Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

"हॉट & स्टायलिश"

By Unknown
/ in Blog denim जीन्स
15 comments
प्रत्येकजण हिला अगदी कितीही दिवस (कधी घट्ट, कधी थोडी सैलसर तर कधी अगदीच अघळपघळ) कवटाळून असतो. जन्माची सखी असल्यासारखी. ज्या कुणी हिला जन्म दिलाय त्याचा समस्त तरुणवर्ग  शतजन्माचा ऋणी राहील.
इटलीच्या जेनो गावच्या खलाशांपासून सुरु झालेला हिचा प्रवास पुढे गुलाम खाणकामगारांना दिलेले कपडे लवकर फाटतात म्हणून मालकांनी मोठ्या प्रमाणात हिला वापरायला सुरुवात केली. त्यात हवे तसे बदल लिओब स्ट्रॉस नावाच्या व्यक्तीने करुन दिले (त्यानेच नंतर लेव्ही असे नाव बदलले). पुढील काळात काऊबॉयजनी आणि प्रस्थापितांविरोधी चळवळीने या हिला (टिकाऊ आणि स्वस्त असल्यामुळे) लोकप्रिय केले. मग तिचा मूळचा रंग जाऊन अधिक रंग आले. आणि ती ’गरीबांची’ हे लेबल सोडून एक फॅशन स्टेटमेंट झाली. आणि मग तो एक ब्रॅंड बनला. ती म्हणजेच जीन्स.
(फोटो सौजन्य: रोहित)
काय गुण नाहीत तिच्यात? किलर लूक्स देते, गबाळापण देते, हॉट दिसते, टिकाऊ आहे, धुण्याची आणि इस्त्रीची कटकट नाही. अगदी लहान असल्यापासून डेनिमचे आकर्षण असते. जीन्सच्या चड्डीपासून लहान मुलांच्या जॅकेट्स आणि शूजपर्यंत सारे काही आजकाल मिळते. आणि बच्चे कंपनीलाही ते आवडते. शेवटी त्यांनापण स्टायलिश रहायचे आहेच ना... शाळेत मित्रांवर इंप्रेशन मारायचे आहे. थोडे मोठे झालात आणि हायस्कूलमध्ये जायला लागले की (शिंगं फुटायची वेळ) ’ख्वाबों की मलिका’ वगैरेंचे अर्थ कळायला लागतात (निदान मला तरी कळायला लागले, कार्टं आगाऊ आहेच). मग रविवारी होणाऱ्या एक्स्ट्रा पिरिएडला (रोज शाळेत तास होतात, पण रविवार म्हटला की ’एक्स्ट्रा पिरिएड’च) आम्ही असलेली एकुलती जीन्स कोंबून जायचो. मराठी शाळा असल्यामुळे मुली फार कमी जीन्स घालत (हाय रे दुर्दैवा). घातलीच कुणीतर तर ती मोठ्या भावाची जुनी वगैरे असेल अशा कमेंट्स आम्ही मारायचो. ती एकच जीन्स प्रत्येक रविवारी आवडायची. शाळेच्या सहलीला पण घरच्यांनी इतर कपडे काढून दिले तरी जीन्सच. आणि मग उगाचच स्टायलिश हाताची घडी घालून मान तिरपी करुन सरांकडून फोटो काढून घ्यायचा (नंतर १२/- रु. ला एक कॉपी असा धंदा पण व्हायचा त्यांचा. ग्रुप फोटो म्हणजे एकदम साठेक रुपये कमाई).

ज्यु्निअर कॉलेजला तर नादच लागला होता जीन्सचा. दुसऱ्या मुलाच्या जीन्सचा कलर आपल्याकडे का नाही असे कधी कधी फील व्हायचे. मग कधी तरी वाडिया कॉलेजचे लेक्चर बुडवून फॅशन स्ट्रीटला सायकल मारत जायचो आणि उगाचच जीन्सला मॅचिंग टीशर्ट हुडकायचो. घ्यायची हिंमत नाही झाली पण कधी. पुढे कॉलेजला आल्यावर बरोबरीचे बरेचसे होस्टेलाईट्स आणि मी लोकलाईट. त्यांच्या तोंडून जीन्स-माहात्म्य ऐकायला मिळे. एका सेमिस्टरला दोन जीन्स असा हिशेब असायचा. तीच आलटून पालटून घालायची. पाणी लावून धुतली तर जीन्स बाटते असा समज. म्हणजे सेमिस्टरच्या सुरुवातीला घेतलेली जीन्स शेवटापर्यंत वापरायची आणि टर्म एंडला घरी जाऊन ती टाकून द्यायची. परत एक जोडी आहेच नवीन.

