Pankaj भटकंती Unlimited™

  • Home
  • BLOG
    • भटकंती
    • PHOTOSHOOT
    • सह्याद्री
    • सहजच
  • GALLERY
  • MEDIA-RECOs
  • ललितचित्र
  • ABOUT -ME
SHARE please

साद सागराची, सफर किनारपट्टीची: दुसरा दिवस

By Unknown
/ in Bhatkanti Unlimited bikeride Coastal Prowl Konkan
5 comments
घड्याळजींचे काटे (डिजिटल घड्याळातले आकडे) आणि अलार्म सकाळचे सात वाजलेत, आता उठा असा ठणाणा करताहेत. काल रात्री तुफान पाऊस बरसलाय. एकदोनदा तर दचकून जागे झालो एवढा मुसळधार पाऊस पडला. पण सकाळी थोडी उघडीप दिलीये. घंटासिंग, हैबती, मंगू वगैरे मंडळी लोक उठून बसलीत. अर्धा तास झाला घंटासिंग ’आतमधे’ बसलाय. बाकीचे ’खोळंबलेत’. कालचा पिझ्झा त्रास देत असावा बहुतेक :-)

आठला सगळे रेडी झाले. ’मेर वाला ब्लू’ म्हणत भावनाने आज मॅचिंग नेलपेंट लावली आहे. देवगडचा किल्ला आणि आणि लाईट हाऊस पाहून आल्यावर आम्ही चेक-आऊट करणार आहोत. त्यामुळे बॅगा गाडील बान्धायची घाई नाही. गावापासून जवळच असलेला देवगड ह सागरी किल्ला पहायला निघतोय आता. एसटी स्टॅंडसमोरुन जाणारा हा रस्ता सरळ देवगड बंदराच्या बाजूने किल्ल्यात जाईल. गावातून पुढे आल्यावर बंदरात सगळ्या मच्छीमार बोटी नांगरून ठेवल्यात. म्हणजे समुद्र खवळलेला आहे हे नक्की. आकाश भरलेलेच आहे. आम्ही किल्ल्यात पोचतो न पोचतो तेच पावसाची पीरपीर सुरू झाली.
गाड्या थेट किल्ल्यात घुसल्या. म्हणजे तसा रस्ताच आहे. पार्क करुन कॉंक्रीटच्या नागमोडी 'पाथवे' वरुन आम्ही आधी लाईट हाऊसकडे निघालो. वाटेत हे एक डावीकडे पुरातन गणपती मंदिर. त्या तटबंदीत बंदिस्त विस्तीर्ण माळावर असलेल्या मोजक्या इमारतींपैकी हे एक. बाकी आहेत त्या दीपगृहाच्या कर्मचाऱ्यांची क्वार्टेर्स आणि थेट आकाशाला भिडलेले देवगड लाईट हाऊस. दर्शन घेऊन आम्ही दीपगृहाच्या गेटजवळ आलो. कुलुप आहे, पण आमचा आवाज ऐकून ते काका आले. खरंतर भरतातली सगळी दीपगृहे संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत जनतेला पाहण्यासाठी खुली असतात आणि आम्ही आलो होतो सकळी साडेआठला. पॅटने कालच त्यांच्याशी बोलून परवानगी मिळवली होती. अगदी रीतसर तिकीट काढून आम्ही आत दाखल झालो. गोल जिना चढून वर आलो. मग