आपले ’हवाई’ पाहुणे: फ्लेमिंगो आणि बार हेडेड गीज
पावसाळ्यातले सह्याद्रीचे हिरवेगार रुप पाहून झाले आणि पावसाळा संपला की आम्हा सो कॉल्ड फोटोग्राफर्सचे डोळे आकाशात फिरु लागतात. पक्षी शोधत. मग कवडी-पाट, सिंहगड व्हॅली अशा चकरा चालू होतात. नोव्हेंबर सरता-सरता कधी तरी पेपरात बातमी येते "ते आले". ते म्हणजे फ्लेमिंगो आणि इतर परदेशी पक्षी जे आपणाकडे या हंगामात पाहुणे म्हणून येतात. आम्ही पण त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांना सामोरे जाण्याचे बेत ठरवतो. एखाद्या शनिवारच्या भल्या पहाटे चार वाजता उठून फ्लेमिंगोचे महाराष्ट्रातल्या वास्तव्यापैकी एक उजनी धरणाचे बॅकवॉटर गाठतो. १००किमी नंतर भिगवणहून डावीकडे वळाले की जलाशयाच्या मधून जाणारा एक जुना रेल्वे पूल लागतो जो आता हलक्या वाहनांसाठी केला आहे. त्या अरुंद रस्त्याने गेलात की एक बोटीत बसायचे आणि बोटवाल्याला सांगायचे "ते मोठे पक्षी". किंवा मग मारुती काकांसारखे स्थानिक रहिवासी. मग ते हळूच त्याच्या माहितीच्या जागी घेऊन जातात. सकाळी लवकर पोचलात तर फ्लेमिंगो झोपेतच सापडतील. पाण्यातच उभ्या-उभ्या पाठीवरच्या पिसांत मान खुपसून झोपलेले असतात. आणि झोपेमुळे अधिक जवळ जाता येते. पहिल्या दर्शनातच "याचसाठी केला होता अट्टाहास" याची प्रचिती येईल. काय ते राजबिंडे रुपडे. बांबूच्या कामट्यांसारखे उंच पाय, पांढरे शरीर, थोडी काळी-राखाडी नक्षी आणि पंखांवर गुलाबी वेलबुट्टी. पाहता क्षणी प्रेमात पडावे असे हे रुप.
हे रुप डोळ्यांत (आणि कॅमेऱ्यात) साठवून घरी येतो तोच पुडःअल्या आठवड्यात "बार हेडेड गीज" आल्याची खबर लागते. पुन्हा एकदा वीर धरणाची वाट चालू लागतो. सुरुवातीला तर काहीच दिसले नाही. पण ग्रामस्थांकडे चौकशी केल्यावर ठावठिकाणा कळला. गाडी लावून एक किलोमीटर चिखल तुडवत गेलो आणि दूरवर कुठे तरी एक थवा दिसला. पण जवळ जाईपर्यंत तो उडून आमच्यामागे असलेल्या शेतांमध्ये जाऊन बसला. पुन्हा चिखल तुडवत त्या शेतांमध्ये पोचलो. विहीर, एक शेताचा उंच बांध आणि मक्याची शेती यांच्या आडोशाने आम्ही खूप जवळ पोचलो. आणि झक्कास फोटो मिळाले.
अजून ते कृष्णक्रौंच (कांडे करकोचे / दमायजल क्रेन्स) दिसले नाहीत. त्यांच्या शोधार्थ पुन्हा वीरला चक्कर मारावी लागणार आहे.
पण, चला आणखी एक वीकेंड सत्कारणी लागला. आता तयारी पुढच्या वीकेंडसाठी. कुठाय गुगल?

आयला, कसले आले आहेत अरे फोटो, झक्कासच
ReplyDeleteजळवं लेका जळव. मी आता एक चंदा गोळा करायला लागणार आहे, एका गरीब, होतकरू फोटोग्राफरला DSLR घेण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.
कृपया आपले धनादेश ह्या ह्या पत्यावर पाठवावेत :-)
हो रे ... शिवडी, मुंबईला जायला हवे आता आलो की... आले असतील फ्लेमिंगो तिकडे आता.
ReplyDeleteतिसरा फोटो 'चाबुक' आणि शेवटचा फोटो अजून थोड़ा डावीकडून हवा होता का रे?
RAPCHIK aalet re photo
ReplyDeleteखुप जबरद्स्त आले आहेत फोटो..अप्रतिम..
ReplyDeleteमस्तच रे
ReplyDeleteखरंच लय झकास फोटोहेत.... तूम्ही लोकांनी घेतलेल्या मेहनतीचे काही तरी चीज झाले म्हणायचे... नाहीतर आमच्यासारख्यांच्या समोरून असे थवेच्या थवे उडून जातात पण आम्हाला पत्ता लागत नाही. अन फोटॊ काढायचे म्हणले तरी २ मेगा-पिक्सेलच्या लेन्सने कसे निघतील हाय-रिझोल्युशन फोटॊज....!!! बाय दि वे, खुपच अप्रतिम फोटॊगिरी...
ReplyDelete- विशल्या!
काय राव कसले जबरी , झक्कास फोटो काढलेत ! नोकरी - बिकरी सांभाळून कसा काय वेळ मिळतो -इतकं काय -काय करायला ?
ReplyDeleteजबरद्स्त आले आहेत फोटो...:)
ReplyDelete