खरेतर जाडेभरडे निळे (किंवा अन्य) कापड, सहसा पिवळी शिलाई, मागे कसलातरी लेदर किंवा तत्सम पॅच, ठोकलेली रिवेट्स असा विचित्र अवतार. पण खरेच या जीन्सने आम्हांला किती तरी आधार दिला असेल. किती तरी पोरी जीन्सच्या लूकवर फिदा झाल्या असतील (?). जेवढी जास्त मळकी तेवढी उठून दिसते. धुवायची गरज नाही. एखादे वेळी उदार मनाने धुतलीच तरी इस्त्रीची गरज नाही. गादीखाली एक रात्र अंथरुन ठेवली की दुसऱ्या दिवशी घालायला तयार. कितीही रंग गेला तरी छानच दिसणार. कुठे फाटली तरी पॅच मारला की अजून स्टाईल.विटलेली जीन्स अजून भारी दिसते. त्यावर बॉलपेनाने काहीतरी जहाजाचा नांगर, समुराई तलवार, विंचू असली चित्रं काढली की अजून फॅशनेबल (आता यांचे इथे काय काम असे खवचटसारखे विचारु नका). महिलावर्ग पण आजकाल बरीच काही कलाकुसर करतात म्हणे तिच्यावर. एम्ब्रॉयडरी, कुंदन वर्क, भरतकाम, रंगकाम असलं काय काय असतं. त्या ’कांटा लगा’ गाण्यामधली ’कलाकुसरी’ची जीन्स तर कुणी तरी विसरेल का? प्रकार तरी किती नानाविध: रंगउडी (फेडेड), ठिगळी (पॅच्ड), दगडधुलाई, माकडधुलाई (स्टोनवॉश आणि मंकीवॉश), फाटकी (श्रेडेड) असे तर कापडाचेच प्रकार आहेत. पॅटर्नमध्ये पण विविधता: लूज फिट, कम्फर्ट फिट, स्ट्रेट फिट, स्किन फिट, लो वेस्ट (प्रदर्शक आणि दिशादर्शक), बॅगी, बेलबॉटम, बूटकट, एक्स्ट्रा लूज (खिशात एक नाणे टाकलेत तर पॅंट खाली गळून पडेल). वापरुन वापरुन फाटली तर चित्रविचित्र ठिगळ लावा. रंग उडाला तरी छान दिसेल (अगदीच हवा असेल तर डाय करुन पण मिळते). खालून विरली तर धागे निघालेली रस्ता झाडत चालली तरी कुणी नावे न ठेवता कौतुकानेच पाहील. अगदीच वाईट अवस्था झाली तरी बाह्या कापून फॅशनेबल हाफ पॅंट होईल.

आजकाल तर वयाच्या सगळ्या सीमा पार करुन जीन्स जेष्ठांमध्येही लोकप्रिय झाली. ऑफिसला कालपरवापर्यंत काळी किंवा फार तर ग्रे पॅंट घालणारे काका (आणि काही आजोबा पण) आता जीन्समध्ये दिसू लागलेत. आणि काका, या वयातही तुम्ही किती हँडसम दिसता हो अशी कमेंट पण वसूल करतात. काही नाही तर किमान रविवारची टेकडीवरची चक्कर तरी जीन्समध्येच असते.

खरेच त्या खाणकामगारांना वाटले असेल का हे ताडपत्रीसारख्या कापडाचा हा असला प्रकार भविष्यात एवढा हिट होईल?

Related Posts

15 comments:

  1. रोहन चौधरी ...21 January 2010 at 11:20

    नंतर १२/- रु. ला एक कॉपी - ग्रुप फोटो म्हणजे एकदम साठेक रुपये -- स्वस्त हाय की राव.. आमच्याकडे रेट हाय होता .. हाहा.

    रंगउडी (फेडेड), ठिगळी (पॅच्ड), दगडधुलाई, माकडधुलाई (स्टोनवॉश आणि मंकीवॉश), फाटकी (श्रेडेड) - वा..वा.. काय नामावली आहे.. :D

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. हेरंब21 January 2010 at 11:46

    "पाणी लावून धुतली तर जीन्स बाटते असा समज" .. हा हा हा.. हा समज नाही तर हे एक वैश्विक सत्य आहे. :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Gouri21 January 2010 at 19:22

    हा हा

    होस्टेलमधला जीन्सचा वापर हे ही एक वैश्विक सत्य आहे :)

    माझी रॅंग्लरची पहिली जीन्स १५ वर्षं झाली अजूनही जिवंत आहे ... घेतांना थोडी हलकी निळी होती, आता जवळजवळ पांढरी :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. सिद्धार्थ21 January 2010 at 19:57

    जीन्सच्या इतिहासाकडे पाहिले तर आपण सारे खलाशी आणि खाणकामगारांच्या कुळातले आहोत हे सिद्ध होते.

    गेल्या महिन्यातलीच गोष्ट आहे, मी माझ्या जीन्सला भोक पडलं म्हणून ठिगळ लावून आणलं तर घरच्यांना "जागतिक मंदि" आपल्या घरापर्यंत पोहोचल्यासारखे वाटले.

