Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

सुरक्षित ट्रेक

By Unknown
/ in trek safe trekker
6 comments
आधी ही पोस्ट इंग्रजीमध्ये लिहिली होती. तिचेच हे भाषांतर... सर्वांना उपयोगी पडावी म्हणून..!!!

पूर्वरंग:वर्ष २००८ चा पूर्वार्ध: वासोट्याला २ ट्रेकर्सचा मृत्यु. लोहगडाजवळ एक मृतदेह आढळला.
जानेवारी २००९: तोरण्याजवळ दुर्घटनेत एका ट्रेकरचा मृत्यु.
फेब्रुवारी २००९: तोरण्यावरुन दोन तरुण बेपत्ता. चार दिवसांनी जंगलात मृतदेह सापडले.

सर्वसाधारण लोकांचे मत: ट्रेक किंवा गिर्यारोहण कायमच धोकादायक असते.

हे आतापर्यंतचे दृश्य. इथे माझा कुणाकडेही अंगुलीनिर्देश करण्याचा प्रयत्न नाही. आणि नाही कुणाला उपदेशाचे डोस पाजण्याचा. खरं तर तेव्हा माझी आई "सकाळ मुक्तपीठ"मधे आलेला तोरणा दुर्घटनेबद्दलच लेख वाचत होती आणि त्याच वेळी माझ्या वर्षभर चालणाऱ्या भटकंती आणि ट्रेक्सबद्दल तक्रारही.
अशीच काहीसे माझ्यावर मनापासून प्रेम करणारे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी आणि हितचिंतक यांचे झाले होते. म्हणूनच हा लेख मझ्या सगळ्या कुटुंब सदस्यांना, मित्रांना आणि हितचिंतकांना समर्पित करत आहे. आधी विचार केला होता की या सगळ्यांना प्रत्यक्ष समजावून सांगावे, पण नंतर लक्षात आले की हेच विचार शब्दबद्ध केले तर माझ्यासारख्या सह्याद्रीच्या कुशीत हरवून जायला संधी शोधणाऱ्या अनेक नविन जुन्या, नवखे, अट्टल ट्रेक गुरु असणाऱ्या सह्यप्रेमींना कायम उपयोगी पडेल.

आमची ट्रेकची व्याख्या "भटकंती अनलिमिटेड" जरी असली तरी इथे "अनलिमिटेड" हा शब्द ट्रेकच्या दरम्यानची वागणूक नाही तर ट्रेकच्या नियमिततपणाबद्दल किंवा वारंवारितेबद्दल संबधित आहे. मी आणि माझी ’भटक्या टोळी’चे सदस्य (इथून पुढे एकत्रितपणे ’आम्ही’) ट्रेकची रुपरेषा आणि प्लॅनिंगबद्दल कधीच तडजोड करत नाही. त्यासाठी गुगलने नेहमीच आमचे मदत केली आहे.

एकदा की ठिकाण (शक्यतो एखादा किल्ला) निश्चित झाले की आम्ही आमच्या कामाला लागतो. त्याबद्दल जी काही माहिती मिळते तेवढी माहिती मिळवायचा प्रयत्न करतो. यामध्ये प्रवासाची साधने, पोचण्याचा रस्ता, रस्त्याची स्थिती, प्रवासाला आणि ट्रेकला लागणारा वेळ, ऋतूनिहाय असणारे पोचण्याचे मार्ग किंवा वाटा (काही वाटा पावसाळ्यात बंद होतात), खाण्याची सोय होणाऱ्या जागा, पाण्याची उपलब्धता अशा माहितीचा समावेश असतो. आमचा माहितीचा प्रमुख स्त्रोत असतो जे लोक तिथे आधी जाऊन आलेत त्यांनी लिहिलेले ब्लॉग्ज. हे ब्लॉग्ज नेहमीच अशा ठिकाणांची एकदम ’फर्स्ट हॅंड’ माहिती देतात. पुढचा कळीचा मुद्दा असतो पाणी आणि अन्नाची उपलब्धता आणि गरज असेल तर मुक्कामाची व्यवस्था. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठे जाणार आहोत याची पूर्ण कल्पना घरी देऊन ठेवलेली असते. ट्रेकमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या मेंबर्सचे मोबाईल नंबर घरी लिहून ठेवतो.