त्या काकांनी माहेती सांगायला सुरुवात केली. दीपग्रुहे, त्यांची रचना, त्यांचा प्रकाश सोडन्याचा खास कोड असलेला पॅटर्न, त्यावरून होणारे लाईट हाऊसचे आयडेंटिफ़िकेशन, मुंबईच्या कंट्रोल सेंटरमधून आणि उपग्रहाद्वारे होणारे नियंत्रण, विजेचा पुरवठा, बॅटरी बॅकप, स्टेपर मोटर, आतल्या मुख्य दिव्याची तीव्रता, इमर्जन्सी दिवा अशी सगळी उपयुक्त महिती मिळाली. वरुन दिसणारा नजारा अवर्णनीय होता. कुठे सुमात्रा बेटांवर झालेला भूकंप आणि समोआ बेटांवर त्यामुळे उद्भवलेली सुनामीची बातमी ताजी होती. त्यामुळेच अरबी सागरही आज खूपच अस्वस्थ दिसतो आहे हेही त्या गार्डने आम्हाला सांगित्ले. वरून कही फोटो घेऊन आम्ही खाले आलो आणि किल्ल्यच्या तटावरुन फेरी मारली आणि गाड्यांजवळ परत आलो. तिथेच आमच्या कोस्टल प्राउलची पहिली बाईक पंक्चर झाली- राकाची गाडी. बरे झाले आदरानातल्या रस्ताऐवजी मुख्य गावाजवळ झाला हा प्रताप. तडक राका तिला दवाखान्यात घेऊन गेलाय आणि उरलेले आम्ही एका गाडीवर ट्रिपल सीट करुन गेस्ट हाऊसला परत आलोय. गरमागरम पोहे आणि चहा झाल्यावर आम्ही आत विजयदुर्गकडे निघू. राका पण आला बाईक नीट करुन. बॅगा आवळल्या, पुन्हा एक CP- 2 , Day 2 ग्रुप फोटो झाला आणि आम्ही बाहेर पडलोय. माझ्या गाडीचा एक आरसा गायब झाल्याने मला एक डोळा झाकल्यासारखे वाटतय. (मला दोन्ही आरसे आणि हेल्मेट असल्याशिवाय गाडी चालवता येत नाही). म्हणून मग बजाजचे शोरुम-सर्व्हिस सेंटर पाहून गाडी आत घातली. मग सगळ्यांनी आपापल्या बाईक्स चेकप करून घेतल्या आहेत. हो हो... निघालो आम्ही विजयदुर्गाकडे. साधारण तीस-बत्तीस किमीचा लहानसा टप्पा आहे. त्यात रस्ता एकदम सुपर. मग काय आम्ही गेम खेळल्याप्रमाणे बाईक्स बुंगवत, ७०-८०-९० ला गाड्या टच करत 'पडेल तिठा' या गावी लेफ़्ट मारून विजयदुर्गला सव्वाबाराला शिवलो. आत आलो, इथे भक्कम बांधणीचा किल्ला आहे. तितकाच मोठी पण. वळणदार दरवाजातुन(हत्ती किंवा लकडी ओंडक्याने तोडताना वेग घेता येऊ नये म्हणून किल्ल्याचे दरवाजे असे बांधतात) आत गेल्यावर समोर सदर आणि दारूखाना आहे. त्या दरवाजाला 'जिबीचा दरवाजा' म्हणतात. त्यात आमच्यातल्या एकाने रडू येणारा जोक मारला "किती GB चा?" (ओळखा पाहू कोण तो?)