    बाकी जीन्सवर पोस्ट लिहून तू जीन्सने मानव जातीवर केलेल्या अनंत उपकारांची थोडी फार का होईना परतफेड केली आहेस ह्याबद्दल तुझे आभार.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Mahendra21 January 2010 at 20:37

    गेले ते दिवस.. आता फक्त निळी स्ट्रेच जिन्स (पोटावर आपोआप ऍडजेस्ट होते म्हणुन) चालते मला.. :)
    एक लेख वाचला होता, जिन्सवर बुलेट फायर करुन मग बुलेट फायर्ड जिन्स ची पण पध्दत आली होती मध्यंतरी..

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. भुंगा21 January 2010 at 21:12

    खरंच हॉट अन् स्टायलिश.. मी आत्ता पर्यंत बुटकट, सिगरेट/ स्ट्रेट फिटींग वापरल्यात.. हां कधी मंकी वॉश वापरली नाही...

    लो वेस्ट वगैरे काहीतरीच वाटतात.. मला तरी... उगाचच.. ^-^ च्या खाली... कुणी चेष्टा म्हणुन खाली ओढली तर बट्ट्याबोळ व्हायचा ;)

    खरं वाटायचं नाही पण २००१ मध्ये घेतलेल्या २ जीन्स अजुनही माझ्याकडे आहेत! अजुनही बसतात.... टाकुन/ दुसर्‍याला द्यायचं मनच होत नाही!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  7. विशाल तेलंग्रे21 January 2010 at 21:47

    मी तर १२वीची परीक्षा होईपर्यंत पूर्वी कधिच जिन्स घातली नव्हती भो... मला वाटायचं की सगळे हसतील मला! पण २००८ मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला पहिल्यांदा ब्ल्यू जिन्स घातली होती, कारण तसा स्ट्रिक्ट नियम आहे आमच्या कॉलेजला.. तेव्हापासून मी अजुनही जिन्सच वापरतो.. दुसऱ्‍या चड्ड्या तर नाहीच माझ्याकडं...! :-D

    - विशल्या!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  8. कांचन कराई21 January 2010 at 22:20

    जीन्स म्हणजे एक सर्वगुणसंपन्न कपडा आहे. हेरंबशी सहमत. जीन्स किमान वर्षभर धुवू नये. धुतली नाही तरी चालते. आमच्या कॉलेजला पूर्वी निळी जीन्स पॅन्ट आणि सफेद शर्ट असा युनिफॉर्म होता. मी कॉलेजला गेले तोपर्यंत तो युनिफॉर्म जाऊन त्या जागी हिरवा सलवार कमीझ आला होता. तेव्हा कॉलेजात जाताना जीन्स घालायला मिळणार नाही, याचं खूप वाईट वाटलं होतं.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  9. विक्रम एक शांत वादळ22 January 2010 at 00:26

    मी सध्या सलग ८-१० दिवस एकाच जीन्स वापरात आहे आणि त्यामुळे ती अजूनच 'फील' देत आहे.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  10. काय वाट्टेल ते !22 January 2010 at 07:12

    इटलीच्या जेनो गावच्या खलाशांचा, खाणकामगारांच्या मालकांचा, काऊबॉयजचा आणि तुझा मी शतः आभारी आहे. :P

    ReplyDelete
    Replies
      Reply
  11. Vaibhav23 January 2010 at 01:31

    लई भारी..तुझे जीन्स पुराण छान आहे रे...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  12. Pritam24 January 2010 at 01:11

    भटकंती सोडून वेगळा विषय.. :) पण छान जमलीये पोस्ट... आवडली.
    बाकी जीन्स बद्दल काय सांगावे, तू सगळेच पॉइण्ट्स कवर केलेत.. सेल लागलाय म्हणे बर्‍याच मॉल्स वर.. चक्कर मारायला पाहिजे...

    ReplyDelete
    Replies
      Reply
  13. अपर्णा25 January 2010 at 22:35

    रंगउडी, ठिगळी, दगडधुलाई, माकडधुलाई, फाटकी
    एकदम जबरा मराठी बाणा दिसतोय....:) पोस्ट वाचून माझी पहिली जीन्स मुंबैतल्या फ़ॅशन स्ट्रीटवर घेतली होती ते दिवस आठवले...खरं तर होती छान पण आता अगदी कॉलेजमधल्या जीन्समध्ये मावणार नाही मी आईने दिली बहुतेक कुणाला तरी....:(

    ReplyDelete
    Replies
      Reply
  14. Yogesh29 January 2010 at 04:35

    mast... :-)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  15. सुजित बालवडकर26 May 2014 at 20:53

    जेवढी जास्त मळकी तेवढी उठून दिसते.
    मी तर एका वर्षात फार फार तर दोनदा धुतो. :D

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1