पॅकिंग:
पॅकिंग म्हणजे ट्रेकसाठी तयार होणे. चांगल्या उत्कृष्ट प्रतीची सॅक ही ट्रेकिंगची पहिली गरज. त्यात भरलेले सगळे साहित्य पटकन सापडावे अशी ही सॅक असावी. जर ट्रेकच्या दरम्यान मुक्कामाचा बेत असेल तर मुक्कामाची सोय आणि पुरेसे बेडिंग असणे महत्वाचे असते. जर ह मुक्काम खुल्या आकाशाखाली तारे मोजत करणार असू तर जंगली जनावरे, साप, विंचू अशा सरिसृप प्राण्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. जरी बेडिंग स्लीपिंग बॅगसारखे भारी नसले तरी ते परिपूर्ण असावे. बॅगमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू म्हणजे एक लहानसा चाकू (सेफ्टी नाइफ, आर्मी नाइफ उत्तम), टॉर्च, एक्स्ट्रा बॅटरी (सेल), काडीपेटी, मोबाईल फोन, प्रथमोपचार साहित्य, काडीपेटी, पाण्याच्या बाटल्या, हलके खाण्याचे पदार्थ, त्वरित शक्तिकारक ऊर्जा देणारे ग्लुकॉन-डी सारखे द्रव्ये, ग्लुकोजची बिस्किटे. उत्तम प्रतीचे बूट अत्यावश्यक (फ्लोटर्स नाही, प्लीज). जर पावसाळ्याचे दिवस असतील तर सगळे पॅकिंग पाणी जाणार नाही, साहित्य भिजणार नाही अशा रीतीने केलेले असावे. शक्यतो वेगवेगळ्या ऑपरेटर्सची सर्व्हिस असणारे मोबाईल असावेत (टट इंडिकॉमचे नेटवर्क थोडेफार का होईना, पण सगळीकडे मिळते असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आणि ते स्वस्तही आहेत. इथे आमचा कुणाचीही जाहिरात करण्याचा उद्देश नाही).

प्रवास:
महाराष्ट्राचे गड-कोट-किल्ले हे मोठ्या शहरांपासून शक्यतो सहजासहजी पोचता येईल असे नाहीत (काही सन्माननीय अपवाद वगळता). म्हणून आम्ही त्या परिसराची आणि रस्त्याची पूर्ण माहिती काढतो. प्रवास सार्वजनिक बससेवेचा उपयोग होणार असेल तर त्याचे वेळापत्रक आधी माहीत असावे. बहुधा आमचा प्रवास स्वतःच्या बाईकवर किंवा कारने होतो. बाईक असेल तर पहिला (खरं तर नियम क्रमांक ०) असतो हेल्मेट कंपल्सरी. वेळेला आम्ही हेल्मेट नसणाऱ्या मित्रांसाठी हेल्मेट्स कुठूनतरी पैदा करतो. आणि कधी हेल्मेट नसेल तर तो मेंबर नाकारतोही. पुढची गोष्ट असते त्या ठिकाणी पोचण्याचा कमीत कमी दूरचा, चांगल्या अवस्थेतला रस्ता शोधून कढणे. प्रवासाचा प्लॅन असा आखतो की रात्री गाडी चालवायला लागू नये. रस्ताच्या स्थितीचा अंदाज घेऊन तिथे पोचण्याच्या वेळेचे गणित मांडणे पण महत्वाचे. गाडीत पेट्रोलची पातळी, टायरमध्ये योग्य हवा या गोष्टी आधीच चेक केल्या जातात. विशेषतः टायरच्या ट्रेड्समध्ये फसलेले खडे आणि इतर गोष्टी कढून टाकतो, कारण याच गोष्टी नंतर गाडी पंक्चर होण्यास कारणीभूत ठरतात. आम्ही आमच्या आमच्यात किंवा रस्त्यावरील इतर गाड्यांशी कधीही स्पर्धा करत नाही. प्रत्येक वेळी मागे बसणारा मित्र गाडी चालवणाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवून असतो आणि अतिवेग किंवा जास्त आगाऊपणाबद्दल सावधान करत असतो. तसेच ओव्हरटेक करताना मागून येणारी वाहने सुरक्षित अंतरावर आहेत आणि ओव्हरटेक सुरक्षितपणे होईल यावर लक्ष ठेवून असतात. कारण आरशात पाहून मागून येणाऱ्या गाडीचा अंदाज येणे अवघड असते. गाडी चालवताना सगळे इशारे (इंडिकेटर्स, हाताचे इशारे) व्यवस्थित दिले जातात. आम्ही नेहमीच वाहतुकीचे नियम पाळतो, नव्हे आम्हाला त्याचा अभिमान आहे.