आता गडतटावरोन एक फेरी मारू आपण. प्रचंड मोठे किल्ला आहे हा. पूर्ण फेरी मारायला एक तास लागणार. वर आकाशात असंख्य समुद्रगरोड, ब्राम्हणी घारी (मासेखाऊ!) घिरट्या घालत आहेत. समोर एका झाडावर Malabar Pied Hornbill (मराठी नाव धनेश) दिसतोय. पाहतो जरा लेन्स बदलून, नशीब असेल तर फोटो चांगला मिळेल. अरे पेअर आहे. वा... कडक फोटो मिळाले. एकतर इन फ़्लाईट. माझी मीच पाठ थोपटून घेतोय या यशस्वी फोटोसाठी.

गड्फेरी आटोपली. २ वाजलेत आणि पोट खाऊ मागतंय. जवळच्याच हॉटेलमधे घुसलो. आमची ऑर्डर म्हणजे मासे आणि मालवणी कोंबडी. तिकडे मॅन्गोच्या पोटात दुखायला लागले. शनिवार आहे म्हणून आज तो घासफूस खातोय. शेवटची फ़्रायची ऑर्डर तर आम्ही खास त्याला जळवायला म्हणून दिली. जेवण संपवून बाहेर आल्यावर आमच्या लक्षात आलय तो एरिया बरा नव्हता. एकदम चांदनी बार मोहल्ला होता. पटकन तिथून काढता पाय घेतला. आता पुढचा रन थोडा मोठा होता. जैतापूरची खाडी ओलांडून पूर्णगड आटोपून पावस मार्गे रत्नागिरीला पोचयचे आहे. पुन्हा पडेल तिठा वरुन जैतापूरला जाणारा रोड धरला. विजयदुर्गवरुन आल्यावर त्या तिठ्यावरून सरळ जायचे आणि लगेच पुढचा डावीकडचे वळण घ्यायचे. रस्ता थोडा (सध्यातरी) खराब आहे. फक्त खडीकरण झालेला. बरोबर आहे की नाही अशी शंका घ्यायला लावणारा. पुढे तर हा रस्ता अगदी कच्चा होतो. समोरुन स्पेंडरवर एक अतिलहान मुलगा येतोय त्याला विचारू. ए... ए... थांब जरा २ मिनि... त्याचे उत्तर आले "अहो अहो पाय टेकत नाहीत, थांबता येत नाही." आणि पुढे जाऊन एका सिमेंट पाईपवर पाय टेकवून थांबला. आम्ही त्याच रस्त्याने पुढे निघतो. आता दोन्ही बाजूंना विस्तीर्ण हिरवीगार मैदाने मधोमध असणारा लाल मातीचा खासा कोकणी रस्ता. 'डोंगरतिठा' या गावातून उजवीकडे वळालो आणि रस्ता पुन्हा एकदम भारी झाला. पुन्हा बाईक्सनी वेग घेतला आणि आम्ही २ तासांचा प्रवास संपवून जैतापूरच्या खाडीच्या तीरावर पोचलो. आता काम आहे गाड्या पडावातून पलीकडे नेणे. पुलाचे काम चालू आहे, एक सहा महिन्यांआत काम पूर्ण होइलच. गाड्या उचलून पडावात ठेवयला लागणार. एक वेळी चारच गाड्या नेता येणार. मग सगळ्यात आधी बुलेट नावाचा राक्षस चढवायला जीव गेला. त्यात इंजिन आणि सायलेन्सर बेक्कार तापलेले. कशातरी गाड्या आणि आमचे वीर पल्याड आले. चहाने सर्वजण फ्रेश झाले।


आणि साडेपाचला ताज्या दमाने पुढे निघालो. आता टारगेट ’पूर्णगड’. पूर्णगडला पोचलो तेव्हा अंधारुन यायला लागले. गावात विचरले तेव्हा आमच्याकडे लोक वरपासून खालपर्यंत पाहून घ्यायचे आणि मगच सांगायचे. एकाने तर तुम्ही नक्की जाणार का? गाड्यांवर जाणार का? असे विचारून घेतले. मग आम्हाला पण पोहचू की नाही अशी शंका येऊ लागली. पण मनाचा हिय्या करुन आम्ही पूर्णगडाकडे निघालो. रस्ता फारच वाईट होता. मोठेमोठे दगड आणि निसरडा चिखल यांचा एकत्रित परिणाम होऊन सम्यक एकदोन वेळा घसरला. आता फार अंधार झाला. त्यामुळे आम्ही पावणेसातला प्रयत्न सोडून दिला आणि परत रत्नागिरीकडे निघालोय- करुच हा (अ)पूर्णगड पुन्हा कधी तरी!!

