच इकडे तिकडे सैरावैरा धावून घेतले. आहे ना गंमत?

कधी आपल्याला वाटतेच ना रस्त्यात उगाचच एखाद्या गाडीला ’कट’ मारावा. अचानक कुणी मधे आले आणि मूड चांगला असला की आपण ओ काकू, ए मावशे जरा समोर पाहा, अप्पा जरा हळू असे खोडकर शब्द वापरतो. चौकातल्या पोलीसमामाची ढेरी फारच गरगरीत दिसते आणि त्यावर हळूच हात फिरवावासा वाटतो. कुणी तंबाखू चोळत उभा असला तर खालून हाताला धक्का मारावासा वाटतो.

अजूनही किती तरी वेळा आपण कुणी बसायच्या आधी त्याची खुर्ची हळूच ओढून बाजूला करतो. खूप दिवसांनी कुणाला भेटून सरप्राईज द्यायचे असेल तर मागून जाऊन त्याचे/तिचे डोळे गच्च झाकतो अथवा "भॉ" करतो. कुणाला खाली बसताना पाहिले की च्युइंगम ठेवावेसे वाटते ना तुम्हांला.

कॉलेजला असताना खूप वेळा बसमध्ये सीटच्या मधून खाली येणाऱ्या मुलींच्या ओढणीने आम्ही आमचे बूट पुसण्याचे उद्योग करायचो. किंवा शेजारी उभा असलेला माणूस तिकडे तोंड करुन उभा असेल तर हळूच त्याच्या शर्टच्या कापडाची क्वालिटी पाहून घ्यायचो.

कधी मनात आले की आपण उगाच हॉटेलमध्ये टिश्यू पेपरचे विमान, होडी असले काही बाही बनवतो आणि मग वेटर आपल्याकडे ’जरा हाललंय’ अशा नजरेने पाहतो. कितीही गंभीर सिनेमा असला तरी मला अजूनही पॉपकॉर्नची पिशवी फोडल्याशिवाय पैसे वसूल झाल्यासारखे वाटतच नाही. चित्रपट संपल्यावर कॉरिडॉरमधून बाहेर पडताना लोक इतके गप्प गप्प का असतात हे तर मला अजूनही कोडे उलगडले नाही. अशा वेळी मला ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी काडी लावून खो-खो हसावेसे वाटते. बागेत गेले की कधी उगाचच झोक्यावर बसावेसे वाटते किंबहुना अशा लोकांसाठीच ’खेळणी फक्त लहान मुलांसाठी आहेत’ असे फलक लावलेले असावेत. मग आपण हिरवळीवर लोळून हौस पूर्ण करुन घेतो. बागेतला फुगेवाला फुगा फुगवत असताना त्याला गुपचुप टाचणी मारावीशी वाटते.

मानवाला सततच्या आपल्या या बालसवयींची काळजी खूप प्राचीन काळापासून पडली असावी. म्हणूनच आपल्या लग्नात नवऱ्या मुलाचे कान पिळणे, बूट पळवणे, हळद खेळणे, वरमाईच्या डोक्यावर कुरड्या फोडणे  असे प्रकार शास्त्रसंमत आहेत. वाजंत्री पथकातल्या पिपाणीवाल्यासमोर चिंचेचे बोटूक चोखायचे तर माझे कितीतरी दिवसांपासूनचे स्वप्न आहे. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सो कॉल्ड पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या गेममध्ये पण थोडा का होईना बालिशपणाचा अंश असतो. अगदी उच्च सुपरब्रॅंडच्या जाहिराती सुद्धा कित्येकदा या बालिशपणाभोवतीच घुटमळत असतात. किंबहुना अशाच जाहिराती खूप दिवस लक्षात राहतात. विश्वास नसेल तर ती ’धारा’ची "जलेबी...?" जाहिरात आठवा. टेलिव्हिजन क्षेत्राने तर आपली ही मेख केव्हाच ओळखली आहे, म्हणून तर आजकाल कित्येक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी लहान मुलांवर टाकली आहे.

लहान मुलांमध्येच आपला जीव रमतो ना अजूनही? जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन खेळतोच ना? (मी तरी खेळतो, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या शेजारच्या लहान मुलाला मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारतो, पप्पू काका, टिफीन घेतला का? बॉटल भरुन घेतली का?") मला सांगा कितीही आपण मोठे झालो तरी आपली टॉम अँड जेरी पाहायची सवय जाईल का? चॅनल सर्फ करताना कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना? किती तरी वेळा कुणाशी तरी मिस कॉलचा खेळ खेळत बसतो तोही या पोरकटपणापायीच. मी तर आजवर अशा अगणित खोड्या केल्या आहेत, अजूनही करत आहे आणि पुढेही करत राहणार यात तिळमात्र शंका नाही.

आपण करता का हो अशा खोड्या? आणि करत असाल तर काय करता ते लिहा की...