प्रत्यक्ष ट्रेक:
आम्ही जेव्हा पायथ्याला पोचतो तेव्हा पुन्हा एकदा खाली गावात वरपर्यंत पोचण्याचा रस्ता विचारून घेतो. स्थानिक लोकांशी नेहमी सलोख्याचे संबंध ठेवतो, कारण वेळ पडली तर कठीण प्रसंगी तेच आपल्याला मदत करणार असतात. मावशी, ताई, भाऊ, काका, मामा असे सगळे शब्द त्यावेळी उपयोगी पडतात. त्यांच्याकडे असणाऱ्या महितीबद्दल त्यांना अभिमान वाटेल असेच वर्तन आम्ही राखतो. प्रत्यक्ष चढाई करताना सावकाश पण स्थिर वेग राखणे आवश्यक असते. वेळोवेळी मागे वळून पाहून काही खुणा लक्षात ठेवतो. म्हणजे त्या खुणा परत येताना किंवा वाट चुकली तर बॅकट्रॅकिंग करताना उपयोगी पडतात. जर मोबाईलला कव्हरेज नसेल तर आम्ही तो ऑफलाईन किंवा बंद ठेवतो, कारण नेटवर्क शोधत राहणारा फोन जास्त बॅटरी खातो. शक्यतो आम्ही मोबाईलवर गाणी ऐकत नाही. कारण हिप-हॉप आणि धूमधडामपेक्षा भन्नाट रानवारा आणि वादळाचे ढोल जास्त इंटरेस्टिंग असतात. आणि ते बॅटरीपण वाचवतात. आम्ही अगदी अशक्य जागांवर पोचण्याचा कधीही प्रयत्न करत नाही किंवा तसे करण्यास कुणाला आव्हान देऊन उद्युक्त करत नाही. उलटपक्षी जर एखादी जागा थोडीसुद्धा धोकादायक असेल तर सगळ्यांना तिकडे जाण्यापासून परावृत्त करतो. अतिउत्साही मित्रांना परवृत्त करण्यासाठी साम, दंड, भेद (दाम नसतो) अशा सर्व मार्गांचा अवलंब करतो. पण शेवटी ट्रेकमधे धाडस, साहस आणि कॅल्क्युलेटेड रिस्क अशा गोष्टी अनिवार्य असतात. मग असे काही प्रयत्न करण्याजोगे असतील तर ग्रुप लीडर इतरांच्या मदतीने आधी करतो आणि मग इतरांना तिथे पोचायला मदत करतो. सर्वजण ट्रेकला एक टीम म्हणून गेलो होतो आणि एक टीम म्हणूनच ट्रेक पूर्ण करायचा असतो. वेगवेगळ्या ऋतुंध्ये एकच ट्रेक वेगवेगळा असू शकतो. पावसाळ्यात एखाद्या ट्रेकमधे खडक शेवाळलेले असु शकतात आणि हिवाळ्यानंतर गवत-झुडुपांचे कमजोर आधार नवी आव्हाने उभी करू शकतात. या गोष्टी कायम लक्षात ठेवाव्या लागतात. आम्ही रांगड्या सह्याद्रीचे आणि निसर्गाचे प्रत्येक पैलू मनापासून एंजॉय करतो, पण त्याला कधीही आव्हान देत नाही. काही श्वास रोखून धरायला लावणाऱ्या कड्यांवरुन खाली पाहताना पोटावर झोपून पाहणे किंवा खाली झुकून दबकत चालणे हितावह असते, कारण त्यामुळे आपला गुरुत्वमध्य जमिनीपासून कमीत कमी उंचीवर राहतो आणि तोल सहजासहजी जात नाही. दरीच्या कडेवर किंवा उंच कड्यावर कधीही सरळ विना-आधार उभे राहू नये कारण डोळे गरगरल्यामुळे किंवा वेगवान वाऱ्यामुळे तोल जाण्याचा धोका संभवतो.