पावस मागे टाकत रत्नागिरीला रात्री पावणेआठला पोहोचलो. रस्ता फार सुरेख होता. काहीच त्रास झाला नाही. रत्नागिरीला आमच फोटोग्राफर्स@ पुणेचा मित्र- डॉ.गौरव पाटील राहतो. त्याने राहण्याचे सोय पाहून ठेवली आहेच. त्याला फोन लावला. त्याने आणि त्याच्या बाबांनी आम्हाला आणून सोडले. एका मंगलकार्यालयात उतरलो. रूम वगैरे अशी भानगडच नाही. स्वच्छ जमिनीवर मधोमध दोन ओळींत टाकलेल्या गाद्या आणि कडेला एकावर एक रचलेली खुर्च्याची चळत असा जंगी थाट. केअरटेकरने रात्री गरम पाणी द्यायला नकार दिल्याने थोडी कुरबुर झाली पण आता सगळ्यांनी एडजस्ट केलय (शेवटी अशा तडजोडीच कुठलीही ट्रिप यशस्वी करतात, त्याबद्दल सर्वांचे खास आभार). मग आम्ही सगळे फ्रेश होइपर्यंत कहीतरी टाईमपास म्हणून शिक्रांतला त्याच्या आज अजिबात नसलेल्या वाढदिवसाबद्दल बडव बडव बडवलय (बर्थडे बंप्स) आणि शुभेच्छा दिल्या आहेत. सगळ्यांनी हातपाय साफ करुन घेतले. बिचारा घंटासिंग...!!!

आता रात्रीचे जेवण. घासफूस गॅंग आणि आजचा आमचा फितूर मॅन्गीने आज चेंज म्हणून डोसा, दाबेली, पाव-भाजी अशा पदार्थावर आडवा हात मारायचे नक्की केलंय आणि आम्ही उगाच पाप नको म्हणून 'प्युअर नॉन वेज' हॉटेल शोधत निघालोय. अरे हे काय, गौरवने सांगितलेले हेच की ते हॉटेल दरबार. शिवाजी स्टेडियम जवळ. आत बसलो तर लो़क बिर्याणी झोडताहेत. पण आम्हाला मासे हवेत. म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारच्या चार थाळ्या ऑर्डेर केल्या. पाऊण तास लावला त्याने आणायला. आणले तर काय एकदम बकवास ग्रेव्ही, सगळ्या प्रकारच्या माशांसाठी एकच टाईपची... बिर्याणी बरोबर फूकट देतात ती. आणि चायनीज स्टाईलने कॉर्न फ़्लोअरमधे तळलेले मासे. एकंदरीत वाईट जेवण कसे असावे याचा एक उत्कृष्त नमुना म्हणजे दरबार मधले मासे (बिर्याणी बहुतेक खूप भारी असेल, कारण सगळे लोक येऊन तेच खात होते).

बाकी वेज मंडळी खूश होती. साधा डोसा, मसाला डोसा, भेळ, दाबेली, पाव-भाजी आणि मिल्कशेकने तृप्त झाले होते. चला त्यांना किमान आज तरी बरे जेवण मिळाले.

मुक्कामाच्या जागी आल्यावर सगळ्यांना गणेशगुळेचा बीच पहायचा असेल तर पहाटे पाचला उठा अशी तंबी दिली. पुन्हा एकदा पाच-सात कॅमेऱ्यांमध्ये दिवसाचा रिव्ह्यू घेउन मंडळी झोपी गेलीत. हा हैबती तर चक्क घोरायला लागलाय. आणि मी बसलोय ब्लॉगच्या नोंदी काढत, वाचकांनो तुमच्यासठी...!!!

आजचा प्रवास:

देवगड-लाईट हाऊस: ३ किमी
देवगड-विजयदुर्ग: ३० किमी
विजयदुर्ग-जैतापूर: ~६० किमी
जैतापूर-पूर्णगड: ~३० किमी
पूर्णगड-पावस: १६ किमी
पावस-रत्नागिरी: २० किमी

खादाडी पॉइंट्स:
देवगडमध्ये निवांत रेसॉर्टला नाष्टा.
विजयदुर्गला किल्ल्याच्या बाहेरचे हॉटेल.
जैतापूरला खाडी ओलांडली की समोरचे चहाची सोय करणारे घर/दुकान
रत्नागिरीला हॉटेल दरबार (अजिबात जाऊ नका) आणि भेळ चौपाटी.

Related Posts

5 comments:

  1. Vaibhav11 October 2009 at 23:29

    Nehmichya style madhe KADAK

    ReplyDelete
    Replies
      Reply
  2. mangesh11 October 2009 at 23:52

    Zabardast...!!!!

    ReplyDelete
    Replies
      Reply
  3. Saurabh Vadodkar11 October 2009 at 23:57

    mazyach chukimule mazi hi trip miss zali..anyways..next time.