अजून काही आहे तुमच्यासाठी:
काही भन्नाट संवाद
भटकंती-२००९: मागे वळून पाहताना
खा, लेकहो खा!!!
मी खाल्लेल्या पाणीपुरीची गोष्ट

Related Posts

13 comments:

  1. Anand11 January 2010 at 10:52

    खरंय, अंगातलं बालपण जाणं अशक्य, आणि जाउही नये.
    भावाच्या मुलीसोबत तर तासन तास खेळु शकतो...
    नविन फोन वरुन दुसर्याचा आवाज काढुन आताही बहीणीला सतावत असतो ... खुप मज्जा येते :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. रोहन चौधरी ...11 January 2010 at 11:25

    पंकज... सणसणीत ... दणदणीत ... खणखणीत ...
    मज्जा आली वाचताना. मी सुद्धा एकदम लहानपणीच्या त्या सर्व छोट्या-मोठ्या आठवणीमध्ये पोचलो. काय एक एक लिहिले आहेस रे ... मस्तच... जिंकलास मित्रा... मी अजून सुद्धा लहानच आहे... आणि लहानच राहीन...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. भानस11 January 2010 at 13:47

    पंकज सहीच लिहिलेस. खरे आहे प्रत्येकात लहान मूल दडलेले असतेच. आरशात पाहून उगाचच जीभ काढून वेडावेसे वाटते. तर कधी उगाच ओरडावेसे वाटतेच. लहान मूलांबरोबर मी नेहमीच पकडापकडी, लंगडी, लपाछपीसारखे खेळ खेळून घेते. त्यांचा खळखळता उत्साह, निर्मळ हसू पाहिले की फार आनंद होतो व किंचितसे बालपण पुन्हा अनुभवल्याचाही लाभ.:) लेख आवडला.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. भुंगा11 January 2010 at 20:19

    काय लिहलयंस राव... माझ्या भाषेत सॉलिडच.. आणि रोहनच्या भाषेत - चाबुक पोस्ट!

    कालचीच गंमत सांगतो - छोकरीबरोबर ते सीबेबीज चॅनलवर - टेलिटबीस बघत होतो.. माझी छोकरी त्या "चौकडीची" सॉलिड फॅन आहे!
    त्यातील ते चौघे कसे नाचतात हे तिला करुन दाखवत होतो... तिच्याबरोबर मीही बर्‍याच दिवसांनी खळखळुन हसलो!

    तुझी पोस्ट वाचुन लहानपणीच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.... आजचा दिवस फ्रेश सुरु झालाय... अनेक धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Ajay Patil11 January 2010 at 20:27

    सही लिहिले आहेस

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. GanesH11 January 2010 at 20:42

    Mast aahe re post..
    parat eakda lahana zalya sarkhe vatat aahe

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. kayvatelte11 January 2010 at 21:00

    सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येकामधेच एक लहान मुल दडलेलं असतं.. कितीहा झालं तरी ते आपलं डोकं वर काढतंच.. अधुन मधुन!!!
    सही एकदम!!! ट्च्ड..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. विक्रम एक शांत वादळ11 January 2010 at 21:24

    एकदम झाक पोस्ट :)
    आपल्यातलं लहानमूल कितीही लपवावं म्हंटलतरी लपवू शकत नाही
    मीही अशा काही खोड्या करत असतो कि मित्र म्हणतात 'बास की आता बालीशपणा'
    पण काही का असेना मज्जा येते राव लहानमुलांसारखे थोडेसे वागायला.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. Vaibhav11 January 2010 at 21:30

    मस्तच मी पण अश्या वाकुल्या करत असतो..लिफ्ट मध्ये एकटे असताना आरश्यात बघून तोंड वेडे वाकडे करणे, गाडीवर असताना कोणी मुलगी आडवी आली तर मावशी. आक्का म्हणायचे...रिक्षावाल्याला शेंबड्या म्हणायचे असे प्रकार चालूच असतात..मजा आली रे हे सगळे वाचताना दिवसाची सुरवात चांगली झाली

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. prachi12 January 2010 at 03:30

    Mast re pankaj ekdamch bhari
    Tu lihitos chanch
    phar phar bhari ye

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. विक्रम12 January 2010 at 08:59

    मी पण अश्या चेष्टा करतो, रस्त्यावरून जाताना कुत्रा असेल तर त्याला घाबरवणे, एखाद्या शांत वेळी हॉल्/थिअटर मध्ये विचित्र आवाज काढणे... असे बरेच काही..

    तुमच्याकडून अजून चांगल्या कल्पना मिळाल्या...

    :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. सिद्धार्थ12 January 2010 at 10:21

    पंकज, एकदम मस्त रे. लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलो. मी काय काय करायचो ते सगळं आठवून पाहिलं एकदा. आत्ता बाइक सोडून, टापटीप फॉर्मल कपड्याबरोबरच 'अकाली' आलेला समजूतदारपणा उतरवून पुन्हा एकदा आंबे खाऊन झाल्यावर ज्याला हात पुसले तीच बनियन अंगात घालून साइकलचा टायर काठीने ढकलतं गावात पुन्हा हूंदडावेसे वाटते आहे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. Prakash Ghatpande16 January 2010 at 23:46

    वा वा प्रत्येक प्रौढ व्यक्तीत एक लहान मुल दडलेल असतय. मनातल बोल्ला ब्वॊ!

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1