रात्रीचा मुक्काम:
पुरेसे बेडिंग असणे महत्वाचे आहे. सूर्यास्त होण्यापूर्वी आम्ही मुक्कामाची जागा गाठतो आणि ती जागा साफ करून घेतो. त्यामुळे साप किंवा इतर कीटकांचा धोका दिवसाउजेडीच ओळखू येतो. एक काठी नेहमी बरोबर ठेवतो. नसेल तर तिथे पोचल्यावर शोधतो. अंधारात कधीही एकटे बाहेर पडत नाही. ३-४ च्या गटाने एकत्र बाहेर पडून बरोबर टॉर्च आणि काठी घेऊन जातो. मुक्कामाच्या जागी (कँपसाईटवर) नेहमी रात्री आग पेटवून ठेवतो. नशिबाने माझ्या भटक्या टोळीच्या एकाही सदस्याला हरवून जाण्यासाठी किंवा ’ट्रान्स’ मिळवण्यासाठी मद्याची गरज पडत नाही. सह्याद्रीचा गुणच असा आहे की आपोआपच तुम्हांला एक वेगळी नशा चढते.

पाण्यासंबंधी:
बऱ्याच किल्ल्यांवर पाण्याचे टाके किंवा विहीर असते. ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते आधी पाहून घ्यावे. अधिक दक्षता म्हणून ते पाणी उकळून घ्यावे किंवा लिक्वीड क्लोरीन वापरावे. त्या पाण्यामध्ये पोहणे टाळावे कारण आपल्यानंतर दुसरेही कुणी पाणी पिणार असते आणि शिवाय त्यात लपलेले साप, पाणकीटक असे धोके असू शकतात. खाले गाळात रुतून बसण्याचा आणि अतिखोल पाणी असण्याचाही धोका नाकारता येत नाही. जर समुद्राचे पाणे असेल तर त्या गावातील स्थानिक लोकांना विचारून भरती-ओहोटीच्या वेळेची पूर्ण माहिती करुन घ्यावी. समुद्रात पोहणे शक्यतो टाळावेच. किनाऱ्यावर लावलेले धोकादर्शक बावटे आणि त्याचे अर्थ समजून घेऊन पाण्यात खेळावे.

मुक्कामानंतर:
कॅंपसाईट स्वच्छ करावी. आपले सगळे प्लॅस्टिक शहरात घेऊन यावे. आम्ही जैविक विघटण होणारा कचऱ्याची मात्र तिथे एका कोपऱ्यात विल्हेवाट लावतो हे सरळ सरळ कबूल करतो. ते ठिकाण पूर्वस्थितीत आणण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करतो. शक्यतो पेटवलेल्या आगीच्या राखेशिवाय मागे काहीही ठेवू नये. तिथली जैविक साखळी आणि पर्यावरणाला हानी पोचेल असे काहीही टाकू नये.

उत्तररंग:
ट्रेक्स हे थ्रिलिंग असतात. आपल्याला ताजेतवाने करतात. पण सुरक्षितपणे डोळे उघडे ठेवून केले तरच. सुरक्षित रहा, आणि इतरांना त्यासाठी प्रोत्साहन द्या. सुरक्षित आणि स्वच्छ ट्रेकबद्दल जागृती करा. नवी आव्हाने स्वीकारा, पण निसर्गाला आव्हान देऊ नका. निसर्गावर प्रेम करा, त्याची पूजा करा. सह्याद्री आपली शान आणि मानबिंदू आहे, त्याला जपा.

मला खात्री आहे की हे सगळे वाचल्यानंतर ट्रेक्स थंबणार नाहीत तर, नवीन ट्रेकचे प्लॅन्स आणखी जोमाने होतील. आपले मित्र, परिवारजन आणि हितचिंतक आपल्यावर असेच प्रेम करत राहतील. आपणही करा.

ता.क. : हा लेख बऱ्याच जणांन उपयोगी ठरू शकतो. तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. न जाणो यामुळे तरी सुरक्षित ट्रेक बद्दल प्रसार होईल. काही मुद्दे विसरलो असेन तर जरूर कळवा.