    ReplyDelete
    Replies
      Reply
  4. सिद्धार्थ12 October 2009 at 08:53

    अरे रत्नागिरीला त्या शिवाजी स्टेडियमपासून जवळ माळनाका येथे "हॉटेल आमंत्रण" आहे. एक नंबर मांसाहार... तसेच खाली मांडवी बंदरला जाताना "प्रशांत लंच होम"सुद्धा जबरी आहे. पुढे कधी जाणं झालं तर अवश्य जा.

    बाकी "घंटासिंग" हा आमच्याकडे देखील फेमस शब्द आहे. आम्ही आमच्या मॅनेजरला घंटासिंग म्हणतो. :-)

    ReplyDelete
    Replies
      Reply
  5. Pritam14 October 2009 at 06:06

    पंकज, नेहमीसारखेच छान वर्णन केलय. पण ह्या वेळेस १-२ गोष्टी सुचवाव्यासा वाटतात. ह्या वेळेस बहुतेक ठिकाणी चालु वर्तमानकाळ आणी भुतकाळाची ’भेळ’ झालीय. त्या ऐवजी जर पुर्ण भुतकाळ किंवा पुर्ण वर्तमान काळ वापरलास तर अजुन ’इंट्रेस्टींग’ व योग्य होईल असं मला वाटतं. जसं "घारी (मासेखाऊ!) घिरट्या घालत आहेत." ऐवजी "घिरट्या घालत होत्या" जास्त बरं वाटतं (context wise). तसेच "रत्नागिरीला रात्री पावणेआठला पोहोचलो. रस्ता फार सुरेख होता. काहीच त्रास झाला नाही." हे तु भुतकाळात वर्णिले आहेस आणि नंतर लगेच- "राहण्याचे सोय पाहून ठेवली आहेच" हे चालु वर्तमानकाळात लिहीलेस हे जरा विसंगत वाटते, त्याऐवजी "सोय पाहुन ठेवली ’होतीच’" जास्त योग्य झालं असतं असं मला वाटतं. अजुन २-४ ठिकाणी ही गोष्ट जाण्वली. खरं सांगायचं तर मला व्याकरणाचं जास्त कळ्त नाही, मी ज्या गोष्टी सुचवल्यात त्या व्याकरण्च्या द्रुष्टीने बरोबर आहेत का नाही ते नाही माहीत पण त्याने लेख नक्कीच वाचनीय होईल, हे नक्की... बाकी तुझे प्रवासवर्णनं नेहमीच ’इंट्रेस्टींग’, ’फ़्रेश’ व स्फ़ुर्तीदायक असतात, ’हे’ असंच रहाव म्हणुन ’हा’ खटाटोप...लिहीत रहा!

    ReplyDelete
    Replies
      Reply
Add comment
Load more...

धन्यवाद !

Subscribe to: Post Comments (Atom)

Popular Posts

  • झापावरचा पाऊस !
    सकाळी जाग आली तीच मुळी पावसाच्या पाण्याच्या आणि गुरांच्या घंटेच्या आवाजाने. काल संध्याकाळी गावात उतरुन डेअरीवर दूध घेऊन आलेल्या रामजीसोबत ...
  • “तो आला”
    ऊन चढलेलं. पाखरं कधीच दिसेनाशी झालेली. उन्हाच्या झळांमधून हलणार्‍या माळावरल्या बाभळी फक्त मुळांना जमिनीने कैद केलंय म्हणून स्थितप...
  • ऐन हिवाळ्यातला ऑफबीट लडाख
    लडाखचे स्वप्न २०१२च्या ऑगस्टमध्ये खरं तर पूर्णत्वास गेले होते. ऐन पर्यटन हंगामातले सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊन झाले होते. लेह मार्केट, खरेदी,...
  • शिवजन्म
    (ग्राफिक्स सौजन्य: http://kavibhushan.blogspot. in/ ) गेल्या आठवड्यापासूनच वरल्या जहागिरदाराच्या वाड्यातल्या पडद्याआड आणि माजघरात लगबग...
  • असेही एक स्वप्न
    एकदा एका माणसाने वाघ पाळला होता. मी तो वाघ पहायला गेलो. त्याची परवानगी घेऊन त्या वाघाला बाहेर फिरायला घेऊन गेलो. बाहेर म्हणजे एकदम बाहेरगा...
  • माझ्याबद्दल थोडेसे...
    :-) “रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!” Even being lost in the crowd I’m still different a...
  • आता प्रतिभेवरही डल्ला
    मागच्या आठवड्यात महेंद्रजींनी शेरिल ऊर्फ व्हाईट इंडियन हाऊसवाईफ चा फोटो ’सकाळ’ वृत्तपत्रात अगदी काहीही परवानगी न घेता अगदी गरीब पद्धतीने मॉर...
  • पाऊसवेडा !
    पाऊस रानारानांत, पानापानांत आणि मनामनांत रुणझुणू लागला की सह्यभ्रमरांना साद घालतात ते सह्याद्रीचे कडे.राकट कडे, उन्हाळ्यात वणव्यांनी उजाड...
  • मालवण ट्रेलर.
    या शनवार-आयतवारी मालवणाक गेलो व्हतो. हयसरची अर्दांगिणी आणी एक दोस्त सपत्नीक सोबत व्हते. शुक्रवारी राती निघून पहाटे चारला मालवणात, आणि दोन दि...
  • शिवरायांचा दसरा
    भर उत्तररात्री थोरल्या वाड्याला जाग आली होती. शिरकाई मंदिरातून देवीच्या नामाचा गजर शरदाच्या थंड वार्‍यावर ऐकू येत होता, डफ-संबळाचा आवाज...