हे दुर्गलंकृत सह्याद्री, मी लवकरच पुन्हा येईन...!!!

pankajzarekar@gmail.com

Related Posts

6 comments:

  1. Pravin25 October 2009 at 22:13

    A very good information. I'm not an avid trekker but interested in photography, so I travel a lot. These points will certainly help me. Thank you very much for the same.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. Anonymous26 October 2009 at 01:27

    chan lihila ahes.
    trek tar parat parat karayachech ahet. hi mahiti anekansathi mahatvachi ani garajechi ahe.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Pritam26 October 2009 at 02:33

    छान माहिती दिलीयेस... तुला 'डिस्कव्हरी'च्या 'Man Vs Wild' बद्दल माहित असेलच, मी त्याचा प्रचंड मोठा फ़ॅन आहे. त्यातुनही अशीच छान माहीती मिळत असते. असच लिहीत रहा.. आय-मिन असाच ’भटकत’ रहा व छान छान ब्लॉग्स लिहीत रहा... शुभेच्छा!!
    बाकी नवीन ’डोमेन’ बद्दल अभिनंदन..!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. भुंगा26 October 2009 at 08:18

    पंकज,
    मस्त लेख लिहिलाय! अगदी नव्या आणि रेग्युलर ट्रेकर्सना माहिती देणारा. आम्ही बर्‍याचदा नविन मुलांना ट्रेक/ किल्ल्यांच्या ठिकाणी गाणी लाऊन धिंगाणा घालताना पाहिलंय... काहिंना अगदी दारु पितानाही! अशा वेळी ग्रुपनी मिळुन त्यांना समजावुन सांगणेही गरजेचं.. वेळ पडली तर "साम-दाम-दंड-भेद" वापरुनही! बर्‍याचदा काही जणांबरोबर ई-मेल आणि ब्लॉगची देवाण-घेवाणही होते.

    बाकी - ट्रेकींगसाठी - ऐक्शनचे ट्रेकिंग शुज अगदी भरवशाचे - जाहिरात नव्हे!
    सोबत एखादा स्विस नाइफ जरुर असावा. बाकी सगळे मुद्दे तु सांगितलेच आहेत... सह्याद्रित मन आनंदाने भरुन आणि फक्त पाऊलखुणा ठेऊन, परत या!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Yogesh26 December 2009 at 23:45

    mast ahe... yach english version vachlel.. tari ha post punha vachla... :)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  6. Yogesh Alekari23 December 2014 at 09:51

    उपयुक्त माहिती..

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
    कुठे भैरवनाथाचे देऊळ, कुठे वाघजाईचं ठाणं. कुठं क्षेत्रपाल खंडोबाचं राऊळ तर कुठे पिराचं स्थान. कधी शिवाचं लिंग तर कुठे मरीआईची घुमटी. शि...
  • हरवले हे रान धुक्यात…
          चांदण्या रातीच्या पातळाला झुंजूमुंजूचा पदर शांत निवांत उगवतीला कवळ्या किरणांची झालर आळसलेल्या झाडाच्या वळचणीला किलबिल ...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • रानावनातल्या श्रावणसरी
    मेघांच्या झुंबरांतून वाट करून श्रावणाची कोवळी उन्हे, मध्येच रिमझिम पाऊस सृष्टीचे साजिरे रूप आणखीनच  खुलवितो. यामुळे श्रावण म्हणजे भटक्यांसाठ...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-२)
    दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही कोकमठाणचे शिवमंदिर पाहून त्याचे फोटो काढून पुढे औरंगाबाद गाठायचे आणि जमलेच तर त्याच दिवशी अन्वा करण्याचे मनात होत...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
    एसीत बसे, पीसीत घुसे, दिस काढी कसेबसे, हापिसात अशी अवस्था झाली असताना शहरात घुसमटलेल्या जीवाला काहीतरी वेगळे हवे असते. म्हणूनच दिला का...
  • दोन-चार-पाच (रायगड प्रभावळ)
    आकाशीच्या घुमटात पाऊसभरल्या मेघांचे झुंबर विहरु लागले की वेध लागतात पावसाळी भटकंतीचे. पाऊसभरल्या ओथंबलेल्या श्यामल घनांसारखेच मनही सह्या...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • मध्ययुगीन मंदिरे- बाईक राईड (भाग-१)
    तसा वर्षभर आमच्या भटकंतीचा धामधुमीचा काळ असतो. डिसेंबराच्या शेवटी जी काही जोडून सुट्टी येते आणि शिल्लक राहिलेल्या सुट्टयांचा मेळ घालून भटकंत...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • सह्याद्रीतल्या देवता
  • हरवले हे रान धुक्यात…
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
  • रानावनातल्या श्रावणसरी

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • Harishchandragad
  • Sahyadri
  • Trek
  • bikeride
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • travel

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1