Labels

  • 2009
  • 2013
  • 26/11
  • about me
  • analysis
  • anwa
  • aurangabad
  • baglan
  • bangalore
  • bar headed geese
  • beach
  • bedse
  • beyond politics
  • Bhatkanti
  • Bhatkanti Unlimited
  • bhigwan
  • Bhor
  • Bhorgiri
  • Bhuleshwar
  • bike ride
  • bikeride
  • Bikerides
  • birds
  • birthday
  • bliss
  • Blog
  • Cabo-de-Rama
  • calendar
  • Call centre
  • camera
  • camping
  • car
  • caravan
  • Chavand
  • chicken
  • childhood
  • Coastal Prowl
  • current affairs
  • Darya ghat
  • dassera
  • denim
  • dentist
  • destruction
  • Devghar
  • dhakoba
  • dhodap
  • dhom
  • Diveagar
  • Drushtikon-2009
  • eateries
  • eco system
  • English
  • epilogue
  • epilogue 2009
  • exhibition
  • fatherhood parenting 1year
  • fish
  • flamingo
  • flute
  • food
  • food joints
  • frustration
  • fun
  • gallery
  • ganesh
  • german bakery
  • Goa
  • god
  • guide
  • guru
  • Hadsar
  • Harishchandragad
  • Himalaya
  • imagination
  • India
  • invitation
  • JLT
  • jungle
  • Kalavantin
  • Kalsubai
  • Kenjalgad Sahyadri
  • khandala
  • kids
  • Konkan
  • Kothaligad
  • Ladakh
  • Ladakh in winter
  • laugh
  • lavangi mirachi
  • letter
  • Letter to government
  • Lonar
  • Lonavla
  • Mahabaleshwar
  • Maharashtra Desha
  • Majorda
  • Malavan
  • malvan
  • marathi
  • martyrs
  • media
  • menavali
  • Monsoon
  • monsoon life
  • mora
  • Mulashi
  • mulher
  • mumbai attacks
  • mutton
  • mysore
  • Naneghat
  • okaka
  • ooty
  • Pabe ghat
  • Padargad
  • Pandavgad
  • panipuri
  • Panshet
  • Peb
  • Peth
  • photo theft
  • PhotographersAtPune
  • photography
  • photoshoot
  • plagiarism
  • Pune
  • Purandar
  • Raigad
  • rain
  • Raireshwar
  • ratangad
  • reading culture
  • responsible youth
  • Rohida
  • sachin tendulkar
  • sadhale ghat
  • Sahyadri
  • salher
  • Sandhan
  • Saswad
  • shabdashalaka
  • shivaji
  • shivjanm
  • shivjayanti
  • shooting techniques
  • Shravan
  • sketch
  • smoke
  • startrail
  • tamhini
  • tarkarli
  • telbel
  • thanale
  • thoughts
  • tourism
  • traffic
  • travel
  • Trek
  • trek safe
  • trekker
  • Tshirt
  • tung
  • Veer
  • Veer Dam
  • Vikatgad
  • wai
  • wedding
  • winter morning
  • woods
  • अकोले
  • अंजनेरी
  • अनुभव
  • अन्वा
  • अंबोली
  • अमितकाकडे
  • आठवणी
  • आठवणीतले दिवस
  • उगाच काहीतरी
  • उद्धव ठाकरे
  • औरंगाबाद
  • कविता
  • कावळ्या
  • काव्य
  • केलॉन्ग
  • कोकणकडा
  • कोकमठाण
  • कोंबडी
  • कोयना
  • खारदुंगला
  • गोंदेश्वर
  • घनगड
  • चंद्रगड
  • चांभारगड
  • चिकन
  • जर्मन बेकरी
  • जिस्पा
  • जीन्स
  • जीवधन
  • झापावरचा पाऊस
  • टीशर्ट
  • ट्रेक
  • डेंटिस्ट
  • ताहाकारी
  • त्रिंबकगड
  • त्सोमोरिरी
  • दसरा
  • दातदुखी
  • दातेगड
  • दासगाव
  • दिंडी
  • दुर्गभांडार
  • दृष्टिकोन२०१०
  • देवता
  • देवराई
  • धुके
  • धोडप
  • नळीची वाट
  • नाणेघाट
  • निमंत्रण
  • नुब्रा
  • पत्र
  • पन्हळघर
  • पर्यटन
  • पाऊस
  • पाऊसवेडा
  • पांग
  • पालखी
  • पावसाळी ट्रेक
  • पुणे
  • पॅंगॉन्ग
  • प्रेमकविता
  • फोटोगिरी
  • फोटोग्राफी
  • बाईक
  • बालपण
  • बासरी
  • बेडसे
  • बॉंबस्फोट
  • भटकंती
  • भंडारदरा
  • भारत
  • भैरवगड
  • मंगळगड
  • मंदिरे
  • मनातले
  • मनाली
  • मराठी
  • मराठी ब्लॉगर्स
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र देशा
  • माझ्याबद्दल
  • मालवण
  • मुळशी
  • मृगगड
  • मैत्रीण
  • मोराडी
  • मोहनगड
  • मोहरी
  • ये रे ये रे पावसा
  • रतनगड
  • राजमाची
  • रायगड प्रभावळ
  • रायलिंगी
  • रोहतांग
  • लडाख
  • लामायुरु
  • लोणार
  • वारी
  • विडंबन
  • विवाह
  • शब्दशलाका
  • शिवजयंती
  • शिवराज्याभिषेक
  • शिवराय
  • शुभविवाह
  • श्रावण
  • संगीत संशयकल्लोळ
  • समीक्षा
  • सह्यदेवता
  • सह्याद्री
  • साधले घाट
  • सारचू
  • सिन्नर
  • सोनगड
  • स्मरण
  • स्वप्न
  • हरिश्चंद्रगड
  • हिमालय

© Pankaj Zarekar

Popular Posts

  • मालवण ट्रेलर.
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • शिवरायांचा दसरा
  • स्वप्नातला ट्रेक: नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड

Labels

  • Bhatkanti Unlimited
  • bikeride
  • Harishchandragad
  • marathi
  • photography
  • photoshoot
  • Sahyadri
  • travel
  • Trek

Recent Posts

  • असेही एक स्वप्न
  • माझ्याबद्दल थोडेसे...
  • रतनगड आणि ફારસાન, થેપલો, મુખવાસ
  • पाऊसवेडा !
Designed by - भटकंती अनलिमिटेड
UA-22447000-1